Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nave-shaikshanik-dhoran-nava-shakashhanaeka-thharanae
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० ही आपल्या राज्यात यंदापासून अमलात येतीय. त्यामुळे मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत, काहीशी धास्ती आहे. आता यापुढे दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा जाऊन नवीनच पॅटर्न येणार का? पदवी खरंच चार वर्षांची होणार का? कला, विज्ञान, वाणिज्य हा पारंपरिक शाखाभेद संपून येणारी क्रेडिट पॉलिसी नेमकी कशी असेल? मातृभाषेत शिकण्याला महत्त्व दिल्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं महत्त्व कमी होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. १९८६ नंतर म्हणजेच तब्बल ३८ वर्षांनंतर देशाचं शैक्षणिक धोरण बदलत असल्यानं हे प्रश्न पडणं साहजिक आहेत. त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या शब्दांत उत्तरं देणारं ‘नवे शैक्षणिक धोरण: विद्यार्थी पालकांसाठी मार्गदर्शन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले लिखित या नवीन पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Book: Nave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-palakansathi margadarshan
Author: Prof. Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole
Podcast Host: Shirish Sahasrabuddhe and Niranjan Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#nationaleducationpolicy #indianeducation #newpolicy #marathipodcast
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Information
- Show
- FrequencyUpdated weekly
- Published14 August 2024 at 10:30 UTC
- Length36 min
- Season1
- Episode17
- RatingClean
