Sitemap
Desi Stack

Stories related to innovation and technology in India. Also includes discovering various aspects of ancient Indian Knowledge System.

Member-only story

Cognitive Biases

3 min readJun 17, 2025

--

Press enter or click to view image in full size

मनाच्या पूर्वग्रहाचे खेळ

संगणकात अथवा मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर-ऍप इन्स्टॉल करताना तुम्ही ‘नियम व अटी’ (टर्म्स अँड कंडिशन्स) आणि घेतल्या जाणाऱ्या ‘परवानग्या’ (पर्मिशन्स) वाचता का? का अशा अटींना होकार देऊन पुढे जाता? एका सर्वेक्षणानुसार केवळ ९% गुंतवणूकदारच संपूर्ण अटी वाचतात, उरलेले सोडतात. हा आकडा केवळ निष्काळजीपणा दाखवत नाही, तर आपल्या मेंदूची एक नैसर्गिक कमतरता देखील दर्शवतो. एवढ्या मोठ्या कंपन्या काही दगाबाजी करणार नाहीत हा पूर्वग्रह (बायस) आपल्या मनात ठाम असतो. अशाच आळसामुळे असो किंवा अंध-विश्वासामुळे, आपण सहज सायबर आक्रमणांना दार किलकिले करून ठेवतो.

आपल्या मेंदूत अनेक पूर्वग्रह (‘बायसेस’) किंवा शॉर्टकट्स असतात, जे आपल्याला कष्ट घेण्यापासून वाचवतात पण चुकीच्या निर्णयांकडे नेतात. आजच्या धावपळीच्या जीवनात हे शॉर्टकट्स सतत वापरले जातात. पूर्वग्रह अधिक दृढ होतात आणि आपण त्या मनाच्या खेळात अडकतो. अशा नकळत होणाऱ्या फसवणुकीच्या मेंटल मॉडेल (मन:प्रारूपाला) अथवा विचार-चित्रांच्या समूहाला ‘कॉग्निटिव्ह बायसेस’ (मानसिक पूर्वग्रह) किंवा सध्या-सोप्या भाषेत ‘मनाच्या पूर्वग्रहाचे खेळ’ म्हणू शकतो. १९७० च्या दशकात मानसशास्त्रज्ञ डॅनियल काहनेमन आणि आमोस टव्हर्स्की यांनी हे स्पष्ट केलं की, आपले निर्णय बहुतेक वेळा भावनांवर आणि सहजतेवर आधारित असतात, वास्तवावर नव्हे. असे पूर्वग्रह अनेक प्रकारचे असतात. त्याची काही उदाहरणे पाहुयात.

--

--

Yogesh Haribhau Kulkarni (PhD)
Yogesh Haribhau Kulkarni (PhD)

Written by Yogesh Haribhau Kulkarni (PhD)

PhD in Geometric Modeling | Google Developer Expert (Machine Learning) | Top Writer 3x (Medium) | More at https://www.linkedin.com/in/yogeshkulkarni/

Desi Stack
Desi Stack

Published in Desi Stack

Stories related to innovation and technology in India. Also includes discovering various aspects of ancient Indian Knowledge System.