Stories by Anil Shidore on Medium
वाढती विषमता सर्वांच्याच मुळाशी येईल, मग त्याला उत्तर काय?
रमेश आमच्या भागात पेपर टाकतो. काहींच्या घरी दूधही पोचवतो. नंतर दुकानात काम करतो. त्याची मुलगी सविता. तिला परदेशी जायचंय शिकायला. पण, त्यासाठी लाखो रूपये लागतील. रमेशनं त्याची जीवनभराची पुंजी त्यासाठी लावली आहे. इकडून तिकडून कर्ज काढलं आहे. आपण नाही तर आपली मुलगी ह्या दारिद्र्याच्या चक्रातून बाहेर पडावी असं त्याला वाटतं.
रमेश आणि सविता कदाचित चक्रव्यूह फोडतीलही परंतु सर्वांना ते शक्य होईल असं नाही. सर्वांसाठी ते कसं सुलभ होईल ह्यासाठी ऑक्सफॅमचा ह्यावर्षीचा अहवाल आपल्याला साद घालतो आहे. गरीब आणि श्रीमंत ह्यातली दरी किती वाढतीय, जगभरात भूक आणि दारिद्र्य कसं वाढतंय ह्याच्या दु:खी कहाण्यांच्या भोवती हा अहवाल अडकत नाही, तर उपाययोजनांचा ठोस आलेख समोर ठेवतो आणि जगभरातल्या समजंस, संवेदनशील मनांना विचार करायला भाग पाडतो.
अहवाल सांगतो आहे की मानवी इतिहासात कधीच इतक्या थोड्या लोकांकडे इतकी अवाढव्य संपत्ती नव्हती, श्रीमंत आणि गरीब ह्यांच्या मध्ये ह्या अगोदर इतकी तफावत कधीच नव्हती आणि श्रीमंत पैसेवाल्यांच्या ताब्यात इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय सत्ता कधीच एकवटलेली नव्हती.
मोठी कॉर्पोरेटस गेल्या काही काळात अफाट सत्ताधीश झाली. ह्या कॉर्पोरेटसकडे इतकी संपत्ती आलीच कशी? ह्याचं उत्तर देताना अहवाल म्हणतो: ही मोठी कॉर्पोरेटस त्यांची ताकद वापरून लोकांचे पगार कमी ठेवून भागधारकांना अधिक फायदा करून देतात, करांमध्ये सरकारकडून सवलती पदरात पाडून घेतात, सार्वजनिक सोयी-सुविधांचं खाजगीकरण करून नफा कमावतात आणि ह्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची मालकी असल्यानं बिनदिक्कतपणे पर्यावरणाला हानी पोचली तरी नफा कमावत रहातात.
ही अवाढव्य कॉर्पोरेटस नफा कसा कमावतात हे ही ह्या अहवालात सांगितलं आहे पण त्यात नवीन काही नाही. ह्या अहवालाची खरं वैशिष्ट्यं आहेत, त्यांनी ज्या उपाययोजना सुचवल्या आहेत त्यात. त्या उपाययोजना मांडताना त्यांनी सुरवातीलाच म्हटलं आहे की “सर्वांसाठी अर्थव्यवस्था असायला पाहिजे, थोडक्यांच्या फायद्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षा”. अहवालात पहिला उपाय सुचवला आहे की सर्व देशांच्या सरकारांनी, त्यातल्या त्यात श्रीमंत देशांनी, संपत्तीमधील इतकी क्रूर तफावत कमी करण्याचा निर्धार केला पाहिजे आणि तशी धोरणं आखायला सुरूवात केली पाहिजे.
ऑक्सफॅम पुढे म्हणतंय की सरकारांनी अधिक सजग असायला हवं. त्यांना मतदान करतात अशा लोकांशी त्यांनी अधिक प्रामाणिक असायला हवं. ज्या गोष्टीतून विषमता अधिक प्रसवते अशा गोष्टी म्हणजे आरोग्यसेवा, दर्जेदार शिक्षण आणि अन्नसुरक्षा. ह्या गोष्टी सरकारनं आपल्याच नियंत्रणात ठेवायला हव्यात. उर्जा, वहातूक व्यवस्था ह्यामध्ये एकाधिकारशाही (मोनोपॉली) होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावं, कारण ह्या व्यवस्थांच्या मालकीत मोनोपॉली झाली तर अतोनात नफा कमावण्याची अचाट ताकद ह्या कॉर्पोरेटसमध्ये येऊ शकते, जे टाळलं पाहिजे.
जगातल्या सर्व देशांच्या सरकारांनी आपापल्या देशांत कॉर्पोरेटसचं नियमन करायला सुरूवात केली पाहिजे. त्यांच्या सर्व व्यवस्थांत, अगदी पुरवठा साखळीपासून ते कामाच्या वातावरणापर्यंत सध्या ह्या कॉर्पोरेटसना खूप मोकळीक मिळालेली आहे. त्यावर नियंत्रण हवं आहे. आपल्या अहवालात ऑक्सफॅम पुढे असंही म्हणतं की कामगार, कामगार संघटना, त्यांच्या समित्या ह्यांना ताकद दिली गेली पाहिजे. स्थानिक समाजातल्या छोट्या संघटना, नागरी संघटना ह्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. ह्याच्या पुढची ऑक्सफॅमची सूचना तर फारच महत्वाची आहे. म्हटलं आहे, भलामोठ्या अगडबंब कॉर्पोरेटसना उत्तर म्हणून नवीन प्रकारच्या अधिक लवचिक, जिथे अधिक मोकळेपणा आहे, नाविन्य आहे, मानवी स्पर्श आहे अशा व्यावसायिक संस्था शोधल्या पाहिजेत.
एका अर्थानं, ऑक्सफॅमनी इथे भांडवलशाहीनी अधिक मानवी, अधिक सहभागी, अधिक मोकळं रूप धारण करण्याची सूचना केली आहे. मला आठवतं काही वर्षांपूर्वी एका सेमिनारमध्ये आयसीआयसीआयचे तेंव्हाचे अध्यक्ष वाघुल असं म्हणाले होते की कॉर्पोरेटसनी निव्वळ चॅरिटी म्हणून समाजकार्य करायला नाही पाहिजे. आसपासचा समाज शांत, समाधानी, शिक्षित असेल तरच आपण टिकू, आपला धंदा चालेल. त्यामुळे कॉर्पोरेटसचं सामाजिक काम ही चांगल्या धंद्यासाठी आवश्यक गोष्ट आहे.
रमेश आणि सविताला नवनव्या संधी मिळाव्यात, त्यांच्यातली आणि अति-श्रीमंतातली दरी कमी व्हायला सुरूवात व्हावी. हे होण्यासाठी काय व्यापक बदल करायला हवेत, सरकारांनी काय करायला हवं ह्याचं एक सूत्र ऑक्सफॅमनी दिलं आहे. “ह्या ऑक्सफॅमसारख्या संस्था कायमच काहीतरी नकारात्मक काढून वायफळ विरोध करत रहातात” असं म्हणून हा अहवाल दुर्लक्षित केला जाऊ नये. चांगलं राज्य चालवण्यासाठी, आणि ते तसंच कायम चालू ठेवण्यासाठी काय करावं ह्याचं सूत्र ह्यात आहे. आज जे सत्तेत आहेत त्यांनाही त्याचा उपयोग होईल आणि ज्यांना सत्तेत यायचं आहे आणि देश चांगला चालवायची मनीषा आहे, त्यांनाही.
थोड्या वेळापूर्वी पक्षातल्या एका सहकारी मित्राचा फोन आला. म्हणाला “महानगरपालिकेत गेलो होतो, मराठी पाट्यांबाबत निवेदन द्यायला. तर तिथले अधिकारी म्हणाले, जरा न्यायालयाचं निकालपत्र दाखवा.” वाटलं, कायदा काय आहे आणि न्यायालयानं काय निकाल दिला आहे ते ज्यांनी आम्हाला सांगायचं, तेच आम्हाला म्हणताहेत “कायदा दाखवा”.
असो, मग वाटलं ह्यावर नीट प्रकाश टाकला पाहिजे.
मराठी पाट्यांविषयी “महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७” हा मूळ कायदा आहे. त्यावर आधारित “महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८” चे नियम बनवले आहेत. म्हणजे थोडक्यात मूळ कायदा प्रत्यक्षात कसा राबवायचा त्याबद्दलच्या सूचना. (दोन्हींचे दुवे सोबत जोडले आहेत)
ह्या नियमांमधला ३५ क्रमांकाचा नियम सर्वात महत्वाचा आहे. तो नियम म्हणतो:
३५. नामफलक मराठीत असावा.- प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे:
परंतु, मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. तथापि, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.:
परंतु, आणखी असे की, ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुषांची किंवा गड-किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत.
ह्यावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएट आणि विरेन शहा मुंबई उच्च न्यायालयात गेले. त्यांनी १) महाराष्ट्र सरकार २) मुंबई महानगरपालिका ३) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ४) भारत सरकार ह्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला.
तो दाखल करताना त्यांनी भारतीय संविधानाप्रमाणे आमच्या स्वातंत्र्यावर घाला येतो आहे वगैरे मुद्दे मांडले. ते मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. पण, त्याबरोबर त्यांनी मराठी पाट्या का नकोत ह्यासाठी आणखी तीन मुद्दे मांडले आहेत. ते असे:
१) निवडणूक आली की ह्यांना “मराठी माणूस” आठवतो. मराठी पाट्यांचा आग्रह हा राजकीय दृष्टीनी प्रेरक आहे. २) फार झपाट्यानं मराठी माध्यमाच्या शाळाही कमी होत आहेत. आणि, ३) मराठी माध्यमाच्या शाळाच कमी होताहेत तर काही दिवसांनी मराठी समजणंच कमी होईल, मग मराठी पाट्यांचा इतका आग्रह का?
दुकानदार आणि व्यापारी मंडळींनी काढलेले तीनही मुद्दे अत्यंत संतापजनक आहेत. आपल्यालाच काय परंतु मा. उच्च न्यायालयालाही ते संतापजनक वाटले म्हणून त्यांनी याचिकाकर्त्यांना २५,००० रूपयांचा दंडही ठोठावला. आपल्या निकालपत्रात मा. उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की ज्या लोकांसोबत याचिकाकर्ते रहातात आणि त्यांच्याबरोबर व्यवसाय करतात अशा स्थानिकांविषयी आणि त्यांच्या भाषेविषयी किती ही घृणा!
ह्या निकालाच्या विरोधात हे याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले. पण तिथेही डाळ शिजली नाही. २५ सप्टेंबर २०२३ ला त्यांनी ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन महिने मागून घेतले. ते संपून आता एक आठवडा होऊन गेला.
थोडक्यात असं:
१) ह्या कायदा महाराष्ट्राचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक दुकान आणि आस्थापनाला हा कायदा लागू आहे. फक्त मुंबईपुरता नाही.
२) ह्यात देवनागरी लिपीतील मराठी भाषा ही सर्वात आधी असली पाहिजे आणि देवनागरी लिपीतील मराठी अक्षरांचा आकार हा इतर भाषांच्या अक्षरांच्या आकारापेक्षा कमी नसला पाहिजे. दुकान किंवा आस्थापना कितीही लहान असो की मोठी, त्यांना हा कायदा लागू आहे.
३) आस्थापना म्हणजे कुठल्या? ह्यात तर यादी खूप मोठी आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायांची कार्यालयं, व्यापारी संस्था, व्यापारी पेढ्या, कारखाने, उद्योग (अगदी सॉप्टवेअर कंपन्याही), बॅंका, विमा कंपन्या, रूग्णालयं, दवाखाने, वास्तुविशारद, लेखापाल ह्यांची कार्यालयं, सामाजिक संस्था, उपाहारगृहे, पथिकाश्रम (हॉटेल्स), चित्रपटगृहे हे सर्व आस्थापनांत येतात. ह्यात सामाजिक संस्थाही असल्यानं शाळा, महाविद्यालयंही येतात.
४) ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थाची (स्थानिक प्रशासन) आहे.
५) ह्या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास कलम २९ प्रमाणे एक लाखापर्यंत दंड लावता येऊ शकतो आणि नंतर अशी पाटी लावायला जितका उशीर लागेल त्या प्रत्येक दिवसाला २,००० रूपये दंड आहे.
प्रत्यक्ष कायदे पहा, नियम पहा. सर्व दुवे (लिंक्स) सोबत देतो आहे.
पाट्या हा विषय फक्त एका छोट्या पाटीपुरता मर्यादीत नाही.
सार्वजनिक वातावरणातला तो एक ठसा आहे. तो एक संदेश आहे की तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि इथल्या मातीची, इथल्या लोकांची भाषा मराठी आहे.
जिथे मराठी पाटी नसेल तिथे समजा की हा ह्या देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या कायद्याचा अपमान आहे, मराठीचा अपमान आहे, मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा अपमान आहे.
भाषा ही आपली ओळख आहे मित्रांनो. भाषा हे आपलं अस्तित्व आहे, मित्रांनो. तो काही फक्त राजकीय मुद्दा नाही. सांस्कृतिक अस्तित्वाचा विषय आहे.
कुठे मराठी सोडून इतर भाषेतली पाटी दिसली तर खालील गोष्टी करा:
१) ताबडतोब त्या पाटीचा आणि आसपासच्या परिसराचा फोटो काढून ठेवा. म्हणजे तुमच्याकडे पुरावा राहील.
२) त्या दुकानाच्या किंवा आस्थापनेच्या प्रमुखाला जाऊन कायदा आणि नियम काय आहे ते शांतपणे सांगा. तुमच्याकडे असलेला कायदा आणि नियम दाखवा किंवा त्याचे दुवे (लिंक्स) त्यांना द्या. वास्तविक कायदा समजून व्यापार करण्याची त्यांची जबाबदारी आहे. तसेच त्यांना माहीत नसेल तर त्याविषयी त्यांना सांगण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे.
३) नंतर, त्या दुकानाचे किंवा आस्थापनाचे नाव, पत्ता महानगरपालिकेच्या सक्षम अधिकारी कार्यालयाला पाठवा (मेसेज, व्हॉटसअप). सोबत फोटो जोडा. ह्याची प्रत त्या कार्यालयाच्या वरच्या कार्यालयालाही माहितीसाठी पाठवा. ह्याचा पुरावा ठेवा.
४) दोन दिवस थांबूनही पाटी तशीच असेल तर महानगरपालिकेच्या संबंधित सक्षम कार्यालयाला लेखी पत्र द्या. पत्र दिल्याचा आवक क्रमांक घेऊन तिथल्या संबंधीत माणसाची सही घ्या. ह्याचीही प्रत त्या कार्यालयाच्या वरच्या कार्यालयाला पाठवा. तिथेही आवक क्रमांक घेऊन तुम्ही संबंधित खात्याला कळवलं असल्याचा पुरावा जमा करा.
५) इतकं होऊनही काही झालं नाही तर स्थानिक प्रशासनाला सर्व पुरावे सादर करा आणि आंदोलन करून त्यांना सर्व मराठी पाट्या लावण्याबाबत आग्रह धरा आणि तसं करून घ्या.
६) तरीही काही झालं नाही तर (इतकी वेळच येणार नाही खरंतर) तेथील न्यायालयाकडे धाव घ्या. तिथल्या स्थानिक प्रशासनाला दोषी ठरवा. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे असा आरोप लावा. तसं पत्र द्या. त्याची प्रत उच्च न्यायालयालाही द्या.
७) ह्याविषयी तिथल्या वृत्तपत्रांना आणि माध्यमांना ह्याविषयी माहिती सांगा. त्यांना हे वृत्त छापण्याची विनंती करा.
लक्षात असू द्या. महाराष्ट्रात मराठीत नसलेली प्रत्येक पाटी मराठीचा, मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि देशाच्या कायद्याचा अपमान आहे.
मूळ कायदा:
https://www.indiacode.nic.in/bitstream/123456789/15923/1/the_maharashtra_shops_and_establishments_%28regulation_of_employment_and_conditions_of_service%29_act%2C_2017.pdf
कायद्यावरून आलेले नियम: ३५ क्रमांकाचा नियम पहा.
https://mahakamgar.maharashtra.gov.in/writereaddata/Portal/Images/pdf/Regulation_of_Employment_Conditions_of_Service_Rules_2018.pdf
पहा:
(1)
Federation of Retail Traders Welfare Association & Anr vs State of Maharashtra & Ors
Writ Petition (L) №4162 of 2022, dated 23rd February 2022
(2)
Supreme Court of India
Writ Petition (s) (Civil) No(s). 775/2022
Federaion of Retail Traders Welfare Association & ANR.
VERSUS
The State of Maharashtra
Dated 25–09–2023.
स्वयंसेवी कामाची उज्वल परंपरा
महाराष्ट्राच्या जडणघडणीमधे सामाजिक स्वयंसेवी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. एका अर्थानं ह्या क्षेत्रानं महाराष्ट्राचं वैचारिक पुढारपण केलं आहे. हा एक गौरवशाली इतिहास आहे हे खरं, पण पुढे काय होईल सांगता येत नाही.
संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा हा किस्सा आहे.
१९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांना “भारतरत्न” पुरस्कार मिळाला. समाजकार्यासाठी मिळालेला देशातला हा पहिला “भारतरत्न” पुरस्कार. महाराष्ट्राला मिळालेलाही पहिलाच. हा पुरस्कार मिळाला तेंव्हा नेहरूंनी आपल्या भाषणात कर्व्यांच्या सामाजिक कामाचं भरभरून कौतुक केलं. भाषण संपता संपता नेहरू म्हणाले “अण्णा, तुम्ही प्राचीन भारतातल्या ऋषीसारखे आहात. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या.” महर्षी कर्वे बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, “माझ्या आयुष्यातल्या सर्व आकांक्षा आता पूर्ण झाल्या आहेत. आता फक्त एक इच्छा उरली आहे. मला माझ्या डोळ्यांनी संयुक्त महाराष्ट्र झालेला पहायचा आहे.” त्यांच्या ह्या वाक्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला नैतिक बळ मिळालं. दोनच वर्षांनी त्यांची इच्छा पूर्णही झाली.
हा प्रसंग बोलका आहे. महाराष्ट्रातल्या सामाजिक कामाचं वैशिष्ट्य अधोरेखीत करणारा आहे. महर्षी कर्वे असं बोलले तेंव्हा राजकारण तापलं होतं. नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र होणं मान्य नव्हतं. उलटसुलट चर्चा सुरू होती. परंतु तरीही आयुष्यात कधीही राजकारणावर न बोललेले महर्षीं अगदी महत्वाच्या क्षणी बोलले. माझं काम सामाजिक असलं तरी मला राजकीय विचार आहे. सामाजिक कामालाही राजकीय भान असावं लागतं, हे त्यांनी ह्यातून सांगितलं.
महाराष्ट्रातलं सामाजिक स्वयंसेवी काम व्यापक राजकारणाशी बांधलेलं आहे. त्यामागे व्यापक परिवर्तनशील विचार आहे. आपल्या कामातून आपण समाजातल्या उणीवांवर उपाय तर शोधलाच पाहिजे पण तो शोधल्यावर त्याचा परिणामही सर्व समाजावर झाला पाहिजे, तशी धोरणं आखली पाहिजेत. ती आखायला आपण मदत केली पाहिजे ही धारणा महाराष्ट्रात दिसते. इथल्या भूमीतलं सामाजिक भान मोठं आहे. फार मुलभूत काम केलेल्या आणि विलक्षण प्रयोग केलेल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्थाची मी नुसती नावं ओळीनं लिहायला सुरूवात केली तरी ह्या लेखासारख्या चार-पाच लेखांचा ऐवज तयार होईल, इतका मोठा इतिहास इथल्या सामाजिक कामाचा आहे. फार क्वचित ह्या ताकदीचं सामाजिक क्षेत्र जगात इतरत्र कुठे असेल असं माझं मत आहे. अर्थात इतकं असलं तरी आपण इथे मुख्यत: १९६० नंतरच्या सामाजिक स्वयंसेवी कामाचा धावता आढावा घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि राज्यभर उत्साहाचं वातावरण तयार झालं. संयुक्त महाराष्ट्रासारख्या एका लोकचळवळीतून राज्याची स्थापना झाल्यामुळे सर्वत्र नव्या आकांक्षा, नवा उत्साह होता. उद्योग असो, शेती असो किंवा शिक्षण क्षेत्रं असो. नवा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न सर्वांच्या मनात होतं. ह्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक स्वयंसेवी चळवळीवरही झाला. त्यातूनच १९६० च्या दशकातील स्ययंसेवी कामाचा आशय ठरला. ज्या आशयाचं सर्वसाधारण सूत्र “सेवा, शिक्षण आणि तांत्रिक मदत” असं होतं.
अर्थात १९६० च्या आधीही समाजकार्याची, समाजसुधारणेची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला होती. संतांनी केलेल्या प्रबोधनाच्या शिकवणीवर मराठी मनाची मशागत झाली. महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायच्या आधी सामाजिक कामाचे तीन प्रमुख वैचारिक प्रवाह महाराष्ट्रानं पाहिले, त्याचा फक्त उल्लेख करून पुढे जाऊ म्हणजे त्यातून नंतरच्या सामाजिक कामाचा स्वभाव कसा बनत गेला हे लक्षात येईल… पहिला प्रवाह मिशनरी कामाचा, दुसरा गांधीवादी विचारसरणीचा आणि तिसरा प्रवाह महात्मा जोतीराव फुल्यांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाचा, परिवर्तनवादी विचारसरणीचा. राज्य स्थापन झालं तेंव्हा ह्या विचारांची कामं कुठेकुठे सुरू होती. काही फार प्रभावशाली होती. मग ती मिशनरी संस्थांनी ठिकठिकाणी उभी केलेली रूग्णालयं असोत किंवा मुख्यत: विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागात गांधीवादी कामांची उभी राहिलेली साखळी असो किंवा त्याच वळणाचं बाबा आमट्यांचं आनंदवन किंवा अमरावतीच्या तपोवनातील शिवाजीरावांचं महारोग्यांसाठी उभं केलं काम असो. तसंच महात्मा फुल्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन १९१९ साली स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था असो.
राज्याची स्थापना झाली तेंव्हा राज्यात सर्वत्र उद्योग, सहकार, सामाजिक न्याय आणि शिक्षण ह्या क्षेत्राला प्राधान्य देण्याचं सूत्र होतं. सरकारी धोरणांची पावलंही तशीच पडत होती. तोच सूर पकडून पाणी, शेती, ग्रामोद्योग, आरोग्य आणि शिक्षण ह्या क्षेत्रामधे काम करण्यासाठी कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी विविध संस्थांना आकार दिला. काही नावं घेतली तर ते अधिक स्पष्ट होईल. मूळची मिशनरी कामाची प्रेरणा असूनही त्यावेळच्या धान्यटंचाईकडे पाहून शेतीतलं उत्पन्न वाढावं म्हणून १९६६ ला तांत्रिक मदत करणारी ऍफ्रो (Action for Food Production) त्यावेळच्या दुष्काळी नगर जिल्ह्यात स्थापन झाली. ज्या संस्थेचा विस्तार नंतर प्रचंड वाढला अशी मणीभाई देसाईंनी स्थापन केलेली भारतीय आग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन (BAIF) १९६७ साली सुरू झाली. त्यानंतर दोनच वर्षानी शेतीलाच प्राधान्य देऊन काही मिशनरी इंजिनियर्सनी स्थापन केलेली “मराठवाडा शेती सहाय्य मंडळ” किंवा पाण्यासारख्या विषयावर काम करणारी पण स्वयंसेवी संस्थांना तंत्रज्ञानाची मदत करणारी “अफार्म” उभी राहिली. शिक्षणाच्या क्षेत्रात नंतर शिक्षण संस्थांचं प्रचंड जाळं उभं केलेल्या भारती विद्यापीठाची स्थापनाही १९६४ ची आहे. त्याच सुमारास जामखेडला आरोग्यसेवेचं काम डॉ. आरोळ्यांनी सुरू केलेलं दिसतं. अशा सेवाभावी कामानी ६० च्या दशकात सामाजिक कामाचे अनेक नवे प्रयोग उभे केले.
तीच रेष पुढे ओढत साधारण सत्तरच्या दशकाच्या मध्यापर्यंत शिक्षण, शेती, आरोग्यसेवा, ग्रामोद्योग ह्या विषयांवर महाराष्ट्राच्या सामाजिक स्वयंसेवी क्षेत्राचं प्राधान्यानं लक्ष होतं. नंतर मात्र ह्यात अमूलाग्र बदल व्हायला सुरूवात झाली ती साधारण ७० च्या दशकाच्या मध्याला. जगाच्या इतिहासात जसं सत्तरचं दशक हे “बदलांचं दशक” म्हणून आपण ओळखतो, तसंच महाराष्ट्राचंही आहे. महाराष्ट्रातही त्यावेळी बरीच उलथापालथ झालेली दिसते. शिवसेनेचा उदय झालेला आहे. युक्रांद, छात्र युवक संघर्ष समिती, विविध विद्यार्थी संघटना, पतितपावन सारख्या संघटना विद्यार्थी आणि युवकांचं भावविश्व ढवळून टाकत होत्या. दलित, भटक्या समाजातले कार्यकर्ते लिहू लागले होते. ग्रंथाली वाचक चळवळ जोरात होती. साहित्यिक, कवि कोंडलेल्या मनांना वाट करून देत होते. महिला हक्काचा आवाज वाढू लागला होता. ग्राहक चळवळ आकार घेत होती. आदिवासी भागात चळवळी वाढत होत्या. शेतकरी संघटना शेतीतल्या अर्थशास्त्राची वेगळी मांडणी करत होती. नामांतर आंदोलन जोर धरू लागलं होतं. महाराष्ट्रातलं समाजजीवन ढवळून निघत होतं.
ह्या तापलेल्या सामाजिक अस्वस्थतेतून परिवर्तनवादी परिभाषा महाराष्ट्राच्या समाजमनात तयार होऊ लागली. मुलभूत हक्क, अधिकार, सामाजिक न्याय, पाणलोट क्षेत्र विकास अशा विषयांवर दूरदूर गावात, छोट्या खेड्यापाड्यात, शहरी वस्त्यांमध्ये अनेक छोटेछोटे सामाजिक स्वयंसेवी काम करणारे गट उभे राहिले. सामाजिक कामाच्या विस्ताराचा हा काळ आहे. हा विस्तार व्हायला त्याच काळात फार मोठया प्रमाणात सामाजिक कामाला परदेशी पैसाही उपलब्ध झाला हे ही एक कारण आहे. परंतु १९७५ पर्यंत महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याची अदभुतरम्यता विरलेली होती आणि समाजातल्या अनेक घटकांमध्ये अस्वस्थता होती हे ही महत्वाचं आहे. मराठी भाषिकांचं स्वत:चं राज्य आलं तरी आपल्याला अजून संधी मिळत नाही, आपले मुलभूत अधिकारही अजून मारले जात आहेत ह्याची जाणीव अनेक समाजसमूहांना झाली. त्यांच्या इर्षेनंदेखील ह्या परिवर्तनवादी सामाजिक स्वयंस्फूर्त कामांना ताकद मिळाली.
आज नावारूपाला आलेल्या अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था ह्याच काळात सुरू झालेल्या दिसतात. ह्या नावांची नावांची यादी फार मोठी आहे. स्वयंसेवी संस्थांना एनजीओ म्हणायला देखील ह्याच काळात सुरूवात झाली. अर्थात काहीही असलं तरी ही २० वर्ष विविध सामाजिक प्रश्नांवरच्या चळवळींची, आंदोलनांची २० वर्ष आहेत ह्यात शंका नाही. ह्या आंदोलनांनी कित्येक महत्वाचे प्रश्न ऐरणीवर आणले, काही तर इतके टोकाला नेले की त्यातून धोरणांवर बदल केला गेला. नवे कायदे तयार केले गेले. स्त्री मुक्ती संघटना, क्रांतीकारी महिला संघटना अशांच्या विविध लढ्यातून महिला धोरण ठरायला मदत झाली. शोषित जनआंदोलन, जबरनजोत आंदोलन कृती समिती, श्रमजिवी संघटना, श्रमिक संघटना, भूमीसेना, लेखा-मेंढा गावातील आदिवासी स्वशासनाचा आग्रह, रायगडमधील दळी जमिनींचा प्रश्न अशांसारख्या आंदोलनांनी आदिवासी, जल-जंगल-जमीन अशांसारख्या विषयांवर कितीतरी नवे कायदे आले, आदिवासींना त्यांचे हक्क मिळायला सुरूवात झाली. अंधश्रध्दा निर्मूलन, दारूमुक्ती आंदोलन, मानवी हक्क अभियान अशा चळवळींनी अनेक सामाजिक उणीवांवर नेमकं बोट ठेवलं.
ह्याच सगळ्या काळात महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांनी पाण्याच्या प्रश्नांवर फार धडाकेबाज काम केलं. सध्याच्या जलयुक्त शिवार योजना किंवा पानी फाऊंडेशनच्या कामाचा पाया ह्याच २० वर्षात घातला गेला. महाराष्ट्रात पाण्यावर जितकं काम झालं तितकं जगात कुठे झालं असेल असं मला वाटत नाही. अफार्मनी चालवलेला इंडो-जर्मन वॉटरशेड प्रकल्प, आफ्रो, ग्रामायन, मानवलोक, मराठवाडा ईको ग्रुप अशी कितीतरी नावं ह्या अनुषंगानं घेता येतील. आरोग्याच्या क्षेत्रातही गडचिरोली जिल्ह्यातील “सर्च” सारख्या संस्थेनी केलेलं काम आणि संशोधन आज देशात कितीतरी राज्यांमध्ये किंवा जगात कितीतरी देशांमध्ये तिथल्या योजना आखण्यासाठी कामाला आलेलं आहे. ह्या सगळ्या काळात एका विषयाला वाहून घेतलेली संस्था-संघटनांची नेटवर्क्स आपल्याला दिसतात. त्यात जमीन अधिकार आंदोलन असो किंवा सेहत, मेडिको फ्रेंन्ड्स सर्कल असो. आरोग्याच्या क्षेत्रात कितीतरी मूलगामी काम ह्या मंडळींनी केलं.
साधारण ९५ च्या सुमारास ह्यातल्या काही संस्था संघटना स्थिरावल्या आणि त्यांनी संशोधन, धोरण समर्थन (Advocacy), माध्यम समर्थन (Media Advocacy) अशी कामं सुरू केली. एखाद्या विषयाला किंवा प्रश्नाला वाहून घेतलेली असंख्य उदाहरणं ह्या काळात उभी राहिलेली दिसतात. प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिलेल्या “प्रथम” सारख्या संस्थेचा ह्या काळातला विस्तार अदभुत आहे. एखाद्या उद्योग संस्थेला बरोबर घेऊन, सीएसआरचं प्रकरण सुरू होण्याआधी, निधी संकलन करत करत त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या दूरावस्थेवर नेमकं बोट ठेवलं आणि उत्तरं शोधली. ह्याच काळात म्हणजे साधारण १९९५ नंतर महिलांचा, मुख्यत: स्थानिक, राजकारणात सहभाग वाढावा म्हणून जे कायदे आले त्या आधारानं उभं राहिलेलं ‘महिला राजसत्ता आंदोलन” हे आणखी एक उदाहरण आहे. खेडोपाड्यातील महिलांनी राजकारणात यावं आणि त्यावर वेगळी छाप टाकावी म्हणून काम करत असलेल्या ह्या आंदोलनानी खूप खोलवर आणि मोठा परिणाम घडवून आणलेला आहे. हीच रेष पुढे ओढत १९९५ नंतरच्या काळात महिला बचत गटांनी ग्रामीण गरीब आणि शहरी कष्टकरी महिलांचं भावविश्व आर्थिक स्वावलंबनाच्या ध्यासानं भरून टाकलेलं दिसतं.
आणखी एका धारेचा उल्लेख नक्की करावा लागेल. अध्यात्मिक किंवा धार्मिक प्रेरणेतून शुध्द “सेवा” असा हेतू ठेवून गेल्या ३०-३५ वर्षात मोठी कामं महाराष्ट्रात उभी राहिली. जसं की नानासाहेब धर्माधिकारी किंवा पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्या प्रेरणेतून किंवा काही देवस्थानांच्या प्रतिष्ठानातून उभी राहिलेली विविध विकासकामं. ह्या कामातला सेवा, करूणा आणि काही सोयी-सुविधांची उभारणी करण्याचा भाव मोठा आहे. कित्येकांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि संधी ह्या कामांनी दिली.
असंख्य कामं आहेत. वर म्हटलं तसं नुसती नावं घेतली तरी असे चार-पाच लेख होतील. मुद्दा नावांचा नाही. त्यांनी उमटवलेल्या ठश्याचा आहे. महाराष्ट्राचा स्वयंसेवी क्षेत्राचा गेल्या साठ-सत्तर-शंभर वर्षांचा इतिहास पाहिला तर तो अदभुत आहे. समाजाचं मन तयार करणं, समाजशिक्षण, नवनवे प्रयोग करणं, न बोलल्या गेलेल्या विषयांकडे समाजाचं लक्ष वेधणं, धोरणांवर तसंच कायद्यांवर परिणाम करणं ह्यासारखी कितीतरी कामं ह्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी केलेली दिसतात.
गेल्या १०-१५ वर्षात मात्र महाराष्ट्राची सामाजिक स्वयंसेवी चळवळ थिजल्यासारखी दिसते. एकेका विषयाला वाहून घेऊन काम करता करता त्यांच्या कामाची बेटं झाली. व्यापक समाजपरिवर्तनाशी, राजकारणाशी त्यांची नाळ तुटली. स्वयंस्फूर्त उर्मीपेक्षा “प्रकल्प राबवण्याच्या यंत्रणा” असं काहींचं स्वरूप झालं. ह्यात मग सीएसआर शिरलं. त्यानं उद्योगसंस्थांच्या प्राधान्यांना महत्व आलं. लोकाधार कमी कमी होत कंपनी-आधार, सरकार-आधार किंवा फंडिग-एजन्सी आधार महत्वाचा झाला. मग सिने अभिनेते येऊन पाणी कसं वाचवायचं ह्याचे धडे देऊ लागले. त्यांच्या प्रसिध्दीचा लखलखाट आला. मागोमाग माध्यमं आली. महाराष्ट्रातील सामाजिक कामाचा सूरताल बदलला.
फुले असोत किंवा गांधी किंवा आणखी कुणी. समाजाकडे पहाण्याचे त्यांनी दिलेले चष्मे आता उपयोगाचे ठरतीलच ह्याची खात्री नाही इतकं वास्तव बदललं आहे. एकेकाळी ह्या क्षेत्रानं महाराष्ट्राचं वैचारिक पुढारपण केलं पण आता माहीत नाही, कारण स्वयंसेवी क्षेत्राच्या मागे अस्वस्थ समाजही उभा असावा लागतो. ते झालं नाही तर इतिहास गौरवशाली आहे, पण पुढे काय होईल माहीत नाही.
अनिल शिदोरे anilshidore@gmail.com
सरकारनं आरोग्यावरचा खर्च वाढवला पाहिजे
विजय मूळचा परभणीच्या गंगाखेडचा. पुण्यात एका डॉक्टरकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला १७,००० पगार आहे, भाड्याचं घर आहे रहायला. तो, त्याची बायको आणि दोन लहान मुलं असे सोबत असतात. गावाला त्याचे वडील ८० वर्षांचे आहेत. शेतावर जाताना ते दगडाला ठेच लागून पडले. डोक्याला मार लागला. विजयला फोन आला तेंव्हा रात्रीच्याच बसनं तो गावी पोचला. वडिलांना रूग्णालयात दाखल केलं. सरकारी रूग्णालयात नीट सोय नव्हती म्हणून खाजगी रूग्णालयात न्यावं लागलं. वीस दिवसाचं रूग्णालयात रहाणं, औषधोपचार, शस्त्रक्रिया धरून विजयला ७७,००० रूपये खर्च आला. कामावर एक महिन्याचा खाडा झाला म्हणून एक महिन्याचा पगार बुडला. बाकी मग प्रवासखर्च वगैरे धरून ७,००० खर्च आला.
एका दगडावरून पडण्याचं निमित्त झालं आणि लाखावर खर्च गेला.
विजयला १७,००० रूपयेच पगार आहे. घरभाडं, दिवाबत्ती धरून ४,५०० रूपये खर्च होतो. म्हणजे हातात १२,५०० रूपयेच रहातात. त्याच्या बॅंकेत गेल्या पाच वर्षात बचत करून साठवलेले ४०,००० रूपये तर एका फटक्यात गेलेच पण जे ६०,००० चं कर्ज झालं ते आणि त्याचं व्याज फेडायला त्याला सहा ते सात वर्ष लागतील. एका दगडावरून घसरण्याचं निमित्त झालं आणि दहा वर्षांची बचत संपली.
असे हजारो-लाखो विजय देशात आहेत. विजयचं असं का झालं हे पहायला गेलो तर काय दिसतं?
१) जगात आरोग्यावर सर्वात कमी खर्च करणारे जे काही थोडके देश आहेत त्यात भारत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) किती टक्के पैसा त्या देशाचं सरकार आरोग्यावर करतं अशी क्रमवारी २०१६ साली लावली गेली तेंव्हा भारताचा क्रमांक १८८ देशात १७० वा होता.
२) ह्यावर्षी आपलं सरकार सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.६% रक्कम आरोग्यावर खर्च करेल. जे प्रमाण आत्तापर्यंतच्या वर्षात सर्वाधिक आहे. कारण गेल्या दहा वर्षात हे प्रमाण ०.९% ते १.३% ह्या पातळीवर आहे. पण, ह्याच बाबतीत आपण दीट टक्क्याच्या आसपास असताना अमेरिका आहे १७%, स्वित्झरलॅन्ड आहे १२.१%, जर्मनी आहे ११.७%. चला क्षणभर मानू की हे श्रीमंत देश आहेत पण ह्याच बाबतीत ब्राझील खर्च करतं आहे ९.२%, रशिया ५.३% आणि चीन ५%. आपण मात्र एक ते दीड टक्क्यांच्या आसपास.
३) आणखी एक आकडेवारी फार भयानक आहे. आपल्या देशात एकूण आरोग्य ह्या विषयावर जितका खर्च होतो त्यातला सुमारे ६०% खर्च विजय सारखे लोक स्वत:च्या खिशातून करतात. जेंव्हा जगाची सरासरी आहे अवघी १८.२%. ह्याला OOPE किंवा Out of Pocket Expenses म्हणतात. हेच प्रमाण इंग्लंडमधे ९.७% आहे, अमेरिकेत ११% आहे तर श्रीलंकेतही ४२.१% आहे. पण आपण मात्र ६२% वर आहोत. असं जर असेल मग विजयसारखे लोक एका आजारात कर्जबाजारी होणार नाहीत तर काय?
४) आपल्याकडे शहरातील आरोग्यव्यवस्था ७८% खाजगी क्षेत्रं पहातं तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ७१% आहे. खरंतर Clinical Establishments (Registration and Regulation) Act 2010 हा केंद्रपातळीवरील कायदा खाजगी आरोग्य व्यवस्था, खाजगी रूग्णालयं, ह्याविषयी काही कडक निर्देश देतो परंतु त्याची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही आणि म्हणून विजय हे विचारू शकत नाही की मला ७७,००० रूपयांचं बील कसं आलं? ह्याबरोबरच प्रत्येक राज्यानंही असे कायदे आणि नियम करायचे आहेत त्याचीही नीट अंमलबजावणी नाही.
निर्मला सिथारामन आता पुढचा अर्थसंकल्प कसा असावा ह्या विचारात असतील. त्यांनी आरोग्यावरचा खर्च वाढवावा आणि आयुष्मान भारतासारखी चांगली योजना आज जी फक्त ३५% लोकसंख्येपुरतीच सिमीत आहे त्याच्या सीमा वाढतील इकडे लक्ष द्यावे. त्यानं अशा लाखो, कोटी विजयना न्याय मिळेल.
वरील माहिती Ministry of Health and Family Welfare, Pumblic Health Foundation of India, Statista ही संकेतस्थळं तसंच ३ जानेवारीच्या इकॉनॉमिक टाईम्सवरून (लेखक: प्रेरणा कटियार) घेतली आहे… हे संदर्भ जरूर पहा.
रोजगाराच्या आकड्यांपलीकडे ..
रघुराम राजन म्हणतात तसं बेरोजगारीनं त्रस्त असलेले तरूण रस्त्यांवर येतीलही, पण कशासाठी? काय मागतील ते आणि काय होईल त्यातून? बेरोजगारी ही नुसती आकडेवारी नव्हे. ती एक अवस्था आहे. जे समाजाच्या तब्येतीचं कारणही आहे आणि परिणामही. ह्या पुढची १० वर्ष रोजगाराला केंद्रस्थानी ठेवून नियोजन केलं पाहिजे. तोच मार्ग आहे.
अनिल शिदोरे
कडक दुपारची वेळ. वृत्तपत्रं चाळत, बातम्या बघत बसलो होतो, आणि बेल वाजली. दार उघडलं तर समोर घामाघूम झालेला तरूण मुलगा हातात पार्सल घेऊन, सुरक्षित अंतर ठेऊन, उभा. त्यानी दिलेलं पार्सल घेतलं आणि त्याला घाम पुसताना पाहून विचारलं, “पाणी देऊ? थंड?”.. त्यावर तो क्षीणसा हसला. नंतर आमची दोन-पाच मिनिटं बातचीत झाली. त्यात कळलं ते असं.
नाव विलास. माजलगाव, बीडचा रहाणारा. भूगोलात पदव्युत्तर शिक्षण. गावी शेतीचा छोटा तुकडा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. त्या खर्चात वडिलांची दमछाक झाली. आता त्याची मिळेल ते करण्याची तयारी आहे. त्याला माहीत आहे कुरिअरची नोकरी आज आहे, उद्या नाही. त्याची धडपड चालू आहे. ती चालूच राहील.
विलास भेटला त्याच दिवशी वाचलं की एका मुलाखतीत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की बेरोजगारी अशीच चालू राहिली तर तरूण रस्त्यावर येतील. राजन अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्राबाबत त्यांचे विचार निकोप असतात. त्यांनी असं विधान का केलं असावं? त्या विधानाच्या पुढचे आणि मागचे धागे काय आहेत?
साधारण २०१६ पासून आपल्याकडे “रोजगारविरहीत प्रगती” (Jobless Growth) होते आहे. म्हणजे प्रगती होते आहे. जीडीपी वाढतो आहे. शेअर बाजार वर जातो आहे, पण तितका रोजगार वाढत नाही. आकड्यांच्या जंजाळात आपण शिरायला नको, मात्र आपल्या आसपासचं चित्र काय आहे?
एक म्हणजे आधीच जिथे रोजगार आहे तिथेही दिला जात नाहीय. उदाहरण पहा. ह्या कोरोना काळात आरोग्य सेवेत कितीतरी पदं रिकामी आहेत हे आपल्याला दिसलं. म्हणजे पदं आहेत, मंजूर आहेत, त्यासाठी बजेट आहे, आरोग्यासारखं अत्यावश्यक काम आहे, तरीही पदं भरलेली नाहीत. रोजगार कागदावर आहे पण दिला जात नाही. तसंच दुसरं म्हणजे कायम स्वरूपी रोजगार ही कल्पनाही आता कमी होत चालली. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. कायम स्वरूपी रोजगारात सुरक्षितता आहे. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, कंपनीनी केलेली निवासाची सोय ह्यातून जसा ऐदीपणा येऊ शकतो तशी स्थिरताही येऊ शकते. जी सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. जिचं सामाजिक मूल्यं आहे. पण सध्या सर्वत्र कंत्राटावर कामगार घेतले जात आहेत. त्यामुळे रोजगाराबाबत वातावरण असुरक्षित आहे. ज्यानं समाजस्वास्थ्यावर परिणाम होतो, तरूणांच्या जास्त.
रोजगारच नाही ही स्थिती तर आहेच पण त्याच बरोबर कमरोजगारी आहे — म्हणजे शिक्षण वरचं झालं आहे पण नोकरी त्यापेक्षा कमी कौशल्यं लागणारी, खालची म्हणून कमी पगाराची आहे. जसं मला भेटलेल्या कुरिअरवाल्या विलासचं आहे. ह्या कमरोजगारीबरोबर अर्ध-रोजगारीही आहे. म्हणजे एखाद्याची क्षमता खूप काम करण्याची आहे. रोजगार आहे पण पुरेसा नाही. वेळ आहे, उर्जा आहे पण त्याचा उपयोग नाही. एखाद्याचं सगळं कर्तुत्व पणाला लागेल अशी संधीच नाहीय. हे नुसत्या नोकरीत होत आहे असं नाही, धंद्यात, स्वत:च्या उद्योगातही होत आहे. शेतीत तर आहेच. शेतीवर अवलंबून आहेत अशांना पुरेसं काम नाही. शेतीचं अर्थचक्र असं आहे की त्यात काम करणं आकर्षक नाही. ह्या दोन्ही कारणांमुळे तिथे मोठं नैराश्य आहे. ही अर्धरोजगारी आहे. अशी अर्धरोजगारी महिलांच्या बाबतीत खूपच आहे. रोजगारात मुलींना, महिलांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे संधी मिळत नाही. त्यामुळेही नैराश्य आहे.
शिक्षण एका प्रकारचं आणि काम भलत्याच प्रकाराचं हे ही खूप आहे. ज्याला विजोड-रोजगारी म्हणता येईल. म्हणजे एखादा इंजिनीयर असतो पण तो एका वृत्तवाहिनीवर निवेदक म्हणून काम करतो. एखादं मानसशास्त्राचं उत्तम शिक्षण असणारी आणि त्याची आवड असणारी पोल्ट्री फार्मवर हिशेब ठेवण्याचं काम करते. शिक्षण, कौशल्य, अनुभव ह्याचा काही ताळमेळ नाही. अत्यंत नाखुषीनं काम ओढत ओढत नेलं जातं. ह्याला म्हणतात विरूप-रोजगारी किंवा विजोड-रोजगारी. त्यामुळे रोजगार मुळीच नाही हा जसा एक प्रकार आहे, ज्याला आपण बेरोजगारी म्हणतो पण त्याबरोबरच कमरोजगारी (रोजगार आहे पण मोबदला योग्य नाही), अर्धरोजगारी (रोजगार आहे पण कर्तुत्वाला वाव नाही) आणि विरूप-रोजगारीही (अनुरूप नसलेली) आहे. बेरोजगारीच्या ह्या विविध छटा समाजात सर्वदूर, सखोल पसरलेल्या आहेत, ज्यामुळे तरूणांमध्ये अस्वस्थता आहे.
ह्याला आणखी एक दुर्दैवी किनार आहे. ही आहे आज ह्या क्षणी भारताला मिळालेल्या एका विशिष्ट वरदानाची आणि ते मिळूनही आपण दाखवत असलेल्या करंटेपणाची. एखाद्या देशाच्या आयुष्यात साधारण एकदाच एक सुदैवी, सुसंधीचा विलक्षण काळ येतो. त्याला म्हणतात लोकसंख्येचा लाभांश. इंग्रजीत म्हणतात Demographic Divident. म्हणजे असं की “काम करणारी लोकसंख्या अवलंबून असलेल्या लोकसंख्येपेक्षा जास्त असणे”. म्हणजे कामाचे हात अधिक असणे. उत्पादनक्षमता जास्त असणे. म्हणजे, लहान बाळं, बालकं, ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक ह्यांच्यापेक्षा काम करू शकतील अशांची (वय १५ ते ६५) संख्या जास्त असणे.
आपल्या देशाच्या बाबतीत ही संधी २०१८ ला सुरू झाली आणि जवळजवळ ३७ वर्ष म्हणजे २०५५ पर्यंत आपली लोकसंख्या जगात सर्वात तरूण, उत्पादनक्षम आणि कार्य-उत्सुक असणार आहे. चीन २०३१ लाच वयस्क व्हायला सुरूवात करणार आहे. एक उदाहरण पहा, असाच लोकसंख्या लाभांशाचा काळ जपानला सुरू झाला १९६४ ला आणि संपला २००४ ला. १९६४ नंतर ७० च्या दशकात जपाननी कशी मुसंडी मारली होती ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तशी संधी आपल्यालाही आहे. ३७ वर्षांचा काळ आहे. त्यातली तीन वर्ष संपली आहेत. २०१८ ला हा “लाभांश काळ” सुरू झाला आणि तेंव्हापासूनच नेमक्या त्याच वर्षापासून आपल्याकडे “रोजगार विरहीत प्रगती” (Jobless Growth) सुरू झाली. रघुराम राजन ह्यांना इथेच अस्वस्थ वाटत आहे.
फक्त राजन ह्यांना वाटतंय तसा तरूण रस्त्यावर येईल की नाही सांगता येत नाही, किंवा तो रस्त्यांवर येईलही पण आल्यावर कदाचित त्याच्या तोंडी घोषणा असेल रोजगार सोडून भलतीच कुठलीतरी. मग लोकसंख्यावाढीकडे बोट दाखवलं जाईल. इतर भावनिक गोष्टी पुढे केल्या जातील. असंतोषाला भलतीकडे नेण्याचा प्रयत्न होईल. आणि, मग आपल्या सगळ्यांचंच लक्ष मूलभूत आणि महत्वाच्या प्रश्नांकडून भलतीकडे जाईल.
समाजात फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असणं चांगलं नाही, कारण ती एक प्रकारची मानसिक अवस्था आहे. ज्याचा समाजाच्या स्वभावावर परिणाम होतो. समाज उदासीन बनतो. डिप्रेस्स्ड. समाजात नवनिर्मिती हळूहळू थांबते. कारण तरूण कामाशिवाय रहातो किंवा नको त्या कामात व्यस्त राहिल्यानं त्याला सृजनशील होता येत नाही. ह्यातून समाजातल्या वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्याची समाजाची शक्ती कमी होते. नवविचारांचे अंकुर फुटत नाहीत. समाजातला तरूण धाडस करायला तयार होत नाही. रोजगार नाही म्हणून लग्नं जमत नाहीत. व्यक्तिगत आयुष्यात नैराश्य येतं. कुटुंबव्यवस्था कोलमडते. समाजाकडे तुच्छतेने पहाण्याची सवय वाढते. आपल्या जातीत, छोट्या समूहात मग गुरफटवून घेतलं जातं. ह्यातूनही राग आलाच तर तो व्यक्त करायला फेसबुक, व्हाॅटसअप आर्मीज आहेतच. मग समाज वायफळ, फुटकळ होत जातो. संकुचित होतो. कुंठीत होतो. सघन संस्कृती मागे पडते. प्रेरणांचे झरे फुटत नाहीत. जुना इतिहास, नवा भूगोल काढून, एकमेकांवर उखाळ्या-पाखाळ्या काढण्याची संस्कृती तयार होते. हे सारं एका बेरोजगारीमुळे होतं.
त्यामुळे तरूण-तरूणी रस्त्यावर येतीलही, नव्हे येतीलच. पण त्यांची मागणी रोजगाराशी संबंधित असेलच असं नाही. तरूणांमधील ह्या असंतोषाचा भडका उडायला कुठलंही साधं भावनिक कारण पुरेल. त्यात दहा-वीस वर्ष जातील. त्यात मग आपला कुरियरवाला विलासही म्हातारा होईल. देशाचा “लोकसंख्येचा लाभांश” काळही आला तसा निघून जाईल. संधी हुकेल. मग इतिहासाची पानं आपल्याला पुन्हा लिहिता येणार नाहीत. ह्या पुढच्या काळात “रोजगार निर्मिती” हे उद्दिष्ट ठेवून नियोजन करायला पाहिजे. राजकारणाचाही तो विषय झाला पाहिजे. सगळ्या समाजानं तसं ठरवलं पाहिजे. आपल्याकडच्या तरूणांच्या जिद्दीला, आकांक्षांना वाव हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. बाकी कुठलंही नाही.
हे कसं करायचं ह्याचं उत्तर मात्र रघूराम राजन ह्यांनी दिलेलं नाही. ते देशाचा, राज्याचा कारभार आपण ज्यांच्या हातात सोपवला आहे त्यांनी दिलं पाहिजे. ते देत नसतील तर ते त्यांनी द्यावं म्हणून आपण काही केलं पाहिजे. ते काय केलं पाहिजे हा मात्र एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
जसजसे २०११ च्या जनगणनेचे आकडे यायला लागले आहेत तसतसा भविष्यातला भारत कसा असेल ह्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.
सध्या आपली लोकसंख्या ०.९९% नी दरवर्षी वाढत आहे. म्हणजे अशी कल्पना करा की दर १०,००० लोकसंख्येत दर वर्षी ९९ ची भर पडत आहे. काहीही विशेष प्रयत्न न केल्यास ही लोकसंख्या वाढ अजून ४० वर्ष होत राहील. २०५९ नंतर (काहींच्या मते त्याही आधी) ती स्थिरावून नंतर हळूहळू कमी व्हायला लागेल असंही लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणत आहेत.
ही गोष्ट खरी आहे की लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर आपण एका फार महत्वाच्या कालखंडातून चाललो आहोत. ज्याला इंग्रजीत Demographic Dividend म्हणतात किंवा अवघड मराठीत ज्याला “जनसांख्यिकीय लाभांश” म्हणतात तो हा कालखंड.. सोप्या मराठीत असं म्हणता येईल की जेंव्हा उद्योगक्षम, तरूण लोकसंख्या देशात जास्त असते तेंव्हा हा “लाभांश” मिळतो. कारण, काम करणारी, उर्जाक्षम, तरूण लोकसंख्या अधिक असते. असा काळ प्रत्येक देशाच्या आयुष्यात एकदाच येतो, पण त्या काळात त्या देशाची प्रचंड प्रगती होऊ शकते कारण काम करणारी माणसं अधिक असतात आणि त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अवलंबून असणारी कमी.
एक दोन उदाहरणं बघू.
हा “जनसांख्यिकीय लाभांशाचा” काळ जपानच्या बाबतीत सुरू झाला १९६४ ला आणि संपला २००४. बघा ह्याच काळात सोनी, टोयोटा सारख्या कंपन्यांनी आणि जपानी मालानी जगात धुमाकूळ घातला. जपानची अभूतपूर्व प्रगती झाली. हाच काळ चीनच्या बाबतीत १९९४ ला सुरू झाला आणि तो २०३१ ला संपेल. १९९४ नंतर चीननी काय काय प्रगती केली हे आपल्याला माहीत आहे. आपल्या बाबतीत हा काळ २०१८ ला सुरू झाला आणि तो २०५५ पर्यंत असणार आहे, म्हणजे पुढची ३५ वर्ष.
अर्थात ह्या काळात कुठल्याही देशाची प्रगती आपोआप होत नाही, तर त्यासाठी तगडी पण परवडणारी आरोग्यव्यवस्था लागते आणि शिक्षणात जोमदार काम करावं लागतं. ते नसेल तर ह्या “लाभांशाचा” काहीच उपयोग होत नाही किंबहुना ह्या तरूण वर्गाला काम दिलं नाही तर उलट असंतोषच वाढतो.
खरी गडबड आहे ती येत्या ३०-४० वर्षातली लोकसंख्या किती वाढणार आहे, कशी वाढणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठे वाढणार आहे ह्यात.
ह्यातला उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्यांच्यातला फरक फारच जाणवणारा असणार आहे आणि ज्यामुळे देशात काही अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण लोकसंख्यावाढी मधे आपल्या देशातल्या राज्या राज्यांमध्ये फारच फरक आहे.
२०११ ते २०३६ ह्या २५ वर्षात आपल्या देशात लोकसंख्येत जी भर पडणार आहे त्यातली १/३ पेक्षा अधिक भर फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशामुळे पडणार आहे. वेगळ्या पध्दतीनं असं म्हणता येईल की ह्यापुढे जी तीन बाळं देशात जन्माला येणार आहे त्यातलं एक हे फक्त उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या दोन राज्यांमधलंच असणार आहे.
केरळनी १९९८ सालीच आपली लोकसंख्या वाढ थांबवली. तामीळनाडूनी २००० मधे, पश्चिम बंगालनी २००३ मधे, आंध्रनी २००४, कर्नाटक २००५ तर महाराष्ट्रानी २००९ मधेच आपली लोकसंख्यावाढ रोखली. लोकसंख्यावाढ थांबवणं म्हणजे त्याला इंग्रजीत replacement fertility असं म्हणतात किंवा सोप्या मराठीत “ह्या राज्यातल्या आया इतक्याच बाळांना जन्म देतात की ज्यानं लोकसंख्या वाढत नाही तर स्थिर रहाते”. आसाम आणि गुजरातनी लोकसंख्या वाढ ह्या वर्षी म्हणजे २०२० साली थांबवली.
तर छत्तिसगढ ची लोकसंख्या २०२२ पर्यंत, राजस्थानची २०२४ पर्यंत वाढत जाणार आहे. उत्तरप्रदेश आणि झारखंडची लोकसंख्या २०२५ पर्यंत वाढत जाईल तर मध्यप्रदेशची २०२८ पर्यंत तर बिहार मध्ये ही लोकसंख्यावाढ २०३९ पर्यंत होतच रहाणार आहे.
म्हणजे महाराष्ट्रासकट दक्षिणेतील राज्यात लोकसंख्या घटणार तर हिंदी भाषिक उत्तर भारतात ती वाढतच जाणार.
पुढच्या चारच वर्षात बिहार महाराष्ट्राला लोकसंख्येत मागे टाकणार. तर राजस्थान तामिळनाडूला.
दक्षिण भारतात लोकसंख्या स्थिरावणार तर उत्तर भारतात वाढत जाणार. ती ही पुढची ३५ ते ४० वर्ष.
त्यातच येत्या काही वर्षात लोकसभेच्या नव्या जागा लोकसंख्येप्रमाणे ठरणार आहेत आणि ज्या राज्यांनी प्रगती केली, शिस्त पाळली, लोकसंख्या वाढ रोखण्याचं धोरण अवलंबलं त्यांचे खासदार लोकसभेत कमी होणार. कारण, लोकसंख्येप्रमाणे खासदार असतात आणि सहाजिकच ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांचं प्रतिनिधित्व अधिक असणार, आणि हा एक संघर्षाचा मुद्दा होऊ शकतो.
म्हणून आपल्याला Demogrpaphic Divident चा फायदा घ्यायचा असेल तर आरोग्य आणि शिक्षणावर खूप भर दिला पाहिजे म्हणजे काम करायला तयार आहेत अशा सुदृढांची संख्या अधिक असेल आणि अशांच्या हाताला काम देता येईल. तसंच उत्तर आणि दक्षिण किंवा हिंदी भाषिक आणि बिगर हिंदी भाषिकातील संभाव्य संघर्ष टाळता येईल.
नाहीतर, जी लोकसंख्या आज आपली जमेची बाजू आहे तीच गोष्ट देशांतर्गत संघर्षास कारणीभूत ठरेल.
महाराष्ट्र राज्य साठीला आलं. एकेकाळी देशावर राज्य करणारा महाराष्ट्र आज इतरांच्या रांगेत उभा आहे. हजारो वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्राचं “नैतिक होकायंत्र” हरवलं आहे. ते सापडवल्याशिवाय महाराष्ट्राला गती नाही.
अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com
महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्ष झाली. महाराष्ट्राला मात्र हजारो झाली.
तसं पाहिलं तर साठ वर्षांचा काळ कुठल्याही समाजासाठी फार मोठा नाही. पण फार छोटाही नाही. आढावा घेण्याइतपत पुरेसा आहे.
“आपलं राज्य आपणच चालवलं पाहिजे” अशा स्वाभिमानी बाण्यातून “स्वराज्य” स्थापन झालं. ती मराठा साम्राज्याची मूळ प्रेरणा. ती ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवली. नंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि मराठा साम्राज्यानं जवळजवळ सगळ्या देशावर राज्य केलं आणि आपला प्रभाव पाडला. थोडा-थोडका नाही तर मराठा साम्राज्याचा भारतीय राजकारणावरचा प्रभाव सुमारे १४४ वर्ष टिकला. म्हणजे अगदी नेमकं बोलायचं तर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेंव्हापासून ते इंग्रजांनी १८१८ ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावण्यापर्यंत. बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, झांशी, धार ह्यासारख्या संस्थानांनी हा प्रभाव आणखी वाढवला. हा प्रभाव फक्त राजकीय नव्हता तर संस्कृती, समाजकारण ह्यावरही होता.
मराठा साम्राज्यावर निर्विवाद विजय मिळवेपर्यंत इंग्रज शांत नव्हता. अगदी १८१८ ला पेशवाईचा अस्त झाल्यावरही पुढे १८५७ पर्यंत स्वराज्यातील हे अंगार कुठे ना कुठे इंग्रजाला छळत राहिले. नडत राहिले. म्हणूनच नंतर इंग्रजांनी विशेष हुकूम काढून मराठी माणसाला जिथून प्रेरणा मिळते असे गढ-किल्ले फार पध्दतशीरपणे उध्दवस्त केले. त्यांना मराठी माणसाला त्यांच्या राजानी दिलेला विचार मारायचा होता.
पण तरीही तो विचार संपला नाही.
नंतरचं सामाजिक प्रबोधनाचं पर्व असो, इंग्रजी सत्तेला दिलं जाणारं आव्हान असो, साहित्य संस्कृती असो की शिक्षणाचा प्रसार असो. स्वराज्याचा अंगार महाराष्ट्रात वेगवेगळे दिवे पेटवत राहिला. स्वातंत्र्याच्या थोडं आधी महाराष्ट्रात जे उद्योगधंदे भरभराटीला आले त्यालाही तीच १६७४ साली पेटवलेली ज्योत कारणीभूत आहे. नंतरही महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या पुढे-मागे झालेला शिक्षणाचा प्रसार, सहकार चळवळ आणि राज्यातली उद्योगांची भरभराट ह्या सगळ्या गोष्टीमागे पुण्याई आहे ती स्वराज्याची. स्वराज्यानं निर्माण केलेल्या एका सुबुध्द, सुसंस्कृत समाजाची.
अगदी जवळचा इतिहास पाहिला तर हे सगळं १९७५ पर्यंत चालू राहिलं. तितक्या तेजस्वी पध्दतीनं नव्हे पण राहिलं.
त्यानंतर आणीबाणी आली आणि ह्या प्रभावाला तडे जायला सुरूवात झाली. दिल्लीसमोर झुकायचं, “हायकमांड” ला खूष करायचं ही सवय महाराष्ट्राला लागली. नंतर मुंबईत १९८२ चा गिरणी कामगारांचा संप झाला. राज्यकर्ते, नोकरशहा आणि थैलीशहांची मजबूत आघाडी झाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली रयतेच्या कल्याणाची शिकवण विसरली गेली आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला ग्रहण लागायला सुरूवात झाली. १९७५ ते १९८५ ह्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या पतनाची खात्रीशीर सुरूवात झाली. मग युत्या-आघाड्यांचे सोयीस्कर व्यवहार आले. महाराष्ट्रानं आर्थिक उदारीकरणाचं वारं प्यायलं आणि नितीची जागा पैशानं घेतली.
बाजार महत्वाचा ठरला. बाजाराधिष्ठीत अर्थकारण तर सुरू झालं पण ते पोचलं सगळ्या समाजाचाच बाजार उठवण्यापर्यंत. सगळीकडे बाजार. शिक्षणात बाजार, राजकारणात बाजार, वृत्तपत्रात बाजार, घरात बाजार, धर्माचा बाजार, संस्कृतीचा बाजार. बाजार. फक्त बाजार.
साधारण १६७४ ते १९७५ अशा तीनशे वर्षात मराठी समाज उत्तुंग शिखर गाठून नंतर अस्ताला लागला. नंतर मग १९७५ ते २०२० अशा पुढच्या ४५ वर्षात हा कल मग पुन्हा उलटा फिरलाच नाही. एकेकाळचा, देशाचं नेतृत्व करणारा आधुनिक विचारांचा सशक्त मराठी समाज आता देशाच्या इतर राज्यांप्रमाणे एक रांगेत सर्वांसारखा निमूटपणे उभा आहे. केंद्र कधी निधी देतोय याची वाट पहात.
महाराष्ट्र साठ वर्षांचा होताना महाराष्ट्राची ही अवस्था बघवत नाही.
एखादा समाज हळू हळू खाली जात रहातो त्याची अनेक कारणं असतात. फक्त एखाद्या गोष्टीत कारण शोधू नये. कधी नैसर्गिक आपत्ती येते किंवा मोठं युध्द होतं. कधी त्या समाजाच्या बाहेरची परिस्थिती अपार बिघडते, समाजाचा आर्थिक डोलारा कोसळतो आणि मग समाजाला स्थिरताच येत नाही. कधी समाजाच्या अंतर्गत संघर्ष किंवा कलह असे होतात की समाजाची तब्येत बिघडते.
कधी समाजाचा नैतिक तोल जातो आणि समाज खाली जाऊ लागतो. काय चांगलं, काय वाईट, किंवा काय घेतलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे ह्याचा “विवेकी” निर्णय समाजाला करता येत नाही. कशानं तरी सगळा समाज आंधळा झालेला असतो. कधी भौतिक सुखाची चटक असते तर कधी धर्मवेडेपण येतं किंवा एखाद्या नेत्याच्या पायाशी विवेक गुंडाळून ठेवण्यातच समाजाला धन्य वाटायला लागतं. समाजाचं पतन होतच रहातं. अगदी त्याकाळात भौतिक प्रगती होत राहिली तरी. कारण त्या भौतिक प्रगतीला संस्कृतीचा आधार नसतो.
महाराष्ट्राचं असंच काहीसं झालं आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक आधार सुटला आहे.
संस्कृती कायम नसते. प्रवाही असते. बदलणारी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मराठी समाजाची जी संस्कृती होती तशीच आज नाही. त्यातले काहीच अवशेष शिल्लक आहेत, रायगडावर किल्ल्याचे आहेत तसे. संस्कृती म्हणजे आपल्याला वाटतं धार्मिक रिती-रिवाज, गाणी, गोष्टी आणि खाद्यपदार्थ. पण फक्त तेव्हढं म्हणजे संस्कृती नाही. संस्कृती म्हणजे समाजावरचे संस्कार. नितीची, मूल्यांची, श्रध्दांची चौकट.
संस्कृती घडण्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे भूगोल. बघा ना, आदिवासी समाज जो जंगलात रहातो त्यांचे सगळे देव हे निसर्गाशी संबंधित आहेत. कारण त्यांच्या भूगोलात जंगल आहे. कोळी समाजाची बरीचशी गाणी समुद्राशी संबंधित आहेत. जिथे खडतर प्रदेश असतो तिथल्या माणसांचा स्वभाव त्याप्रमाणे बदलतो. त्यामुळे भूगोल महत्वाचा.
समाजाची संस्कृती घडण्यामध्ये दुसरं कारण असतं समाजातले आर्थिक संबंध. सगळ्या महाराष्ट्राची आजिविका सध्या एकसंध राहिलेली नाही. म्हणजे यवतमाळमधील आत्महत्या करणारा निराश शेतकरी पुण्याच्या हिंजवडीत साॅफ्टवेअरमध्ये काम करतो अशा इंजिनीअरशी जुळलेला नाही. तो तिकडे मेला तरी ह्याला इकडे काही फरक पडत नाही. किंवा, मुंबईतल्या उद्योगातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी बीडमधल्या दलित वस्तीतील शिकलेल्या तरूणाशी कुठल्याच बाबतीत आर्थिक हितसंबंधांनी बांधलेला नाही. दोघांचं जग वेगळं आहे. कुणीच कुणावर अवलंबून नाही. त्यामुळे त्याचं काहीही होवो, माझं काहीच जात नाही अशी तुटलेपणाची भावना निर्माण झाली आहे. मी त्याचा, तो माझा ही भावना मेली आहे.
तिसरं कारण असतं सामाजिक संबंधांचं. समाजाची उतरंड कशी आहे, समाजातील विविध लोकांच्या आकांक्षा कसकशा विकसित होत आहेत ह्यावरूनही समाजाची संस्कृती ठरते. नव्वदच्या दशकानंतर महाराष्ट्रातले आजवर विकासाच्या परिघाबाहेर असलेले कित्येक समाजगट बोलू लागले. ह्याला दोन महत्वाची कारणं. मंडल आयोगानं ह्या आशा-आकांक्षांना आवाज दिला, आणि आर्थिक उदारीकरणामुळे “मला पण त्यात वाटा पाहिजे” असं प्रत्येकाला वाटू लागलं. अर्थात ह्यात निसर्ग नियमांनुसार वर्षानुवर्ष शिक्षणानं पुढे असलेले समाजसमूह आणखी चटकन पुढे गेले आणि जगाच्या अंगणात गेल्यावर त्यांच्यातली देशभक्ती प्रखर झाली. मी मागे नको पडायला म्हणून सर्वांमध्येच प्रगती करण्याच्या इर्षेनं पैशांचं आकर्षण वाढलं. जो यशस्वी तो चांगला. यश म्हणजेच सर्वकाही अशी समाजाची धारणा झाली. ती अगदी राजकारणापर्यंत आली.
महाराष्ट्राचा भूगोल तर काही बदलला नाही. समाजव्यवस्था बदलत चालली आहे. आजवर विकासाच्या प्रक्रियेबाहेर असणारे विकासाच्या परिघात आले आहेत. स्त्रिया अधिक जागरूक झाल्या. समाजात जातीचं भान टोकदार झालं. गेल्या ५० वर्षात काहीही झालं, कुणीही सत्तेत आलं तरी कुणीच काही वाकडं करू शकत नाही असा एक “कायम प्रतिष्ठीत वर्ग” तयार झाला. त्यामुळे ज्यांचे राज्याच्या विकासात काहीच हितसंबंध (स्टेक्स) नाहीत पण स्वत:च्या विकासात आहेत असा वर्ग राज्य चालवू लागला.
रूढी, परंपरा आणि श्रध्दांच्या बाबतीत मोठे परिणाम झाले. जगाचा, देशातील इतर समाजांचा मोठा प्रभाव मराठी समाजावर पडला. भाषेवर परिणाम झाला. वृत्तीवर होऊ लागला. व्यापक असं दूरचित्रवाणी सारखं माध्यम रूढी आणि परंपरांचा एक छापाचा घाऊक माल सगळीकडे विकू लागलं. मराठी माणूस आपली ओळख विसरला. आपलं वेगळेपण घालवून बसला. त्याला मराठी शाळा बंद पडताहेत म्हणून काही वाटेनासं झालं. इतकं काय “मराठी, मराठी” करायचं, त्यापेक्षा गर्वानं बोलण्याजोग्या इतर गोष्टी त्याला दिसल्या. त्या त्यानं स्विकारल्या. इतरांसारख्याच श्रध्दा जपू लागला आणि समाजाचं नैतिक होकायंत्र पार विसकटलं. समाजाचं हे “नैतिक होकायंत्र” समाजाची संस्कृती ठरवणारी आणखी एक गोष्ट असते. पण ते बिघडलं. रोजच्या शेतकरी आत्महत्यांचं त्याला काही वाटेनासं झालं. सुरूवातीला तो जरा हळहळला, कारण कितीही म्हटलं तरी शिवाजी महाराजांचे संस्कार होते त्याच्यावर. पण नंतर त्याला त्या बातम्यांची सवय झाली.
उगाच भावनाशील होणं ही गोष्ट हास्यास्पद झाली. त्यानं काय “फायदा”? असा प्रश्न लोकांना पडू लागला. नैतिक संघर्षापेक्षा व्यावहारिक “सोय” पसंतीस उतरली. अनैतिक युत्या आघाड्यांचं तर ग्रामपंचायतीपासून राज्यापर्यंत पेव फुटलं. काहींच्या मते समाजाचं हे “नैतिक होकायंत्र” अधिक “व्यावहारिक” झालं. कारण “नैतिकता” हाच एक “व्यवहार” झाला. एक देवाणघेवाण. “आमची” इतकी मतं म्हणून आम्हाला हे हवं असा “व्यवहार” म्हणजे “निती” बनली. हे “नैतिक होकायंत्र” मधून मधून जाणकार मंडळींना दाखवावं लागतं. त्यांच्याकडून तपासून घ्यावं लागतं. तशी माणसं होती. पण आता तशी माणसंही नाहीत. त्यांच्याबरोबरचेही “व्यवहार” ठरल्यामुळे तेही होकायंत्राचे बदलते नियम मानत गेले. निती, तत्व, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, शब्दाला जागणं, आधुनिक शास्त्रीय विचार या गोष्टी मागे पडल्या आणि महाराष्ट्राच्या दैदिप्यमान परंपरेच्या अस्ताची धुरकट चित्रं आपल्याला गेल्या ५ वर्षात अधिकच स्पष्ट दिसू लागली.
शेतकरी आत्महत्यांसारखा अत्यंत संवेदनशील विषय असो किंवा दुष्काळासारखं कठीण आव्हान असो, किंवा शेतमालाचा भाव असो की महिलांवरचे अत्याचार असो, किंवा अगदी आत्ताचा “करोना” चा मुकाबला असो. मराठी समाजानं आपला “बाणा” दाखवला नाही. आपलं “कॅरेक्टर” सिध्द केलं नाही. तिथेही सध्या इतर राज्यांची कामगिरी अधिक सरस दिसते आहे.
सुरुवातीलाच म्हटलं होतं की साठ वर्ष ही एखाद्या समाजाच्या दृष्टीनं काहीच नाहीत. पण समाज असाच काही वर्ष राहिला तर तो “कोमात” जाऊ शकतो, म्हणजे मग त्याचं काहीच होऊ शकत नाही. जे आहे ते चालू राहील. जीव राहील. पूर्वी जे प्रतिष्ठीत होते तेच पुन्हा प्रतिष्ठीत होतील. शब्द बदलतील. नव्या घोषणा येतील. पण समाज तिथेच राहील. असा निश्चल समाज ज्या समाजाला ना स्वप्नं पडतात, ना तो अस्वस्थ होतो, ना त्या समाजाला उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द निर्माण होते. पुढेही नाही आणि मागेही नाही. असं काही शतकंही राहू शकेल.
एकेकाळचा पुढारलेला, आधुनिकता अंगी बाणवलेला, पाठीचा कणा ताठ असलेला हा समाज आता त्याला स्वत:चा “हेतू” सापडत नाही तोपर्यंत किंवा पुढचा “टप्पा” उमगत नाही तोपर्यंत “पैसा” किंवा “स्वार्थ” हीच “निती” मानून पुढे जात राहील असं दिसतंय. कारण वेगळी “स्वप्नं” पडायची तर “वेगळा” विचार करावा लागतो. त्यासाठी मुक्त विचार करण्याची समाजाची तयारी लागते. समाजाचं “नैतिक होकायंत्रं” सांभाळणारी शहाणी माणसं लागतात. नवे धोके स्विकारावेत असं वाटावं लागतं. कष्ट करावे लागतात. वेदनेचे चटके बसायला लागतात. तडफड व्हावी लागते. स्वार्थाला तिलांजली द्यावी लागते. समाजानं एकत्र काही ध्येय उराशी बाळगावं लागतं.
आज मराठी समाजाकडे पाहिलं तर असं काही करण्याची त्याची इच्छा आहे असं वाटत नाही.
उद्या काय होईल सांगता येत नाही.
परवा काही होईलही कदाचित, पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल.
२०१९ विधानसभा निवडणुकांनंतर …
महाराष्ट्राच्या राजकारणाचं व्याकरण बदलवणारी निवडणूक
महाराष्ट्र विधानसभेची २०१९ ची निवडणूक हा राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण आहे. सुरूवातीचे निकाल पाहिले की महाराष्ट्राचा विवेक ऐन क्षणी जागा झाला असंच म्हणावं लागेल.
फक्त सहा महिन्यांपूर्वीच प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात पुन्हा एकदा गादीवर विराजमान झालं. भारतीय जनता पक्षाच्या मनात एक उन्मादी आकांक्षा निर्माण झाली. न्यायसंस्थांपासून रिझर्व्ह बॅंकेपर्यंत आणि सीबीआय पासून निवडणूक आयोगापर्यंत इतरही सर्व संस्थांवर केंद्रातलं भारतीय संघराज्याचं सरकार आपलं नियंत्रण अधिकच घट्ट करू लागलं. ३७० कलम रद्द केल्यामुळे आपण एक ऐतिहासिक काम केलं आहे आता आपल्याला कोण अडवणार असा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या देशपातळीवरील नेतृत्वात यायला लागला. त्यातूनच देशाची अर्थव्यवस्था दोलायमान होऊ लागली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आणि लोकांना बोचणारे मुद्दे न घेता आपलं राजकारण लादण्याच्या मन:स्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आला.
नेमक्या अशा वेळीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली. महाराष्ट्र एका टोकाला जातो की काय ह्याची भिती वाटू लागली असतानाच. मात्र अशा अगदी ऐन मोक्याच्या वेळी महाराष्ट्राचं मूळचं विवेकी मन जागृत झालेलं दिसत आहे आणि महाराष्ट्राचा गुजरात होणार नाही असा इशाराही ह्या निकालानं दिलेला आहे.
हा लेख लिहितो आहे तेंव्हा पूर्ण निकाल अजून हाती आलेले नाहीत परंतु भारतीय जनता पक्षाच्या १५-२० जागा कमी होऊन त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी यश मिळणार हे नक्की आहे. स्पष्टपणे हा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या नेतृत्वाचा म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा पराभव आहे असंच मानावं लागेल. मोदी ह्या नावाचा करिष्मा, प्रभाव महाराष्ट्रात कमी होत आहे हे ह्यातून स्पष्ट होत आहे.
निवडणुकीच्या आधी परिस्थिती बघा कशी होती.. विरोधक नुसते एकत्र नाहीत असं नाही तर पूर्णपणे विखुरलेले आहेत. राजकीय चैतन्याच्या फारशा खुणा त्यांच्यात दिसत नाहीत. विरोधकांचे सुमारे २५ आमदार सत्ताधारी पक्षानी फोडलेले आहेत. अनेकांना पक्षात घेतलं आहे. ईडी, सीबीआयची भिती घालून विरोधकांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न चालू आहे. सत्ताधारी पक्षाकडे अतोनात पैसा आहे. त्याचा वापर प्रच्छन्नपणे होतो आहे. वृत्तपत्रं आणि माध्यमांना एकतर विकत घेतलं आहे किंवा धमकावलं जात आहे. त्यांच्याकडून विरोधकांच्या फायद्याच्या कुठल्याही बातम्या येऊ दिल्या जात नाहीत. आरक्षणाचं राजकारण केलं गेलं. वंचितसारख्या उमेदवारांनी विरोधकांच्या, म्हणजे काॅन्ग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, पारंपारिक मतांवर फूट पाडलेली दिसत आहे. मतदानाच्या आदल्याच दिवशी भारतीय सैन्यानं पाकिस्तानी तळांवर हल्ले करून काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या बातम्या प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आहेत. सरकारी कर्मचारी वर्गाला वेतनवाढीचं गाजरही दिलेलं आहे. आणि इतकं सारं करूनही भारतीय जनता पक्षाला, त्यांनी शिवसेनेबरोबर युती करूनही, सुमारे १५ ते २० जागा कमी मिळतील अशी चिन्हं आहेत.
मग ह्या आजच्या विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ काय आणि ह्या निकालामुळे महाराष्ट्राचं पुढचं राजकारण काय असेल?
पुन्हा एकदा सत्तेवर आले तरी भारतीय जनता पक्षाचा तेजोभंग झाला. त्यांची झळाळी गेली. शिवसेनेबरोबरच्या त्यांच्या संबंधांमध्ये आता फरक दिसेल. शिवसेना अधिक आक्रमक व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवसेना जर जागी असेल तर मोदी-शहा ह्या जोडीचा महाराष्ट्राची अवहेलना करण्याचा जो उद्योग चालू आहे त्याला खिळ बसेल. अर्थात शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विषयात जागृत असेल तर. ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावरची मोदी-शहा ह्यांची पकड सैल झाल्याची त्या दोघांना जाणीव होईल आणि ते ती पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा घेऊन जाती-जातींमध्ये विद्वेष पसरवला गेला तर राजकीय धृवीकरण होईलच ह्याची खात्री रहाणार नाही. महाराष्ट्र इतका उघडपणे विद्वेषाचं राजकारण आपलसं करणार नाही हे जगाच्या लक्षात येईल. काॅन्ग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून भाजपा-सेनेत पक्षांतर केलेले सगळेच सरळ जिंकताहेत असं दिसत नाहीय ह्याचा अर्थ मतदारांना गृहीत धरता येणार नाही हा संदेश राजकारण्यांच्या मनात पक्का होईल. ह्यातूनच ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं व्याकरण जन्माला येईल. साखर कारखाने, सहकार अशा पारंपारिक गोष्टींच्या पलीकडच्या मुद्दयांची घुसळण होण्याची शक्यता ह्यातून निर्माण होते आहे. अर्थात ते विरोधी पक्षाच्या क्षमतेवर आणि त्यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणसांबाबतच्या बांधिलकीवर अवलंबून आहे. ते ह्यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा काय ठेवतात ह्यावर बरंच अवलंबून आहे.
हा निकाल हा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर तर बसवतो आहे पण सत्तेवर बसवता बसवता एक स्पष्ट इशारा देतो आहे. केवळ दिल्लीहून इथे राजकारण करता येणार नाही, लोकांचे मूलभूत प्रश्न न सोडवता निव्वळ राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती अशानं जनता गप्प बसणार नाही. त्यांना त्यांचे जगण्याचे, प्रगतीचे प्रश्नही महत्वाचे आहेत हे समजून घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला राजकारण करावं लागेल. पण त्यांना ही एक संधी आहे. म्हणजे सत्ता पण मिळाली आणि लोकांच्या मनातलंही समजलं असं आहे. ह्यावर चाणाक्ष, धूर्त असं त्यांचं नेतृत्व मार्ग काढेल आणि त्यांनी तो काढला तरी लोकांचे प्रश्न रेटत ठेवून आपला राजकीय अवकाश वाढवत नेण्याचं काम विरोधी पक्षांना करावं लागेल.
सोळाव्या शतकाच्या अखेरी अखेरीस झोपलेल्या समाजानं जागं व्हावं म्हणून संत एकनाथांनी “बया दार उघड” म्हणून साद घातली होती. त्यानंतर काही दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्रानी आपल्या प्रवासाची दिशा बदलली. समाजाला स्वत:चं भान आलं. स्वराज्याची स्थापना झाली. अंधारमय देशात चैतन्याचा दिवा पेटला. महाराष्ट्राच्या इतिहासातील दैदिप्यमान पर्वाची सुरूवात झाली. त्यानं महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली, देशाचं नेतृत्व केलं.
आज तोच महाराष्ट्राच्या जीवनातला “बया दार उघड” क्षण आहे. एका टोकाला, जातीपातीच्या दलदलीत जाऊन परावलंबी आणि दिल्लीसमोर गुढघे टेकण्याच्या रस्त्याला महाराष्ट्र लागतो की काय असं वाटत होतं, पण तसं व्हायला ह्या निवडणुकीच्या निवडणुकीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. ही फक्त सुरूवात आहे. महाराष्ट्राला अजून पुरतं जागं व्हायचं आहे. पण संधी निर्माण झाली आहे आणि राजकारणाची पुन्हा मांडणी करण्याचा अवकाश ह्यातून मिळाला आहे, हे काय कमी आहे?
आपण अजून निकालाचा नीट अर्थ लावलेला नाही. मतांची पुरती आकडेवारी समोर आलेली नाही. ईव्हीएमनी काय काय भूमिका बजावली आहे हेही समजलेलं नाही. कुणी कुणाची मतं खाल्ली, कुठल्या पट्ट्यात कुणाला किती मतं मिळाली. बंडखोरांनी काय काय केलं आहे हे ही पुरतं समोर आलेलं नाही पण तरीही कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर “क्षितीजाच्या पलीकडचे प्रकाशाचे दूत” मात्र स्पष्ट दिसत आहेत ही गोष्ट माझ्या सारख्याला निश्चितच दिलासा देणारी आहे.
अनिल शिदोरे
नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
anilshidore@gmail.com
प्राण्याचा माणूस होण्यात भाषेनं मोठी कामगिरी बजावली. माणूस ज्ञान मिळवतो भाषेमधून. ते पसरवतो ते ही भाषेमधून. भाषाच नसेल तर फक्त हातवारे करून माणूस काय काय करेल?
“भाषा” ही गोष्ट माणसाच्या माणूसपणाच्या मुळाशी आहे. माणूसपणाच्या मुळाशी आहे आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे.
भाषा म्हणजे काय?
भाषा म्हणजे चिन्हं. खुणा. संज्ञा. एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी केलेला उच्चार. म्हणजे “आकाश निळं आहे”. हे वाक्य म्हणताना मी तुम्हाला सांगतो आहे की हे जे डोक्यावर अफाट असं दिसतं आहे त्याला आकाश म्हणतात. तुम्हीही त्याला आकाश म्हणता, मी ही म्हणतो. आपण सर्वांनी मानलं आहे की हे जे काही अफाट दिसतंय ते आकाश आहे. त्याचं मला वर्णन करायचं आहे त्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या रंगाला मी निळा रंग म्हणतो, तुम्हीही त्याला निळा रंगच म्हणता आणि मराठी भाषा बोलणारे सर्वजण त्याला निळा रंगच म्हणतात.
आपण सर्वांनी भाषेची ही शिस्त मानली आहे. त्यामुळे भाषा म्हणजे शिस्त.
कशाला काय म्हणायचं, त्या गोष्टीला तेच म्हणायचं हे आपण सर्वांनी मानलं आहे. म्हणून एकाच रंगाला तुम्ही पिवळा म्हणता आणि मी मात्र निळा म्हणतो असं होत नाही. मराठी बोलतात अशा सर्वांनी ही संज्ञा मानली आहे. त्यांच्या घरात, दारात, एकमेकांशी बोलताना ते ह्याच संज्ञा वापरतात.
हे झालं प्रत्यक्ष दिसतंय अशा गोष्टीबाबत. पण “ आकाशाचा निळा रंग किती आल्हाददायक आहे” म्हणताना मी “आल्हाद” ह्या अमूर्त गोष्टीबाबतही बोलतो. जे म्हणजे काय हे ही आपण सर्वांनी मिळून ठरवलं आहे. मान्य केलं आहे.
भाषेचं काम आकलन होणं, विचार करणं, तो विचार मनात मांडून ठेवणं, त्याबाबतचे निर्णय घेणं आणि त्यानंतर तो निर्णय, विचार पसरवणं. समाजात विचारांची देवाणघेवाण करणं.
माणूस जेंव्हा तान्हं बाळ असतो तेंव्हा आईच्या, कुटुंबाच्या, आसपासच्या भाषेत जगाचं आकलन करत असतो. जे शब्द त्याच्या कानावर पडतात त्यातून तो त्याचे ठोकताळे बांधतो, काय हवं काय नको ते ठरवतो. निर्णय घेतो. त्याबाबत विचारांची देवाणघेवाण करतो. संशोधनानी हे समजलं आहे की जेंव्हा मूल त्याच्या आईच्या, परिसराच्या, कुटुंबाच्या भाषेत विचार करतं, विचारांची देवाणघेवाण करतं, आसपासच्या परिसराचं आकलन करतं तेंव्हा ते ती गोष्ट अधिक चांगली करतं. परिसरभाषेत त्या लहान मुलाची निर्णयक्षमता, आकलन, निरीक्षण, विचार, मांडणी, सृजनशीलता अधिक सघन होते. ह्याबाबत कुणाचंच दुमत नाही.
मग तरीही अगदी तीन वर्षाच्या बाळाला दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा इंग्रजी शिकवण्याचा अट्टाहास आपण का करत आहोत? त्यानं काय मिळणार आणि आपण काय गमावणार?
माणसाची निर्णयक्षमता (judgement) ही त्याच्या आईच्या भाषेतच विकसित होत असेल तर दुसरी भाषा शिकवून आपण आपल्या मुलांना खुरटवतोय का? त्यांची विचारांची क्षमता छाटतोय का? स्वभान, स्वाभिमान, अस्मिता, धाडस, सृजनशीलता, वक्तव्य (expression), तर्कशुध्दता, परखडता, न्यायबुध्दी, स्वतंत्र प्रज्ञा, संशोधनवृत्ती, प्रतिभा ह्या गोष्टी परभाषेत विकसित होतील का? झाल्या तरी ते होता होता त्या व्यक्तीची प्रचंड उर्जा त्यात खर्च होणार नाही का? ती होणं हे एका अर्थानं समाजाचं नुकसान नाही का?
की काही लोकांना मराठी माणसात स्वभान, स्वाभिमान, तर्क, सृजनशीलता, धाडस, स्वत:च्या इतिहासावर प्रेम तयारच होऊ नये असं वाटतंय आणि मराठी माणसं खुजी करण्याचं हे एक मोठं राजकीय षडयंत्र तर नाही ना?
कारण, अशी शक्यता आहे की काहींना स्वतंत्र विचार करणारी, निर्णय घेणारी माणसं तयारच होऊ नयेत असं वाटत असेल. जसं मेकाॅलेला भारतात इंग्रज सत्ता चालवण्यासाठी कारकुनांची फौज तयार करायची होती तसं आपल्या विचारातला देश तयार व्हावा आणि फुटकळ भांडवलशाही पोसली जावी म्हणून स्वत:च्या मूळ संस्कृतीचा साफ विसर पडलेले भरपूर पगाराचे कामगार आणि त्यांचा माल विकत घेणारे ग्राहक त्यांना तयार करायचे आहेत? आणि, ह्यापलीकडे माणूस म्हणून त्यांचा विकास होण्याची काळजी कुणाला नाही?
वयाच्या तीन, चार वर्षांपासून हिंदी शिकवण्याचा घाट घालणे, मराठी बरोबर इंग्रजीचे सामाजिक संस्कार करत रहाणे ह्यातून मराठीसारख्या एका महान संस्कृतीला सुरूंग लावण्याचं हे एक कारस्थान चालू आहे. आता ते पुढच्या काही वर्षात वाढणार. इंग्रजी माध्यमात शिकलेला मुलगा “शिवाजी महाराज की जय” हे मुठी आवळून म्हणूच नये असा हा प्रोजेक्ट आहे. आग्रा दरबारात अपमान झाल्यावर कसं वागायचं असतं ह्याचे संस्कार होणारच नाहीत, दिल्लीश्वर आहेत ना मग तिथे बंड करायचं नाही, त्यांच्या पदरी आपली जागा पंच-हजारी सरदारांचीच आहे असं मनोमन मान्य करणारा समाज तयार व्हावा असे संस्कार ह्या शिक्षणपध्दतीत केले जाणार आहेत.
गुलामीचे, लांगुलचालनाचे, अवलंबून रहाण्याचे, खाली मान घालून हुकुम ऐकण्याचे संस्कार ह्या शिक्षणप्रणालीतून होणार आहेत. आज जरी दक्षिणेकडील राज्यांच्या धाकानं हिंदीतून सक्तीचं शिक्षण मागे गेलं असलं तरी ते पुन्हा डोकं वर काढणारच नाही असं नाही. मराठी संस्कृतीला हिंदीच्या दावणीला बांधून त्याचं खच्चीकरण करण्याचा हा उद्योग आहे.
शिक्षणप्रणाली समाजाचा स्वभाव घडवते. आत्ता जी शिक्षणप्रणाली आहे तिचं उद्दिष्ट लोकांनी मराठी विसरावी असा आहे. स्वाभिमानी, सृजनशील, रसिक, चौफेर दृष्टी असलेला, पाय मराठी मातीत ठेवून जगाचं आभाळ हातात घेण्याची इर्षा ठेवणारा मराठि माणूस ह्यातून निर्माण होणार नाही ह्याची चोख व्यवस्था आहे.. अशा ह्या मराठी संस्कृतीच्या मुळावर आलेल्या शिक्षणप्रणालीचा धि:कारच केला पाहिजे.
अनिल शिदोरे
जर …
रूडयार्ड किपलिंग च्या सुप्रसिध्द अशा ‘If’ ह्या कवितेचे स्वैर रुपांतर. इंग्रजी भाषेतल्या काही कविता अशा आहेत की ज्या अनेकांनी वाचल्या, म्हटल्या आहेत. यू-ट्यूबवर सर मायकेल केन (The Prestige, Inception, A bridge too far), पिअर्स ब्राॅसनॅन, डेनीस हूपर (Apocalypse Now), हार्वे किटेल (Red Dragon, जुना True Grit) ह्या मंडळींनी त्याचं सुरेख वाचनही केलं आहे, ते ही पहा… किपलिंगची मूळ कविता इंटरनेटवर आहे, त्यामुळे ती इथे देत नाही.
माणसानं कितीही अवघड परिस्थितीत स्वत:चं भान कसं राखावं हे ह्या कवितेत फार चांगल्या पध्दतीनत आलं आहे. मोठ्या माणसाची गुणवैशिष्ट्यं काय आहेत हे ही ह्या कवितेत आहे. मी मधनंमधनं अशा काही कविता वाचतो. मोठ्या आवाजात वाचतो आणि माझा तोल मला सापडतो. त्यातलीच एक ही कविता… अधिक ह्याविषयी काय लिहू?
If — जर
जर, सगळे डोकं फिरल्यासारखे करताहेत, तुला दोष देताहेत
आणि तरीही तू शांत आहेस
जर, तुझा तुझ्यावर विश्वास आहे पण लोकांचा तुझ्यावर नाही,
आणि, तरीही तू लोकांना दोष देत नाहीस
जर, तू वाट पाहू शकतोयस, पण वाट पहाताना थकत नाहीस,
तुझ्याशी सगळं जग खोटं बोलतंय पण तू त्यांच्याशी नाही,
जर, सारे तुझा द्वेष करताहेत पण तुझ्या मनात राग नाही
तू फार बरा नाहीस, किंवा सध्या फार शहाण्यासारखा बोलतही नाहीस….
जर, तू स्वप्न पाहू शकतो आहेस पण त्या स्वप्नाचा पगडा तुझ्यावर नाही,
तू विचार करतो आहेस, पण फक्त विचार करत बसणं हा तुझा उद्देश नाही
जर, तू जय आणि पराजयाला सारखाच भिडतोयस;
त्या दोन्ही गोष्टींची किंमतही तुझ्या लेखी सारखीच आहे
जर, तुझ्याकडे तुझेच खरे शब्द ऐकण्याची शक्ती आहे,
आणि चलाख मूर्खांनी तेच शब्द फिरवलेले ऐकण्याचीही ताकद आहे
जर, तू सर्वस्व दिलंस अशा गोष्टी संपूर्ण उध्वस्त झाल्याचं पाहू शकतोस,
अन् पुन्हा वाकून, कष्ट करून ते उभं करण्याची जिद्दही आहे तुझ्यात
जर, तू आयुष्यात कमावलेलं सगळं, अगदी सगळं
एका खेळीत पणाला लावू शकतोस, अगदी एका खेळीत
आणि, ते हरून पुन्हा नव्यानं सुरुही करू शकतोस
आणि, तरीही तुझ्याकडून त्याविषयी चकार शब्द निघत नाही
जर, सगळं संपल्यावरही तू जिद्दीनं, पूर्ण ताकदीनं लढत रहातोस
अगदी शेवटपर्यंत काम करत रहातोस, बिलकुल दमत नाहीस
तुझ्यात ताकद राहिलेली नसतानाही तू किल्ला लढवत रहातोस,
आणि, तुझं मन म्हणत रहातं “लढ बेटा, लढ!”
जर, तू लोकांमध्ये राहूनही तुझी तत्वं सोडत नाहीस,
राजाबरोबर चालूनही लोकांशी संपर्क ठेवून असतोस,
जर, तुझे मित्रं किंवा कट्टर शत्रू तुझं वाकडं करू शकत नाहीत
तुझ्या लेखी सगळे महत्वाचे आहेत पण अती-महत्वाचं कुणीही नाही
जर, मिनिटभर लोकांवर टीका करण्याऐवजी किंवा उणीदूणी काढण्याऐवजी
साठ पूर्ण सेकंदं काम करणं महत्वाचं आहे असं तू मनापासून मानतोस,
तर,
तर, हे सारं जग तुझं आहे, बेटा, ह्या जगाचं सगळं सगळं तुझ्याकडे आहे
आणि,
आणि, आणखी काय हवं बेटा, ह्याचमुळं तू खरा ‘माणूस’ आहेस बेटा, ह्याच मुळे …..
ह्याच मुळे तू खरा माणूस आहेस बेटा, ह्याचमुळे!
मूळ कवी : रुडयार्ड किपलिंग — मुंबईत जन्म झालेला पण एक जगद्विख्यात कवी..
चांगल्या कविता समजून सांगायच्या नसतात. समजून घ्यायच्या असतात. समजल्या तर समजल्या. नाही तर नाही. त्याचं हे स्वैर रूपांतर तुमच्यासाठी...