Stories by Arti Gavas on Medium
स्वातंत्र्याच्या लायकीचे तरी आहोत का आपण?
झाशीच्या राणीचा चित्रपट पाहत असताना आणि पाहून झाल्यावरही सतत असं वाटत राहतंय की कित्तीतरी महान क्रांतिवीरांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासाठी पण मागे पुढे पाहिले नाही. स्वतःच कुटुंब, राज्य वगैरे इतकं प्राणप्रिय असूनही स्वातंत्रलढ्याच्या आगीत स्वतःहून उडी घेतली. या सर्वांचा ध्यास एकच: येणारी पुढची पिढी पारतंत्र्यात जगली नाही पाहिजे. इंग्रजांच्या जुलमातून येणाऱ्या पिढ्यांची सुटका झाली पाहिजे. केवळ हाच उद्देश घेवून समोर मृत्यू निश्चित असतानाही ही झाशीची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांशी एकाकी झुंज देत राहिली. एकाकी अशासाठी कारण इतिहासानुसार बाकी जवळपास तत्कालीन सर्वच राज्यांनी इंग्रजांची गुलामी पत्कारली होती. कंगणाने छान भूमिका केली असं म्हणू की राणी लक्ष्मीबाई चा स्वातंत्र लढाच इतका प्रेरणादायी होता ते कळत नाहीये पण 'आझादी' चं स्वप्न तिच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होतं. 'मैं रहू या ना रहु, भारत ये रहेना चाहीये' हे गाणं मनात अगदी कालवाकालव करून गेलं.
त्याचं कारणही अगदी साहजिक आहे. या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याचा एक अंश तरी आज दिसतोय का?
सगळीकडे अगदी भ्रष्टाचार माजलाय, गरिबी आणि गुन्हेगारी या स्वतंत्र भारताला पोकरतेय, आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींची स्वतःहूनच काळजी घ्यायची असते हे लोकांना देश स्वतंत्र होऊन साठ पासष्ट वर्ष झाली तरी कळले नाही, शिक्षण म्हणजे फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच होतं ही अक्कल मात्र अजून प्रबळ होत चाललीय. या चित्रपटातलं एक वाक्य आठवतंय: 'अंगरेजी हमारा हुनर हो सकता हे, लेकिन मातृभाषा हमारी माँ हें’. आज कित्तीतरी लोकांना हिणवले जाते केवळ त्यांना so called sofisticated society मध्ये confidently इंग्रजी बोलता येत नाही. मला जवळपास दर दुसऱ्या दिवशी असे संवाद ऐकू येतात: we only speak in English at home or in office, we don’t let anyone talk in Marathi or Gujarathi. हा संवाद मी local ने प्रवास करताना ऐकला. अश्याच काहींच्या मुद्द्याचे अनेक संवाद मला बऱ्याचदा ऐकायला मिळतात. यातून काय बोध होतोय. आपणच आपल्या मातृभाषेला कमी लेखतोय आणि foreign language ला उगाचच promote करतोय. जेवढी, जितकी, जिथे आणि जेव्हा ही इंग्रजी भाषा बोलली पाहिजे तेव्हढीच, तितकीच, तिथेच आणि तेव्हाच बोला ना. असो फक्त भाषाच नाही तर अजून बरंच काही आपण सध्यस्तीतीत इंग्रजांचे गुलाम नसतानाही आपल्याजवळ बाळगलय.
खरतर भारतातल्या कित्तीतरी पारंपरिक आणि आधुनिक गोष्टी आपण अभिमानाने वापरू शकतो, पण इच्छाशक्ती कमी पडतेय. आपल्याला आपण भरलेला tax देशाच्या विकासासाठी आणि नावनिर्माणसाठी वापरला जातो हे माहीत असूनही 30% tax भरायला लागतोय म्हणून मोदींना हटाव च्या घोषणा करतोय, पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या महात्म्यांनी स्वतःचा प्राण पण दिला हे विसरतोय, आपल्याला आपल्या कमाई चा एवढा लगाव असतो तसाच त्यांना त्यावेळी त्यांच्या प्राणाचा लगाव असता तर आज आपणही त्याच पारतंत्र्यात आणि जुलमात कुढत राहिलो असतो.
शेवटी पुन्हा एकदा म्हणू वाटतंय 'मैं रहू या ना रहू, भारत ये रहेना चाहीये...'
खरंच मंदिरात देव आहे का?
मंदिरात देव असता तर आज आसिफा जिवंत असायला हवी होती. तिच्याबद्दलच्या बातम्या, social media वरच्या posts वाचून मन पुन्हा पुन्हा खिन्न होतंय. माणसांचं अमानवीय वागणं आता असहाय्य होतंय. ज्या वयाला बलात्कार म्हणजे काय या गोष्टीची पुसटशी कल्पनाही नाही अश्या बालपणाला निर्दयपणे ठेचून मारताना त्या नाराध्यमांमध्ये माणुसकीचा एक टक्के अंश पण उरला नसेल का? त्यांच्या घरात मुली बाळी नसतील का? असे अनेक प्रश्न त्या दिवसापासून सतत मनाला भेडसावतायेत. अत्यंत संतापजनक प्रकार आहे हा. मला हे लिखाण लिहितानाही वाटतंय, खरंच हे मी लिहायला हवंय का? कारण या विषयावर सर्वत्र इतकं बोलून झालंय की काहींना हे पुन्हा पुन्हा वाचताना उबग येईल. पण मला जरा वेगळ्याच गोष्टीवर लिहायचं आहे.
आपण सर्वच जण (मला सोडून) कित्तीतरी वेळ, पैसा आणि बुद्धी देवाचं करण्यात (वाया) घालवतो. मला सोडून असं म्हणण्यामागे एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण जग ज्या गोष्टीला देव मानतं त्याला मी देव मानत नाही. माझ्या मते देव फक्त निसर्ग आहे. निसर्गाच्या मनात आलं तर सर्व काही आलबेल आहे नाही तर अगदी गावंच्या गावं उध्वस्त करण्याची ताकत आहे या देवात. देवळतला देव हा मानवनिर्मित आहे. तसं नसतं तर गावोगावी वेगवेगळे देव आणि त्या देवाच्या वेगवेगळ्या चालीरीती नसत्या. त्यामुळे मंदिरातला देव हा नक्कीच माणसांच्या संकल्पनेतून उतरला असावा. अमुक एका ठिकाणाचा देव जागरूक, तमुक ठिकाणाचा देव नवसाला पावणारा वगैरे फक्त तिथल्या मंदिर प्रशासनाने business च्या दृष्टीने केलेला कांगावा असावा. जर ते खरं असेल तर बाकीच्या मंदिरातले देव झोपलेले असतात का? एका कोवळ्या जीवावर त्याच्या समोरच एव्हढे अत्याचार होताना पाहुनसुद्धा तो झोपलेल्या अवस्थेतच का राहिला? जर देवाच्या हातात सर्व काही आहे तर इथे त्या नराधमांना हे कृष्णकृत्य करताना मंदिरातल्या देवाने अडवलं का नाही? बहुधा देवही म्हणाला असेल ‘अरे, ही तर माझ्या धर्मातली नाहीये, म्हणजे माझ्या हद्दीतली ही case नाही, नसती ब्याद नको’. असं बोलून डोळे मिटून घेतले असतील हो ना?
कित्येकदा आपण बातम्यांमधून पाहतो, देवस्थानाला भेट द्यायला गेलेल्या लोकांच्या गाडीचा अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती येऊन मृत्यू वगेरे. मला प्रश्न पडतो अश्या वेळी देव का बरं धावून येत नसावा? आपण लोक , खासकरून भारतीय लोक देव या गोष्टीला किती घाबरून असतो आयुष्यभर. या देवाची पूजा अमुक एका पद्धतीनेच झाली पाहिजे, तशी नाही झाली तर भविष्यात काहीतरी बिनसेल. तुमचं नाही तर येणाऱ्या पिढ्यांवर याचा वाईट परिणाम होईल वगैरे वगैरे. मला आठवतंय मला एकदा आमच्या सासरच्या गावच्या देवीची ओटी भरायला देवळावर पाठवले होते(मला गावच्या मंदिरात जायला आवडतं कारण तिथे एक सुंदर शांतता असते). देवीची ओटी मीच घरातून तयार करून नेली होती. मी माझ्या आईलाही देवीची किंवा एखाद्या पारंपरिक धार्मिक कार्यात बायकांची ओटी भरताना पाहिलं होतं. त्या अनुषंगाने मी एक नारळ, एक blouse piece, हळद, कुंकू, अगरबत्ती आणि दोन ओंजळभर तांदूळ एका पिशवीत भरून नेले होते. आम्ही देवळात पोहोचलो, तेथील पुजार्यांनी मला ओटी भरायला सांगितले तशी मी पिशवीतील सर्व गोष्टी आधी तिथे ठेवलेल्या परातीत ओतल्या, अगरबत्ती लावली, हळद कुंकू वाहिलं आणि नारळ व piece व थोडे तांदूळ एकत्र घेऊन देवीच्या पायाशी ठेवले. त्यानंतर अजून चार वेळा ओंजळभर तांदूळ प्रत्येक वेळीगणिक देवीच्या ओटीत टाकायचे असं मला पुजार्यांनी सांगितले. मी तर दोनच ओंजळीभर तांदूळ नेले होते हे त्यांनी हेरलं होतं, दुसऱ्या वेळीनंतर परातीतले तांदूळ जवळपास संपले. तेवढ्यात पुजार्यांनी मला टोला लावला की घरातले सगळे तांदूळ संपले काय. एव्हढेसेच तांदूळ का आणले वगैरे वगैरे. खरं सांगू का मंडळी हे तांदूळ, नारळ, piece यातलं काहीही देवी स्वःताकडे ठेवून घेत नाही बरं का. हे सुस्पष्ट माहीत असून देखील माझ्याबरोबर माझ्याच घरातून आलेली मंडळी माझ्यावर खट्टू होत बोलली की तुला कळत नाही का भरपूर तांदूळ घ्यायचे ते, आता गावभर याची चर्चा होईल.
म्हणजे बघा अशीच ओटी मी माझ्या माहेरच्या देवीला भरली होती तेव्हा मला कोणीच बोललं नाही पण इकडे मात्र हा चर्चेचा प्रश्न होऊन बसला. तुमचं म्हणणं असेल, असतील काही गावागावांच्या चालीरीती. पण या चालीरीती बनवल्या कोणी? माणसांनीच ना? मग त्यात इतका बाऊ कश्याला करायला हवा की अमुक एका देवीला हे असंच पाहिजे आणि तसं नको? खरतर देव माणसांमाणसांत आहे. पण आपल्या समाजाची शोकांतिका बघा, जिवंत माणसांपेक्षा दगडाच्या मूर्तीची इथे जास्त काळजी घेतली जाते.
साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वीची एक गोष्ट आठवतेय, संभाजी राज्यांच्या मृत देहाची योग्य ती दखल घेऊन त्याचे योग्य असे अंतिम संस्कार करणाऱ्या एका मनुष्याच्या समाधीची हेटाळणी होते म्हणून संपूर्ण भारत बंद करणाऱ्या जबाबदार नागरिकांना मला विचारायचं आहे एका जिवंत, निरागस आणि महत्वाचं म्हणजे निरपराध देहाची विटंबना झाली त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. अरे वा रे वा, म्हणजे जिवंत व्यक्तीपेक्षा दगडाच्या मूर्तीला तुमच्या सहकार्याची आणि सहानुभूतीची जास्त गरज आहे वाटतं.
मला खासकरून युवा पिढीला काही सुचवायचं आहे. तुमचा देव मंदिरात नसून तो तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. कारण चांगली वृत्ती म्हणजेच देव आहे, त्याची पूजा करा (इथे पूजा म्हणजे हळद कुंकू आणि अगरबत्तीने नाही बरं का). आपणा प्रत्येकामध्ये काही ना काही खासियत आहे. ती ओळखा आणि तेच तुमचं चरितार्थ चालवण्याचं साधन आहे. एखादा शालेय अभ्यासात माठ निघाला म्हणून जीवनाच्या परीक्षेतही नापास होईल असं नाही, उदाहरणं द्यायची तर बरीच आहेत. सचिन तेंडुलकर, आईन्स्टाईन, स्टिव्ह जॉब्स अगदी आपल्या सभोवताली वावरणारी सुद्धा कित्येक माणसं फक्त शालेय अभ्यासातून वर आलेली नसतात. पण तरीही ती माणसं आपला असा वेगळा ठसा जनमानसात उमठवतात. इथे कोणीही बिनकामाचा नाही, आणि म्हणूनच कोणीतरी उठून तुमचा माथा भडकवू पाहत असेल तर वेळीच सावध व्हा. धर्माचं आणि देवाचं राजकारण होऊ देऊ नका. इथे प्रत्येक माणसाला किम्मत आहे आणि ती आपण सर्व योग्य त्या मार्गाने सिद्ध करू शकतो.
Privacy… missed etiquette in India
Privacy म्हणा किंवा एकांत म्हणा, बऱ्याचदा ऐकलेला शब्द असेल परंतु तेव्हढ्या वेळा अनुभवलेला नक्कीच नसेल. एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या इच्छेनुसार एकांत द्यावा हा शिष्टाचार आहे हेच मुळी भारतात शिकवलं जात नाही. कोणी एकांत हवा अशी मागणी केली तर बऱ्याचदा एकतर त्याची टर उडवली जाते नाहीतर त्याची काळजी वाटते आहे म्हणून त्याच्या अधिकच जवळ जाऊन विचारपूस केली जाते.
एखादं जोडपं जर एकमेकांशी privacy मध्ये काहीतरी बोलत असेल तर मुद्दाम त्याच्यामध्ये नाक खुपसणारी लोकं उगवतात. मला आठवतंय मी कदाचित आठवी किंवा नववी मध्ये असेन तेव्हा ऐश्वर्या, सलमान आणि अजय चा एक चित्रपट आला होता, हम दिल दे चुके सनम नावाचा. त्या चित्रपटात ऐश्वर्या आणि अजय ला काही लुटारू त्याच्यजवळच्या सर्व ऐवजाणीशी लुटतात, त्यांच्याजवळ घरी जाण्याइतके देखील पैसे नसतात. मग ते एक युक्ती करतात ती म्हणजे दोघेही तिकीट न घेताच ट्रेन मध्ये चढतात. TC सर्वांचं तिकीट check करून यांच्याजवळ येणार तत्पूर्वी हे दोघे मुद्दाम एकमेकांच्या इतके जवळ येऊन उभे राहतात की TC ला वाटतं ह्या couple ला disturb नको करायला. म्हणजे बघा परदेशात privacy चा एव्हडा विचार केला जातो. हेच आपल्याकडे झालं असतं तर? मला वाटतं आपण सगळेच कल्पना करू शकतो की काय झालं असतं.
असो तर आपल्याकडे privacy मागणं हा जणू अपराध च आहे. नवविवाहित सुनेने जर या privacy बद्दल ब्र जरी काढला तरी तिच्या सासरच्या मंडळींना वाटतं ही नवीन मुलगी जरा जास्तच आगाऊ आहे. घरातल्या मोठ्यांसमोर काय बोलावं आणि कसं वागावं याच ताळतंत्र नाही असा शिक्कामोर्तब करून मोकळे होतात. मला आठवतंय माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हाचं, आम्हला झोपण्यासाठी एक स्वतंत्र खोली होती पण ती फक्त झोपण्यासाठीच बरं, कारण जशी सकाळ व्हायची आमच्या घरातले इतर लोक काही ना काही काम काढून आत यायचे आणि तिथे कपाटाचा किंवा अन्य काहीसा आवाज काढून आमची झोपमोड करायचे. आणि त्यानंतर दिवसभर ती खोली घरातील प्रत्येक सदस्यांची होऊन जायची. प्रत्येकाला, किमान प्रत्येक जोडप्याला एक स्वतंत्र खोली असावी हा देखील समज आपल्याकडे फारसा रुळलेला दिसत नाही, किमान मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये.
या सर्वाचा विचार करता एक लक्ष्यात घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडे मध्यंतरीच्या काळात शहरोशहरी विकसित झालेली कुटुंबव्यवस्था. भारतात privacy ला मान न देणे हे काही फार पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट नाही. आजही गावागावात अगदी वाडा म्हणावं अशी मोठमोठाली घरं असतात. प्रत्येक जोडप्याला किमान त्यांची एक स्वतंत्र खोली असते. ही समस्या शहरांमध्येच जास्त आहे जिथे कमी जागेत दोन किंवा जास्त कुटुंब एकाच घरात राहतात. अश्या घरामध्ये privacy मिळणं खूप कठीण होऊन जातं आणि कुणी जर त्यासाठी मागणी केलीच तर मी मघाशी म्हणल्याप्रमाणे त्याला तशी वागणूक मिळते. याच विषयावर मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांचा किती सांगायचंय मला अश्या नावाचा चित्रपट पण आला होता.
आपल्याकडे खरोखरच या etiquette ची कमतरता आहे. माझं आपल्या पिढीला आवाहन आहे की किमान आपल्या पुढच्या पिढीला तरी privacy म्हणजे काय हे शिकवा, त्याशिवाय तुम्ही स्वतः तुमच्या privacy चा विचार करा आणि दुसऱ्याच्या privacy चा आदर करा.
स्वच्छता आणि आरोग्य…एकाच नाण्याच्या दोन बाजू
गेल्याच आठवड्यात पुण्याहून मुंबईला परतत असताना पाहिलेला एक प्रसंग आठवतोय आणि मोदींनी सुरू केलेल्या सर्वस्वछता अभियानाची वाट लागली असं वाटलं. तर प्रसंग असा की आम्ही बस ने पुण्याहून मुंबईकडे यायला निघालो सुमारे रात्री साडेनऊ वाजता. पुणे सोडल्यावर जवळपास दीड तासांनी center point असं नाव असलेल्या ठिकाणी या बसेस 20 मिनिटांसाठी थांबतात. या वेळात कोणी शी शु साठी अवघडले असेल तर किंवा कोणाला भूक लागली असेल तर प्रवासी उतरू शकतात. एक गावतलं कुटुंब त्या बस मध्ये होतं. नवरा, बायको, पाच ते सहा वर्षांची मुलगी आणि आज्जी. तर त्या छोट्या मुलीला शी साठी तिच्या आईने महिला प्रसाधन गृहात नेलं पण तिथे तिने बसायला नकार दिला. मग ती छोटी मुलगी बस थांबलेली तिथे बाजूला उघड्यावरच शी करायला बसली. बसमध्ये बसलेल्या प्रत्येकाला हा सगळा प्रकार दिसत होता. त्यानंतर बराच वेळ ती तिथेच पडलेल्या छोट्या छोट्या दगडांना एकत्र करून सागरगोटे खेळत होती. शेवटी एकदासं तिने तिचं काम उरकलं आणि तिच्या आईने बाटलीतल्या पाण्याने ‘ते’ धुतलं.
बस मध्ये बसलेला प्रत्येक जण हे पाहत होता. किती ओंगळवाणि गोष्ट आहे ही. म्हणजे तुम्हाला सरकारने सुलभ स्वच्छलयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तरीही तुम्ही त्याचा वापर न करता बाहेर उघड्यावर घाण करायची आणि शहरांमध्ये कशी घाण आणि रोगराई पसरलीय याचं खापर सरकरवरच फोडायचं.
आपल्यापैकी बरेच लोक शहरांमध्ये पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याला सरकार जबाबदार आहे असं म्हणतात, आणि कुणी यावर बोलायला सुरुवात केली की सरकार किती आळशी आहे अशी पुस्ती जोडतात. पण खरतर प्रत्येकाने किमान स्वतःचा विचार करा आणि स्वतःला विचारा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कित्येक वेळा कचरा फेकलाय.
यावरून मला अजून एक प्रसंग आठवतोय. मी एका लग्नसमारंभासाठी गेलेले, येताना मी local train च्या second class ने प्रवास करत होते. माझ्याच एका नातेवाईक बाईने तिच्या छोट्या मुलीला चॉकलेट उघडून दिले आणि त्याचं wrapper बसल्या ठिकाणीच टाकलं, नेमकं ते दुसऱ्या बाईच्या पायावर जाऊन पडलं. ते पाहून ती बाई नाक मुरडत म्हणाली कचरा माझ्या अंगावर का टाकता? त्यावर आमच्या नातेवाईक बाईंनी स्वतःची वकिली सुरू केली, अहो कचरा आहे का तो, तो तर चॉकलेट चा कागद आहे ना, एव्हडा काय बाऊ करायचा त्याचा वगैरे वगैरे. आता बघा आधीच आमच्या ह्या बाईंचं चुकलं असा इथेतिथे कचरा केला ते आणि वरून त्या दुसऱ्या बाईला डाफरून बोलते. आणि हे सर्व त्या छोट्या मुलीसमोर, म्हणजे उद्या ती सुद्धा मोठी होऊन हेच अनुकरण करणार. किती मूर्खपणा आहे हा, म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर.
असो हे आणि असे अनेक प्रसंग मी पाहिलेत जिथे सुशिक्षित लोकही सार्वजनिक ठिकाणी घाण आणि कचरा पसरवत असतात. हा लेख लिहिण्यामागे माझा केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य कसे परस्पर संबंधित आहेत. बरेचसे रोग हे स्वच्छतेअभावी पसरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर स्टेशन वर थुंकणे, या थुंकण्यावर माश्या बसतात आणि या माश्या तिथले किटाणू कधी खाण्याच्या पदार्थांवर बसून तर कधी तुमच्या अंगावर बसून पसरवतात. आता थुंकण्यामध्ये किती आणि कसले किटाणू असतात हे मी वेगळं सांगायला नको. त्याचप्रमाणे उघड्यावर मलमूत्र विसर्जित करणे, पाण्यात कचरा फेकणे यामुळे देखील किती भयंकर रोगराई पसरू शकते. म्हणजे आपल्याला आणि आपल्या मुलांना जर चांगले आरोग्य हवे असेल तर ही अशी घाण पसरवणे थांबायला हवे. सरकारच किती प्रयत्न करणार? आपणही त्यात हातभार लावायला हवाच.
मला आठवतं सरकार या कचरा व्यवस्थापणाखातर कितीतरी योजना राबवतं, नवी मुंबईमध्ये अलीकडे ठिकठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यापेक्षा चालती फिरती कचरागाडी सुरू केली होती, त्यामागचा उद्देश असा होता की एखाद्या ठिकाणी कचरा कुंडी असेल तर लोक रस्ता ओलांडून कचरा पेटीत कचरा टाकण्याऐवजी रस्त्याच्या अलिकडूनच नेम धरून कचऱ्याची पिशवी भिरकावत होते ही वृत्ती कमी होईल. लोक ठराविक वेळेत कचरा गाडी आली की त्या कचरा गाडीतच कचरा गोळा करून देतील अशी अपेक्षा होती. पण झालं काहीतरी वेगळाच, लोक कचऱ्याच्या गाडीची वाट न बघताच रास्तावरच कचरा टाकू लागले आणि आता तर तिथे कचराकुंडी ही नव्हती त्यामुळे अगदी रस्त्यावरच कचरा साठू लागला. सरकारच्या ह्या योजनेचा आपल्यासारख्या लोकांनी कसा उपहास केला बघा. त्यानंतर नवी मुंबईमद्ये अजून एक योजना आखण्यात आली, ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पिशवीतून देण्याची. आमच्याकडे watchmen सांगत आला की उदयापासून अश्या दोन वेगवेगळ्या पिशव्या द्याव्या लागतील, नाहीतर कचरा घेतला जाणार आंही. लागलीच त्याच्या या बोलण्याला काटशाह केला गेला, म्हणे एव्हडा वेळ कुणाला आहे दोन दोन पिशव्यांत कचरा भरून द्यायला.
बघा म्हणजे किती अनास्था आहे आपल्या स्वतःमध्येच. सरकाने कितीही वेगवेगळ्या योजना काढल्या तरी आपल्यातले लोक त्या योजनांचाच कचरा करतायेत. असं करून शहरं कधीच सुधारणार नाहीत. आपणच पुढाकार घेऊन किमान मी तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही असं मनाशी ठरवा, शिवाय तुमच्या वर्तणुकीचे कोणीतरी अनुकरण करेलच की, किमान आपली मुलं तरी करतीलच, आपल्याला तेही पुरेसं आहे कारण तेच या देशाचे भवितव्य आहेत.
Women Empowerment …केवळ एक बुडबुडा
आज रात्रीचं जेवण जेवताना TV वर एक serial सुरू होती. त्या सिरीयल मध्ये स्वतःच्या बहिणीचा संसार दुसरी बहीण शर्थीचे प्रयत्न करून मोडू पाहत होती. या serial चे यापूर्वीही काही भाग मला असंच रात्रीचं जेवण जेवताना कधीकधी पाहायला मिळतात(आमच्या घरातल्या मी सोडून बाकी ladies ना अश्या serials पाहणं खूप आवडतं). असो तर त्या serial मध्ये ती दुसरी बहीण अविवाहित आहे आणि तिला तिच्या बहिणीच्या नवऱ्यातच interest आहे, त्यामुळे serial च्या प्रत्येक भागात काही ना काही कांड करून त्या जोडप्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे बघत असते.
बरं ही झाली एक serial, त्याच channel वर अजूनही बऱ्याच serials आहेत, त्याच सुमार दर्जाच्या. दुसऱ्या एका serial मध्ये दोघी समान दिसणाऱ्या पण स्वभावाने अतिशय भिन्न असण्याऱ्या मुली यांच्यातली चकमक दाखवली आहे. त्यातही रोज नवनवीन युक्ती(त्यांच्या serial मध्ये नवीन पण तशीच युक्ती याआधी दुसऱ्या serial मध्ये वापरून जुनी झालेली) आखून त्यातील चांगल्या स्वभावाच्या मुलीला आणि तिच्यासकट तिच्या कुटुंबाला त्रास देण्याची गोष्ट दाखवली जाते.
आता दुसऱ्या channel मध्ये थोडं डोकावूया. तिथेही अश्या illogical serials चा भडिमार आहे. त्यातील एक ज्यामध्ये serial च्या नायिकेचा नवरा एका दुसऱ्या अविवाहित मुलीच्या प्रेमात पडलाय. तो एवढा की त्याने त्याच्या बायकोसकट त्याच्या मुलाची जबाबदारी देखील नाकारलीय. बरं बायकोला असं वाऱ्यावर सोडायच कारण काय तर ती modern नाहीये. परंतु त्या नायिकेने नवऱ्याच्या या वागण्याला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलंय. आणि म्हणूनच ती केवळ काही दिवसांमध्येच इंग्रजी भाषा आत्मसात करू शकली शिवाय तितक्याच झपाट्याने एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेय. म्हणजे एखाद्या बाईला जर उद्योजिका म्हणून नावारूपास यायचं असेल तर शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव यांची फारशी गरज नसते बहुधा. त्याच channel वरची दुसरी serial ज्यात एक अत्यंत हुशार शिक्षिका अश्या माणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेली दाखवलेय ज्याला लिहिता वाचता येत नाही. पण तिने चंग बांधलाय त्याला शिक्षित करण्याचा आणि अहो आश्चर्य बघा, काही महिन्यातच त्याला लिहिता वाचता येऊ लागलंय.
या आणि अश्या अनेक channels वर अश्या अनेक serials चालू आहेत आणि होऊन गेल्यात ज्या इतक्या illogical आहेत, पण तरीही आपण त्या पाहत राहतो आणि कधीकधी त्यांना follow पण करत राहतो. खरतर हा निव्वळ waste of time आहे. या serials बघण्यापेक्षा अनेक दुसऱ्या channels वर खूप चांगले कार्यक्रम दाखवले जातात जे आपण स्वतः आणि शिवाय मुलांनाही दाखवू शकतो.
उदा. National Geographic Channel, Discovery किंवा history channel. या channels वर उत्तमोत्तम कार्यक्रम दाखवले जातात जे तुमच्या आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊ शकतात. I shouldn’t be alive हा त्यातील एक ज्यामध्ये सत्यघटना recreation च्या माध्यमातून आपल्याला समजावल्या जातात. एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी जर आपण अडकले आहोत तर आपण तिथून आपली कशी सुटका करून घेऊ शकतो याचीही माहिती मिळते. Your brain matters असाही एक कार्यक्रम discovery वर दाखवला जातो ज्यामध्ये मानवी मेंदूचे बरेचसे असामान्य पैलू उलगडून दाखवले जातात. असे बरेच कार्यक्रम आहेत त्यामुळे तुमच्या विचारांना आणि कल्पनाशक्तीला योग्य दिशा मिळते.
असो, खरतर मला women Empowerment च्या बुडबुड्याला फोडायचं आहे. या सर्व serials मध्ये अजूनही बायकांना अबला किंवा सोशिक दाखवलं जातंय असा माझा आरोप आहे. आणि आपल्यापैकी कित्येक जण हे अगदी रूचीने पाहत आहेत. TV वर दाखवलेल्या सुनेचे सासू हाल करताना दाखवलं की आमच्या सासूला त्या सासू चा राग येतो पण खऱ्या आयुष्यात तिच्या सुनेसोबत तसं होत असेल तर तिला यांत काहीच गैर वाटत नाही. मला आठवतंय जान्हवी नावाचं एक सुनेचे पात्र एका serial मध्ये होतं, ते अल्पावधीतच famous झालेलं. तिचा साधारण संपूर्ण दिवस कसा व्यतीत व्हायचा सांगते, सकाळी तिच्या सासवा तिच्यासाठी चहा नाश्ता बनवायच्या, तो खाऊन ती आणि तिचा नवरा दोघेही आपापल्या कामाच्या ठिकाणी निघून जात. कामावर पोहोचल्यावर तिथल्या मैत्रिणीशी गप्पा, त्यानंतर phone वर नवऱ्याशी गप्पा आणि नंतर तिच्या आईच्या phone वरील संभाषणाने हैराण होऊन घरी परतायला निघायची ही सून. घरी आल्यावर सुद्धा तिच्या सासवा हजर तिचं स्वागत करायला. आता माझा दिनक्रम सांगते, मी सकाळी पाच वाजता उठून माझा आणि नवऱ्याचा दुपारच्या जेवणाचा डब्बा बनवते शिवाय सासू आणि लहानग्याला चपाती भाजी बनवून ठेवते. मग माझी स्वारी रोजची local ट्रेन पकडण्यासाठी अक्षरशः घरातून चहादेखील न पिता बाहेर निघते, मला माझ्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन ट्रेन्स लागतात त्यामुळे एक चुकली की late mark निश्चित. असो, माझं काम जेमतेम 6 तासांचं आणि प्रवास दोन ते अडीच तासांचा. संध्याकाळी घरी आल्यावर छोटू बरोबर थोडी मस्ती आणि पुन्हा kichen मध्ये नंदेंच्या मदतीने काम.
Serial मधल्या पात्रापेक्षा माझी धावपळ नक्कीच जास्त आहे पण आमच्या सासूबाईंना serial मधली सून जास्त प्रिय आणि खऱ्या आयुष्यतील सुनेला मात्र सांसारिक काम नीट जमत नाहीत म्हणून टोमण्यांचा शालजोडी. त्याच पात्राची विशेषता म्हणजे तिचा पेहराव जो आमच्या सासूबाईंना आवडायचा पण तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यतील सुनेने मात्र तसा पेहराव केला की पुन्हा टोमणे, बाईने बाईसारखं राहावं, नाकाकानात दागिने,हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, कपाळावर मोठी टिकली वगैरे वगैरे.
आता मला सांगा कुठे दिसतेय women Empowerment? Serials मद्येही नाही की खऱ्या आयुष्यात ही नाही. खरतर बाईच बाईची शत्रू होत चाललेय. मुळात जन्मापासूनच मुलाला आणि मुलीला वाढवण्यात फरक करते ती बाईच. बाबांची तर मुलगी लाडकी असते. बाजारात गेल्यावर खेळणी विकत घेताना केलेल्या फरकपासून ते अगदी मुलीने काय शिक्षण घ्यावं आणि मुलाने काय शिक्षण घ्यावं यामध्ये फरक करून देणारीसुद्धा बहुदा बाईच असते. मुलगी परक्या घरी जाणार म्हणून वयात आल्यापासूनच बाईच्या जातीने अमुक एक करावं तमुक एक करू नये असे उपदेशाचे डोस देणारीही बाईच आणि लग्नानंतर सुनेला मुलगा kitchen मध्ये मदत करतो म्हणून बाईलवेडा आणि मुलीला जावई मदत करतो म्हणून देवमाणूस असं संबोधणारीही बाईच. वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे आणि serials मध्ये दाखवल्या जाणाऱ्या content मुळे त्यात काही बदल होईल असं मुळीच वाटत नाही.
किमान प्रसारमाध्यमांनी तरी बाईला सोशिक आणि केवळ शृंगारिक दाखवू नये ही अपेक्षा. नाहीतर समाज परिवर्तनाचे धडे केवळ पुस्तकांमध्ये आणि कायद्यांमध्येच बंदिस्त राहतील. ते प्रत्यक्षात उतरायला वाव मिळणार नाही. त्यामुळे शेवटी या प्रसारमाध्यमांना एकच म्हणू वाटतं Grow up!