Kavadse - Medium
अवघे एकशे सत्तर वयमान
सेथ थॉमस क्लॉक
Seth Thomos Clock
क्षण, मिनिटे, तास, वर्षे, युगे पादाक्रांत करत काळ पुढे जातोच आहे. काळाबरोबर सरतात-मिटतात माणसे, आठवणी आणि त्यांनी निर्माण केलेल्या, हौसेने जपलेल्या अनेक वस्तू. जुन्या वाड्यातल्या पाच पिढ्यांच्या साक्षीदार असणाऱ्या अनेक वस्तुंचा आशीर्वाद आम्हाला लाभला, तो जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या वस्तू म्हणजे कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा सांस्कृतिक, पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. त्यातील एक एक गोष्टीच्या अंतरंगात डोकावण्याचा हा छोटासा प्रयत्न!
‘सेथ थॉमस क्लॉक’ ज्या घड्याळांनी १८०० ते १९२० अशी सलग १२० वर्षे अमेरिकेत सर्वात मोठा बिझनेस केला त्या घड्याळाची कुळकथा आणि आमच्या घराशी असणारे ऋणानुबंध उलगडणारा हा लेख.
भटाला दिली ओसरी
तसं पाहिलं तर सजीव आणि निर्जीव यातील सीमारेषा अगदीच पुसट असते. माती नुसती पहिली की ती मातीमोल असते, मात्र जाणून घेतली की तिच्यातले नवनिर्माणकारी चैतन्य अनुभवता येते. काढलेली नखे निर्जीवच पूण बोटांशी जोडली असताना क्षणापूर्वी सजीवाचा एक भाग होती ना. निर्जीवात प्राणतत्त्व आले की ते सजीव अशी आपली ढोबळ व्याख्या.
आपण ज्यांना निर्जीव म्हणतो अश्या काही वस्तू आपल्याला माणसांशीच नाही तर गतकाळाशीही जोडतात. माहेरी गेल्यावर, निघून गेलेल्या आईची जुनी साडी दिसली ना तिचा आभासी का होईना सहवास, तिची लगबग, तिचे आईपण अनुभवता येते. साधे भांड्यांवरचे कोरलेले नाव ते देणाऱ्या व्यक्तीला आपल्यापर्यंत पोचवते. एखादा जुना काळा पांढरा फोटो पुन्हा एकदा हिमलायाची सैर घडवून आणतो.
अश्याच पाच सहा पिढ्यांशी नाते जोडणाऱ्या अनेक वस्तू आमच्या वाड्यात आहेत. अर्थातच त्या ‘अँटिक’ या सदरात मोडतात. जुन्या वाड्यात जुन्याच वस्तू असणार ना, त्यात नवल ते काय?
देवपाट -१५० वर्षांपूर्वीचा
नवल असे की आमच्या घरातल्या या वस्तू आणि माणसांची प्रोफाइल यांचा मेळच बसत नाही.
म्हणजे बघा ना भिक्षुकी करून पोट भरणाऱ्या गोपाळभटांच्या साध्यासुध्या घरात राणी व्हिक्टोरियाचे राजचिन्ह असणारा चांदीचा ‘इंपोर्टेड बिअर जग’ आणि अगदी मापाचा पेग सुद्धा.
बिअर प्याला
भिक्षुकाच्या ओबडधोबड मातीच्या भिंतीवर आहेत बुटक्या, मातीच्या छताला टेकलेली, काय तर म्हणे अठराव्या शतकातील जगातील सर्वात महाग आणि फक्त राजे महाराजांना परवडावित अशी घड्याळे आणि तीही ‘इंपोर्टेड’ बरका!
गुस्ताव बेकर घड्याळ
भिक्षुकाच्या ओबडधोबड मातीच्या भिंतीवर आहेत बुटक्या, मातीच्या छताला टेकलेली, काय तर म्हणे अठराव्या शतकातील जगातील सर्वात महाग आणि फक्त राजे महाराजांना परवडावित अशी घड्याळे आणि तीही ‘इंपोर्टेड’ बरका!
बरं गोपाळनाना पिढीजात श्रीमंत वगैरे अजिबात नव्हते. त्यांचे वडील म्हणजे आमचे खापर पणजोबा, आमच्या मुलांचे खापर-खापर पणजोबा ‘गणेश विरेश्वर दीक्षित’ हे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे भिक्षुकीच करत. तिथूनच १२-१३ किमी वर असणाऱ्या ‘रावेर’ गावातील ‘राजे-देशमुख’ यांचे ते मुख्य उपाध्याय होते. त्यामुळे सण-वार, कुलधर्म-कुलाचारास राजघराण्यात त्यांचे नेहेमीच जाणे येणे असे.
गोपालनाना दीक्षित
एखाद्या राजा-राणीच्या गोष्टीसारखेच इथेही होते. अमाप संपत्ती, ऐश्वर्य असणाऱ्या राजें-देशमुखांना मुलबाळ नव्हते, राजघराण्याला वारस नव्हता. मग एका भविष्यवेत्त्याने त्यांना सल्ला दिला की ‘तुमच्या नशिबी संततीयोग नाही. अनेक पिढ्यांचे आपले बऱ्हाणपूर राहणारे उपाध्ये गणेशभट दीक्षित यांच्या दोन मुलांपैकी एकास दत्तक घ्यावे तोच आपल्या कुलास लाभदायक ठरेल, आपला वंशही पुढे चालवेल’.
मात्र हा प्रस्ताव दीक्षित भटांना अजिबात मजूर नव्हता. गणेशभटांना दोनच पुत्र. गोपाळ आणि रघुनाथ. मुलांच्या मामांनी मात्र गळच घातली ‘अहो गर्भश्रीमंत, नावलौकिक असणाऱ्या घराण्यात मुलगा गेला तर तुमच्या गरिबीचे ठिगळ सांधले जाईल नव्हे भरजरी उपरण्यात मिरवाल हो’!
राजांच्या दबदब्यात आणि नातेवाईकांच्या दबावात गणेशभटाचा नकार पायदळी तुडवत दत्तकविधान झाले आणि चि. रघुनाथ गणेश दीक्षित ‘श्रीमंत राजे रघुनाथराव जयकृष्णराव देशमुख’ झाले.
श्रीमंत राजे रघुनाथराव देशमुख
हा धक्का सहन न होऊन गणेशभट घरातून नाहीसे झाले ते कायमचेच. आजतागायत त्यांचा ठावठिकाणा कोणालाही माहिती नाही.
रघुनाथरावांना आपल्या भावाचा-गोपाळचा खूपच लळा होता. त्यामुळे भावाला भेटण्यासाठी गोपालनाना रोज बऱ्हाणपूरहून रावेरला राजेंकडे येत असत. काही दिवसांनी राजे रघुनाथरावांनी आपल्या भावाला गाळ घातली की तुझे बिऱ्हाड इथे राजवाड्यातच घेऊन ये. कित्येक नातेवाईक कुटुंबासहित इथेच राहतात. मात्र गरीब तरीही स्वाभिमानी भावाने, श्रीमंत भावाचा आश्रित होण्याचा प्रस्ताव नाकारला. शेवटी राजे रघुनाथरावांनी भावाला आपल्या वाड्याशेजारीच एक साधेच पण दुमजली घर आणि जमीनजुमला भेट दिला आणि गोपालनाना रावेरवासीय झाले.
राजे देशमुखांच्या वाड्यात इंग्रज अधिकाऱ्यांचे येणे-जाणे होते. वाडा इतका मोठा की एका बाजूची आरोळी दुसऱ्या बाजूला जाईपर्यंत विरून जावी. लक्षुमीपूजनाला मोहोरांच्या थैल्यां ठेवायला खोली अपुरी पडे.
राजे रघुनाथरावांचे भावावरील निस्सीम प्रेम हेच मूळ आहे आमच्या घरातल्या ‘राजेशाही अँटिक’ वस्तूंचे. राजांनी विलायतेहून वस्तू मागवाव्यात त्या जोडीने म्हणजे दोन. एक आपल्यासाठी दुसरी आपला भाऊ गोपालनानांसाठी. दोन महागडी घड्याळेही त्यांनी मागवली, एक राजवाड्यात दिमाखात मिरवत राहिले तर दुसऱ्याने मातीच्या भिंतीवर चार पिढ्या आपले स्वत्व टिकवले.
त्यातल्याच एका घड्याळाची ही गोष्ट.
गोष्ट सेथ थॉमस घड्याळाची.
जळगाव जिल्ह्यातील अर्थात खान्देशातील रावेर तालुक्यातल्या आमच्या आदिम वाड्यात गेली एकशे सत्तर वर्षे, धीरगंभीर आवाजात एका पुराणपुरुषाचा जागर होता. त्या आधीच कित्येक वर्षे वाडा पाय रोवून उभा ठाकलेला. भरपूर माणसांचा राबता, वर्दळीच्या धामधुमीतही सर्वाना “टोले” देणारे, पाच पिढ्यांचे साक्षीदार हे आमचे खापर पणजोबाच! अर्थात हे आहे शतकोत्तर “सेथ थॉमस” कंपनीचे घड्याळ! (Seth Thomos Clock)
आमच्या वाड्यात जगप्रसिद्ध अशी मुख्य दोन घड्याळे आहेत. एकशे चाळीस वर्षापूर्वीचे “ गुस्ताव बेकर्स” (Gustav Bakers) या जर्मन कंपनीत जन्माला आलेले पणजोबा आणि दुसरे ‘खापर पणजोबा’ म्हणजे एकशे सत्तर वर्षांचे अमेरिकन “सेथ थॉमस वॉल क्लॉक”.
मला कधी ही पणजोबा -पणजीची जोडी वाटते, कारण ‘गुस्ताव’ लाकडातील नाजूक, नक्षीदार नजकातीची, डोक्यावर मुकुटासारखी नक्षी असणारी, जुन्या राजवाड्यातील अवखळ राजकन्या भासते तर थॉमस बघा कसा, धीरगंभीर तत्ववेत्त्यासारखा, आकारानेही उंचापुरा असा जाणता मूळ पुरुष!
गुस्ताव बेकर आणि सेथ थॉमस
या दोघांच्या संसाराने दीक्षितांच्या पाच तरी पिढ्यांचे संसार बघितले. अमेरिकेत बनवलेले हे घड्याळ आडबाजूच्या या गावात कसे आले, कोणी आणले याची अलीकडच्या तीन पिढ्यातही कोणालाच कल्पना नाही.
गावातल्या वाड्यात ते स्थित असताना टोल पडले की गल्लीभर ऐकू जायचे. पुण्यात आगमन झाल्यावर त्यांनी फ्लॅट मध्येही जुळवून घेतले. अजूनही दोघांचा संसार सुरळीत चालू आहे, अर्थात काळाबरोबर ते विनातक्रार प्रवास करतात.
सेथ थॉमस ची कुळकथा अलीकडेच आमचे मित्र श्री दांडेकर यांनी सांगिल्यावरच समजली. मग त्याच्या इतिहासाचा धांडोळा घेतला. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक व्यावसायिक आयुष्य लाभलेली, ही घड्याळे बनवणारी अमेरिकन कंपनी श्री सेथ थॉमस यांनी १८१३ साली स्थापन केली. अमेरिकेतील कानेक्टिकट प्रांतातील वोलकॉट येथे १७८५ मध्ये जन्मलेल्या थॉमस यांनी १८०७ मध्ये एली टेरी यांच्या घड्याळ कंपनीत नोकरी सुरु केली. १८१० मध्ये ती कंपनी तत्कालीन ६००० डॉलर ला आणि १८१३ मध्ये श्री क्लार्क यांचाही व्यवसाय त्यांनी विकत घेतला. सन १८०० ते १९२० पर्यंत अमेरिकेतील हा सर्वात मोठा बिझनेस होता.
त्या काळातील युरोप मधील जर्मनी ,इंग्लंड, फ्रान्स मधील महागडी घड्याळे सर्वसामान्य अमेरिकन्सना परवडत नसत. हे ओळखूनच थॉमस यांनी कॅलेंडर, म्युझिकल, किचन, मार्बल, इलेक्ट्रॉनिक, एसी अशी विविध घड्याळे वॉलनट, ओक च्या सुंदर, आकर्षक केसमध्ये बाजारात आणली. अर्थात क्वालिटीशी कुठेही तडजोड न करता!
जगभरात १८४२ पर्यंत घड्याळाच्या आतील भाग लाकडाचे बनत. त्यानंतर ही जागा पितळेने घेतली. १९१८ पर्यंतच्या घड्याळात शाईने तारखेचा ठसा मागे किंवा खाली छापलेला असे. वर्षाचा आकडा उलट्या क्रमांकाने तर महिन्याच्या क्रमांकानुसार अल्फा बेट वापरले जाई .म्हणजे जानेवारीसाठी A, फेब साठी B. उदाहरणार्थ- एप्रिल १८९७ साली तयार झालेल्या घड्याळाचा कोड असे- ७९८१- D.
यथावकाश थॉमस क्लॉक कंपनीचे कॅलिब्रि (calibri group of watches) ग्रुप मध्ये विलीनीकरण झाले. १८५९ साली थॉमस यांचे निधन झाले.
Plymouth C.T. या गावाचे नाव थॉमस यांच्या बहुमानार्थ ‘Thomaston’ असे ठेवले गेले.
आजही “ Founding Father of the Clock companies” म्हणून थॉमस यांचे नाव आदराने घेतले जाते.
ऋणानुबंध
“ठ णण…ठ णण”. रात्रीच्या निरव शांततेत अचानक या खापर-पणजोबांचे टोल तब्बल १२ वेळा दणाणतात आणि काळजाचा ठोका चुकतो. याचा तुम्ही फक्त गजर ऐका, जणू वादळाचे केंद्र तयार होते की काय अशी कंपने हवेत उठतात. कधी हा फॉरेनर बापमाणूस एका छोट्या खेड्यात, गोपालनानांच्या, अण्णांच्या माजघरात, जुन्या भिंतीवर, जवळजवळ पावणेदोन शतके अधिराज्य करत होता.
आमचे पूर्वज ‘थॉमस’ च्या सुचनेनुसारच मुहूर्त गाठायला, उपरणे सावरत पूजेला जात असतील, सौ चिमाबाईंपर्यंत माजघरात याचा सांगावा पोचत असेल.
गणेशभट आणि सौ अन्नपूर्णबाई यांचा संसार याच्याच तालावर आणि टोलांवर संपन्न झाला असेल.
गोपाळरावांची आन्हिके, शाळेत-शेतावर जाण्याची वेळ आणि यमुना बाईंची स्वयंपाक पाण्याची गडबड याचे वेळापत्रक यानेच ठरवलेले असणार.
बळवंतरावांचा तसा राजेशाही थाट होता. पानाचे चांदीचे तबक घेऊन झुल्यावर झुलताना, घड्याळाचा धीरगंभीर आवाज ऐकत त्यांनी अत्तराचा फाया कानात सरकवला असेल. अन्नपूर्णबाईंनी या थोरल्या बापमाणसाची वेळ पाहूनच अहोंना हाक दिली असेल.
अन्नपूर्णबाईं-बळवंतराव
सीतारामदादा, नारायणबाबा, विष्णुपंत यांचे लहानपण, विष्णुपंत -उषामाईंची आयुष्याची उस्तवार यानेच अनुभवली असणार.
उषामाईं
गयामाई
संसार म्हणजे काय हे कळायच्या आत बालविधवा होऊन माहेरी आलेल्या, लाल आलवणातल्या गयामाई आत्याचे दबलेले उसासे याच्याशिवाय कोणाला कळले असतील.
मुलांच्या बाललीलात हा बापमाणूस पोर झाला असेल. दुलीचंद ,देवराम,उखरडू, तुळशीराम यांच्यासाठी त्यांच्या मालकांएव्हढाच थॉमसजी घड्यालजींचा मान होता.
मनिषा, आशा, मानसी,ज्योती, स्वाती, या सुनांना याचाच वडीलकीचा आशिर्वाद लाभला. आता नातवंड पतवंडाचे भरजरी सुख पांघरून आता पुण्यात स्थिरावलेत हे आमचे खापरपणजोबा!!!
मागील वर्षी सुनेला-अपर्णाला घेऊन मी आपला वाडा दाखवायला घेऊन गेले. जमीन-भिंती धूळ माखून उभ्या होत्या, मात्र थॉमस खापरपणजोबांचा निवास असणाऱ्या भिंतीवरच्या आकारठश्याने आपली शतकोत्तर मुद्रा त्यावर कोरली होती.
II इति लेखनसीमा II
जाणून घ्यायचाय या घड्याळाबद्दल? मग पुढील माहिती वाचाच.
Plymouth Hollow, Connecticut
(After 1865) Thomaston, Connecticut
Seth Thomas
Seth Thomas was born in Wolcott, Connecticut in 1785, the fifth of seven children of Scottish immigrant, James Thomas, a cooper, and his wife Maria Ward. Connecticut, incidentally, was an important and expanding hub in the American clockmaking trade.
Seth Thomas Childhood Home, 36 Peterson Ln
(photo above c.1984 — link to c.2005 photo)
He was born in this house and lived there until about 1810.
Current Photo • Current Map
Seth had a natural ability for carpentry and he probably obtained his knowledge and interest in mill property and manufacturing from this.
He had imited formal education and left school at an early age to become an apprentice carpenter and joiner to Daniel Tuttle, of Plymouth.
Seth was apparently a man of few words with great energy and perseverance in all that he did; thus, he paid strong attention to the duties of this apprenticeship. Subsequently, he became a skilled woodworker and built houses and barns in the nearby towns around Farmingbury/Wolcott (incorporated 1796).
In the early 1800s, Seth attempted to set up a clock-making industry in Wolcott. He made his first clock in his family’s house. The woods around the house were filled with mountain laurel trees; many Wolcott men worked cutting the trees and sawing them into thin slices, which, when seasoned, were used for the wooden wheels of the clocks. The women of the town spun flax (cotton) into cords and these were used to hold the clock weights. As a result, the town of Wolcott profited to some extent from the Thomas enterprise, the short time it was located in Wolcott.
In 1807, Seth moved to Plymouth. There he joined Eli Terry and Silas Hoadley in a business of making clocks at a wholesale rate. Seth mainly worked on fitting the wheels and different clock parts together. From 1807 until 1810, they made 4000 clocks of the “hang-up” or “wag-on-the wall” type. These clocks did not have cases, but buyers who wanted cases for their clocks hired carpenters to build what they called “grandfather cases” for them.
In 1810, Thomas and Hoadley, for $6,000, bought out Terry’s share of the company, by then the most successful clockmaking firm in the country, and worked together until 1812. On December 4, 1813, Seth Thomas sold out his share of the company to Hoadley for $2,000, and went into business on his own in Plymouth Hollow on land he purchased from a former apprentice of Eli Terry. The land included a clock factory and was conveniently located near Eli Terry’s new shop (where was the non-compete agreement?).
Thomas continued Clark’s wooden movement tall clock production, and about 1817 began making the wooden movement shelf clock. These were cased in pillar and scroll cases until 1830, when the bronze looking glass and other styles became popular. In 1842, brass movements were introduced, and first cased in the popular O.G. case (which was made until 1913). Wood movements were phased out in 1845.
Seth Thomas home purchased in 1838, now a museum
The Seth Thomas Clock Company was organized as a joint stock corporation on May 3, 1853 to succeed the earlier clockmaking operation of the founder. Seth Thomas (1785–1859) had been manufacturing clocks at the site since 1814.
Seth’s first wife was Philinda Tuttle; they married in the early 1800s and had a daughter, Philinda. His second wife was Laura A. Andrews. They had six children Seth, Martha, Amanda, Edward, Elizabeth, and Aaron. Seth Jr. and Aaron went into the clock business with their father, subsequently enlarging the clock factory and developing it into a worldwide business.
After Thomas’ death in 1859, the town of Plymouth CT was renamed “Thomaston” in his honor. At that time, Aaron became President and began to add new products.
About 1862, the firm purchased the patent rights of Wait T. Huntington and Harvey Platts of Ithaca, New York and added three models to their line that year. The earliest of the clocks indicate only three patent dates on the dials, September 19, 1854, November 17, 1857 and January 31, 1860. The fourth and final patent of March 1, 1862 is carried on most of their calendar clocks manufactured until 1875 or 1876. On February 15, 1876 Randall T. Andrews, Jr., a Thomas relative and workman in the factory, received a patent on an improved mechanism. This was put into production and utilized on all later perpetual calendar clocks until the last model was dropped in 1917.
Movement Dept — Thomaston CT
Regulator clocks were introduced in 1860. The patterns and machinery for these had been purchased in 1859 from the creditors of bankrupt clockmaker Silas B. Terry. Spring driven clocks were introduced ca. 1855–1860. Perpetual calendar clocks were made from ca. 1863–1917. Some of the most popular later types include walnut kitchen clocks, made from 1884–1909; marble clocks, 1887–ca. 1895; black (Adamantine finish) wood mantel clocks, ca. 1885–1917; black enameled iron cased clocks, 1892–ca. 1895; oak kitchen clocks, 1890–ca. 1915; tambour clocks, introduced in 1904; chime clocks, introduced in 1909; and electric A/C clocks, introduced in 1928.
The Seth Thomas Clock Company was very prosperous into the 20th Century and was considered the “Tiffany’s” of Connecticut clock manufacture, even by their competitors. Between 1865 and 1879 they operated a subsidiary firm known as Seth Thomas’ Sons & Company that manufactured a higher-grade 15-day mantel clock movement and during that period were major supporters of a New York sales outlet known as the American Clock Company. They also became a major manufacturer of tower and street clocks after 1872 and in between 1915 were manufacturers of jeweled watches.
“That our business has throughout half a century steadily increased from a small beginning to its present dimensions, is sufficient evidence of the quality of our work. No pains will be spared to maintain and increase the reputation of the ‘SETH THOMAS CLOCKS’ and we give our warrant to the full amount of the cost, that every clock that leaves our factory, if properly used, will prove a good Time Keeper.”
–Excerpt from an 1863 Seth Thomas catalog
Many Seth Thomas clocks from 1881 to 1918 have a date code stamped in ink on the case back or bottom. Usually, the year is done in reverse, followed by a letter A–L representing the month. For example, April 1897 would appear as 7981 D.
On January 1, 1931, the firm became a subsidiary of General Time Instruments Corporation and soon passed from family control.
In 1955, a flood badly damaged the Seth Thomas factory. They phased out movement manufacturing and began importing many movements from Germany. Hermle, in the Black forest of Germany, has made many movements for Seth Thomas clocks.
Former Seth Thomas Factory
The firm’s decline was gradual over the next 50 years and culminated by purchase of Seth Thomas by Talley Industries in 1968 and moving from Connecticut to Norcross, Georgia somewhere between 1975–1979.
It was reported in 1988 that the firm was all but dissolved. In June 2001 General Time announced that it was closing its entire operation. The Colibri Group acquired Seth Thomas. The NAWCC (the National Association of Watch and Clock collectors) purchased from Seth Thomas their collection of historical records, drawings, photographs, advertisements and documents.
In 2003, The Clock Guy was contacted at that time by a staff member at General Time regarding disposition of their collection which was subsequently sold to private collectors.
In January, 2009, The Colibri Group unexpectedly shut its doors, laying off its 280 employees and preparing to sell all remaining jewelry, gold and silver to pay creditors. The following message appeared on the Colibri website: “February 16, 2009: The Colibri Group is currently in receivership and is not accepting any orders at this time. We are also unable to repair or replace any items returned to us for the time being. We will do our best to ensure that items that have been sent to us will be returned to the respective customer or owner. We will update this message as new information becomes available. We are sorry for the inconvenience. Thank you for your patience.”
R.I.P. Seth Thomas
Dating Seth Thomas Clocks
Some early Seth Thomas clocks can be dated by the address of the printer (Elihu Geer) who printed the labels found inside. If your label is still intact, the printer’s name and address can be found in small print at the bottom of the label. Based on the printer’s then-current physical address, you can extrapolate the approximate period of manufacture using this table:
26 ½ State St.
1839–1834
26 State St.
1845–1846
1 State St.
1847–1849
10 State St.
1850–1855
16 State St.
1856–1864
18 State St.
After 1865
Additional Seth Thomas History Links:
● History Article/References
● City Series Clocks
● 30-Hour Clocks
● Adamantine Clocks
● Seth Thomas Regulator №2 Identification Guide (PDF)
Do you have a clock to sell? We’ll sell it for you!
Are you seeking a clock? We’ll find it for you!
Antique Clocks Guy
The Clock Guy Antique Brokerage
A family-owned company
founded on the “3 Rs”
Respect, Responsibility, Reputation
NAWCC #35749 Since 1973
-Vista, CA-
How To Contact Us
आमचे खापरपणजोबा was originally published in Kavadse on Medium, where people are continuing the conversation by highlighting and responding to this story.
मीना नदीच्या काठावरील, नारायणगाव -जुन्नर परिसरात झालेली आयुष्याची सुरुवात, पुन्हा मागे वळून पाहताना सापडलेले काही क्षण आणि नदीकडे टाकलेला दृष्टिक्षेप. मिनाई किंवा कोणतीही नदी, तेव्हाची-आत्ताची यात केव्हढे अंतर पडलेय. त्यासाठी मी नक्की काय करतेय? काय करायला हवंय? याबद्दलचे मनातले काही कवडसे इथे प्रतिबिंबित करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
पर्यावरण पूरक जीवन शैलीतून या प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? त्यासाठी underline अर्थात रेखांकित केलेल्या शब्दावर क्लिक करून छोटे व्हिडिओज पहा.
“So, my dear students…on this note, will stop here, hope you have understood the concept, the river system.”
“नदीप्रणाली” ... उगम ते मुख याबद्दलची ‘शुद्ध भौगोलिक’ चर्चा करून समाधानाने वर्गाबाहेर पडणे हे मी गेले कित्येक वर्षे करत होतेच, मीच काय माझे शाळेतले आणि अगदी विद्यापीठातील शिक्षकही याला अपवाद नव्हते.
प्रत्येक विषयाने आपापल्या सीमारेषा अगदी काटेकोरपणे आखलेल्या! इतर विषयांची लुडबुड त्यात नाहीच.
नदीचा धडा म्हणजे उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया, आणि भुरूपे!
मीना नदी, नारायणगाव
‘नदीचे महत्त्व सांगा’?? या प्रश्नावर, तयार असते तिच्यापासून, फक्त आणि फक्त माणसालाच मिळवायच्या फायदयांची यादी! आणि ‘multidisciplinary approach’??? “ हे काय असतं रे भाऊ?”
‘अहो अस कसं? प्रत्येक विषयाची जी philosophy अर्थात तत्वज्ञान असतं ना त्यात आवर्जून असतं बर का हे प्रकरण!’
थोडक्यात काय, तर मी आहे ‘‘भूगोळ आहे भूमंडळी’ या समर्थ रामदासांच्या उक्तीला आणि विश्वाच्या प्राचीनतेला प्रमाण मानून प्रामाणिकपणे अध्यापन करणारी, शहरातली, भूगोल विषयाची प्राध्यापिका. पूर्वी जिवंत- रसरशीत खराखुरा भूगोल मी माझ्या नारायणगाव या त्यावेळच्या छोट्याश्या टुमदार खेड्यात अक्षरशः जगत होते.
मिनेर — मीना नदी उगम. अर्थात पाचूचे बेट जुन्नर तालुका
दोन वेशींमधले सडा रांगोळ्यानी सजलेल्या रस्त्याभोवतली वसलेले, सह्याद्रीच्या लेकींच्या म्हणजे छोट्या टेकड्यांच्या कुशीतले, गच्च- दाट हिरवाईच्या किनाऱ्यांमधील, मीना नदीची आरसपानी झुळझुळ अनुभवणारे माझं गाव, हाच भूगोलातला महत्वाचा अध्याय होता हे शाळेतल्या अभ्यासातून कधी समजलेच नव्हते, अर्थात ही माझी मर्यादा असेल. आजही विद्यार्थ्यांना, प्रत्येक विषय शिकताना औपचारिक शिक्षण आणि जीवन याचा सहसंबंध किती असतो आणि समजतो याची शंकाच आहे.
माझ्या गावात व्रत-वैकल्यातून, लोककथांतून, प्रथांतून, संकेतांतून निसर्ग जपला जायचा. पिंपळावरच्या मुंजाच्या भितीने आणि राखणदार खंडोबाच्या गोष्टींनी किती झाडे वाचली, अपार श्रद्धेमुळे देवराया- त्यातले वनचर निर्धास्त झाले, अंधार पडल्यावर येणाऱ्या भुतांनी लेंडी ओढ्यावर पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांना माणसांपासून अभय दिले. उन्हाळ्यात आटलेल्या नदीची, हाताने थोडी वाळू बाजूला करताच,थंडगार झिऱ्याचे पाणी आणि बांधावरची झाडे तन-मन तृप्त करायची. उकिरडे होते, प्रदूषण नव्हते. संसाधने आणि गरजा दोन्हीही अगदीच कमी. भूगोल- निसर्ग आधी मला प्रत्यक्ष भेटला आणि पुस्तकात मागाहून
मीना नदी “खडकात जपलेली हिरवाई”
शहरी जीवन स्वीकारल्यावर होणारी दमछाक आपल्याला सुखासीनतेच्या शोधात कृत्रिमतेकडे नेते. शहराशी जुळवून घेताना lifestyle कधी-कशी बदलत गेली ते समजलेच नाही. कपाटातले चार सहा कपडे-जोड ठेवायचे कपाट जाऊन वॉर्ड रोब भरला, जाहिरातींच्या माऱ्याने कधी न वापरलेली cosmatics जीवनावश्यक गरज बनली, कोणतीही गोष्ट किती जास्त काळ वापरता येईल या विचारावर ‘use & through’ ने ‘सोयिस्कर’ मात केली. शिकेकाई च्या जागी सुगंधी फेसाळ शाम्पू तर old fashioned ५०१ सारखा साबण ‘कपडोंकी चमकार’ च्या तेजाने अंधारात फेकला गेला, दातून, राखुंडी, दंतमंजन असे गावठी प्रकार सोडून पेस्ट-ब्रश ने आम्ही आधुनिक झालो…एकविसाव्या शतकाकडे ‘प्रगतीसाठी’ झेपावलो.
शहरीकरणाचा चुंबक खेड्यातल्या माणसांनाच आपल्याकडे खेचत नाही तर पैशांची दौलतजादा निसर्ग- पर्यावरण समतोल हिरावून घेते. पुण्यात आल्यावर, स्थिरावल्यावर आणि मुख्य म्हणजे शिक्षक म्हणून काम करताना याची प्रकर्षाने जाणीव अस्वस्थ करू लागली . lithosphere, atmosphere, hydrosphere, इको-सिस्टिम्स याची चर्चा, लठ्ठ मुठ्ठ पुस्तकातल्या गुळगुळीत पानांतील ज्ञान विवेचन, आणि आजूबाजूचे उध्वस्त होत जाणारे पर्यावरण यांचा ताळमेळच लागेना. नदीप्रणाली, जलचक्र, याबद्दल वर्गात कळकळीने शिकवले, छान व्हिडिओज दाखवले तरी पुलावरून जाताना छिन्न-विच्छिन्न मुठा नदी आणि गावाला गेलं की लोकांनी वाळीत टाकलेली मीना नदी जाब विचारायची…. अजूनही नद्याच काय पण सुकलेला ओहोळ पण जाब विचारतो. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांकडे आहेत, पण प्रश्न हा आहे की बहुतेक सगळ्यांना प्रश्नच कळले नाहीत म्हणून कोणा एकाकडे उत्तरेच नाहीत.
विकासाचा शाप — शहरीकरण
अर्थात विषयाची गरज म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्तींचे मार्गदर्शन आणि त्यांच्या कामात छोटासा सहभाग लाभला आणि पर्यावरणीय समस्या किती गुंतागुंतीची आहे हे लक्षात आले. ग्लोबल वॉर्मिंग वर कितीही काही करावेसे वाटले तरी मी एक व्यक्ती म्हणून जादूच्या काडीने नाही ना काही करू शकत! आज प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते, तसेच मलाही वाटते. माझ्यासारखी सामान्य व्यक्ती घर-दार, संसार, नोकरी सांभाळून पर्यावरणासाठी नक्की काय योगदान देऊ शकते?
मी गटारवाहिनी नाही हो…जीवन दायिनी आहे.
असे वाटत असतानाच आदरणीय गोळे सरांनी स्थापन केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटीने नव्याने सुरु केलेल्या एक वर्षाच्या sustainable management कोर्स मध्ये प्रवेश घेतला. तिथल्या महाजन सरांनी सांगितलेल्या जाबालाच्या गोष्टीत रंगून गेल्यावर एकच ब्रह्मवाक्य मनावर ठसले ‘पर्यावरणाचे ज्ञान हेच ब्रह्मज्ञान होय’. गोळे सरानी ‘environmental restoration’ ची गरज अधोरेखित केली. स्वाती मॅडमच्या वर्गामधून विविध भुरूपे, नदीप्रणाली आणि त्यांची पर्यावरणीय सेवा किंवा कार्ये हे नव्यानेच उलगडत गेले. त्यातून एक जाणीव झाली की ‘विद्यार्थ्यांना केवळ नैसर्गिक घटक तयार होण्याची प्रक्रिया आणि वितरण (formation process & distribution) आणि अर्थातच त्याचे आर्थिक फायदे या पलीकडे जाऊन त्यांची पर्यावरणिय कार्ये (ecological services ) समजावून सांगण्याची आणि इको-सिस्टिम्स च्या पुनरुज्जीवनाची आज नितांत गरज आहे.
‘एक शिक्षक म्हणून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’…आपण काय महान कार्य करताय पर्यावरणासाठी’?…मीच मला प्रश्न विचारू लागले.
‘हो, reuse, reduce, refuse वगैरे थोडेफार करते, जमेल तसं.’ माझं गुळमुळीत उत्तर.
बरेचदा असच होत की पर्यावरणाचा विध्वंस आणि त्याची व्याप्ती डोळ्यासमोर दिसते मात्र त्यात आपण काय- किती करायचं, आपण एकटे काय करणार याबद्दल मनात खूप गोंधळ असतो. ‘अर्थात मूळ पुणेरी लोकांना असा अजिबात प्रश्न पडत नाही, कारण त्यांना सगळ्यातले सगळेच माहित असते’ असं माझी पुण्याबाहेरची मैत्रीण म्हणते.
तर जलबिरादारी, सागरमाथा, जीविधा, ऑइकॉस, वसुंधरा, जिवीतनदी अश्या संस्थांशी नाते होतेच. प्रत्येक गृहिणी करते तसा निगुतीने संसार करत पाणी, विजेची बचत वगैरे फंडे वापरत होते. पोरांवर ‘ए s s नळ हळू सोड रे’ असे ओरडून पर्यावरणाचे महान कार्य केल्याच्या अविर्भावात वावरत होते.
पर्यावरणीय प्रश्नांचे अनेक पैलू-प्रश्न अनेकांकडून समजून घेतले ना तरी त्याचे आपण आपल्यापरीने, आपल्यासाठीची उत्तराची रेसिपी आपणच तयार करायची असते. ग्लोबल वॉर्मिंग मुळे मोठ्या प्रमाणात झालेली ध्रुवीय प्रदेशाची आणि पर्यायाने पृथ्वीची झालेली वाताहत पाहून काही क्षण रक्त जरूर उसळते पण शेवटी ऍक्शन मात्र वैयक्तिक पातळीवरच घ्यायची असते.
जिवीतनदीच्या तीन दिवसांच्या कार्यशाळेने मात्र एक साक्षात्कार झाला की मी माझ्या कृतीतून पर्यावरणीय प्रश्नांना सामोरी जाऊ शकते, ‘घरातून सुद्धा माझ्या परिने मी नदीची स्वछता करू शकते आणि माझे उत्तम स्वास्थ्य हा त्यावरचा बंपर बोनस’! ‘नदीतील ७०% पेक्षा जास्त प्रदूषणाचा वाटा हा आपल्याच घरातून जाणाऱ्या सांडपाण्याचा आहे’ हे विदारक सत्य मनाला सलायला लागले. जीवनशैली पर्यावरणपूरक बनवणे हाच त्यावरचा एकमेव उपाय! हे नक्की व्हावे कसे? करावे काय काय आणि कसे?
माझ्या डोळ्यासमोर आल्या माझ्या आज्या, पणज्या, मोठी आत्या …अशा कितीतरी. आजी दुधाच्या रिकाम्या झालेल्या भांड्यात कणिक भिजवून दूध -साईचा कणही वाया घालवायची नाही, पणजीचे डोळे अंधुक असले असले तरी पानात टाकलेले तिला बरोब्बर दिसायचे आणि तिच्या धाकाने सगळ्यांचे ताट स्वच्छ व्हायचे, वर ‘खाऊन माजा, टाकून माजू नका’ हा धडाही गिरवला जायचा. कामवाली ठकू राखेने भांडी घासायची आणि ओंजळी ओंजळीने, दोनघमेली पाण्यात, दोन घमेलीभर भांडी लखलखून चमकायची. हे होते आजच्या भाषेतील “Reduce” हे पर्यावरणातील तत्व.
सुट्टीत सगळे जमल्यावर तर आया-आज्या, पोरे-नातवंडांच्या वापरलेल्या कपड्यांचा जंगी exchange एक्स्पो इव्हेंट लावायच्या. आजीची आपल्या सगळ्या पोरांकडे फेरी असायची तेव्हाच ‘आंद्याला हा स्वेटर लहान व्हायला लागला, धाकट्या चंद्याला बरोबर बसेल हे तिने हेरलेले असायचे, त्यानुसार कपड्यांची अदलाबदल व्हायची. फ्रॉक च्या बदल्यात वापरलेले का असेना, पण परकर पोलके मिळाल्याचा कोण आनंद होता. हे आजचे “Reuse”, आणि सणावाराशिवाय कोणत्याही नवीन कपडे, वस्तुंना, गोडा धोडाला “Refuse’ च असायचे तर आई-काकूंची जुनेरे गोधड्यांतून ‘Renew’ होत. अशी हजारो उदाहरणे. आणि मुख्य म्हणजे हे कोणत्याही विद्यापीठात जाऊन शिकलेले ज्ञान नव्हते तर ती प्रतिष्ठेचा, बडेजावाचा अभिनिवेश न बाळगता सहज स्वीकारलेली, साधी सोपी जीवनपद्धती होती.
थोडक्यात ‘go back to your roots’ हा फंडा आमलात आणायचा तर! मागे वळून बघायचं तर -आई आजी अंतर्धान पावलेल्या. पण ऋषितुल्य शास्त्रज्ञ NCL चे डॉ. प्रमोद मोघे सर आणि त्यांची टीम मदतीला होतीच.
सर्वात आधी आठवले ते आईचे भरपूर कोमट तेल लावून नंतर कचोरा, वाळा, नागरमोथा यांनी सुगंधीत शिकेकाईने खसखसून न्हायला घालणे. नंतर उन्हात मोकळे केस वाळवणे. गावात आठवडे बाजारात किंवा भीमाशंकरच्या महाशिवरात्रीच्या यात्रेत जंगलात रहाणारे आदिवासी शिकेकाईच्या शेंगांचे ढीग लावून ते विकायला बसायचे. आज त्याच भागातल्या आदिवासी तरुण मुले -मुली चार- आठ आण्याचे, नित्कृष्ठ दर्जाचे शाम्पू सॅचेज वापरतात.
शाम्पू च्या कृत्रिम फेसात असे अस्सल अनुभव हरवल्याची पहिल्यांदाच जाणीव झाली. बाजारात जाऊन शिकेकाई आणल्यावर घरात आणि मैत्रिणींमध्ये ‘हाहाकार’ माजला अर्थात हसेच झाले आणि ‘शेवटी गावंढळच’ असे दबके टोमणेही उमटले. आता मला शिकेकाई आणि रिठ्याचे शास्त्रीय गुणधर्म माहित होते आणि शाम्पू ने उधळलेले गुणही. शिकेकाई हा नैसर्गिक साबण आहे तर बाजारू उत्पादनांतील सोडियम लॉरेल, सल्फेट, ट्रायकलोसॅन अशा अनेक विघातक रसायनांनी, सुगंधांनी, नाशकांनी, माणसांना आणि निसर्गाला उध्वस्त करणारा बाजार मांडला आहे. असे शाम्पू, पेस्ट, डिटर्जंटस, सौंदर्य प्रसाधने किती सहाय्यक आणि किती विघातक अशी तुलना केली तर?
या गोष्टी पैसा फेकून पटकन कुठूनही घेता येतात , झटकन वापरायला खूप सोप्या, बर कोण्या प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःचे गुळगुळीत, झुळझुळीत केस उडवत आपल्याला खात्री दिलेली, पण आपण काळी का मेकअपने गोरी, अश्या न पाहिलेल्या हिरॉईनने तुमच्या गोरेपणाची आणि केसांच्या काळेपणाची का खात्री द्यायची ? तुमच्या केसांना कोणते प्रोटीन आवश्यक हे तिने ठरवायचे?
आपल्या लाडक्या, झोपेत असणाऱ्या रणबीरने तर ‘या’ पेस्टने दात घासताच, रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर सगळे प्रवासी बेधुंद नाचणार! …मग काय विचारता…अशी श्वासाबरोबर ताजगी पसरली असती ना तर करोना पसरायला इतके महिने लागलेच नसते.
…आणि हो, tv वर टूथपेस्टच्या जाहिरातीतला एप्रन घातलेला, डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने तुम्हाला “हीच” पेस्ट घ्या असा सल्ला देतो. पेस्टची जाहिरात करणारा, एप्रन घातलेला हा माणूस डॉक्टरच कशावरून हो?
जाहिरातींच्या पुतनामावशीने बेबी शाम्पू, बेबी पावडर यातून अगदी नवजात बाळांवरही मुक्तहस्ते पान्हा सोडलाय.
या सगळ्यातल्या विषपेरणीचे उत्तर आहे कोणाकडे?
अश्या मार्केटिंगच्या, स्वप्नाळू-भुरळ घालणाऱ्या वाशिकरणाने आपली सारासार बुद्धी बहुतेक “गहाण’ मोडमध्ये जाते. यात कोणालाच किंवा स्वतःलाही दोषी ठरवायचा हेतू मुळीच नाही कारण शाळा कॉलेजमध्ये हे तुम्हा-आम्हाला कधी शिकवलेच गेले नाही. औपचारिक शिक्षण म्हणजे काहीतरी अगम्य गोष्टींचे ज्ञान, त्याचा आणि प्रत्यक्ष आयुष्याचा दुरान्वये पण संबंध येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली गेलेली असते.
… तर कित्येक वर्षांनी ‘शिकेकाई मिळते का हो तुमच्या दुकानात? काय भाव?’ या चौकशीतून औपचारिक पर्यावरणीय प्रयोगांना सुरुवात झाली. Toxin free lifestyle हाच महामंत्र ठरला! पर्यावरण पूरक गोष्टीच तयार करायच्या आणि वापरायच्या. नेहेमीचे कारण सांगितले जाते की अश्या गोष्टींना आमच्याकडे अजिबात वेळ नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकेकाई, रिठे वाळवणे, दळणे हे नेहेमीच्या हळद, तिखटाबरोबरच दळून आणले गेले. वर्षभराची साठवण झाली.
शाम्पूची महिन्या दोन महिन्यांनी नवी प्लास्टिक बाटली विकत आणणे, त्यासाठीचा वेळ, पैसा, नंतर ती फेकणे आणि निसर्गात कचरा बनून रहाणे, त्याउप्पर त्यातील रसायनांचा आपल्या शरीरावर, नदीवर आणि एकूणच पर्यावरणावर होणारा घातक परिणाम…याउलट saponinअर्थात नैसर्गिक detergent देणारे, वर्षभर केसाबरोबरच, तांब्या -पितळी भांडी, दागिने आणि अगदी नदीचीही स्वछता करणारे शिकेकाई-रिठे आणि रसायनयुक्त, नदी- त्यातील जीवसृष्टी उध्वस्त करणारा शाम्पू याची तुलना कोणी करू शकते? दोन्हीची life cycle assessment अर्थात जीवन प्रवास आणि परिणाम याचा लेखाजोखा कोणाचेही डोळे खाडकन उघडेल.
शाम्पू ऐवजी मी शिकेकाई वापरली म्हणजे झाले का पर्यावरणाचे महान कार्य? घरातूनच नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न प्रत्येक ‘मी’ ला नक्की पडेल. आपली जीवनशैली नदीसाठी पर्यायाने आपल्या सर्वांसाठीच बदलण्याची गरज आहे. मीही घरातल्या बाजारू वाहिवाटेला फाटा देऊन घरीच रिठा -शिकेकाई कपड्यांचा साबण, फळांच्या उरलेल्या सालींपासून bio -enzyme, भांड्याची पावडर, फेस पावडर असे कित्येक प्रयोग घर नोकरी सांभाळत करून बघितले. त्याविषयी सांगेनच नंतर.
पण विश्वास ठेवा, घरगुती कामातच हे सगळे होऊन जाते, त्यासाठी खूप वेगळा वेळ नाही द्यावा लागत…हो ,थोडा mindset जरूर बदलावा लागेल. नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील, ज्या तुमच्या-आमच्या, नदी -निसर्गाच्या शाश्वततेसाठी आवश्यक आहेत. whats app वर जेव्हढा रोज सरासरी वेळ देतो त्यापेक्षा कमीच वेळ घरगुती उत्पादने करायला लागतो. फळांच्या साली कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी बरणीत गूळ पाणी घालून ठेवा…मधून मधून हलवा… तीन एक महिन्यात संपूर्ण घरासाठीचे सफाई द्रावण तयार होईल. अशा कितीतरी गोष्टी. पैसे तर वाचतीलच पण ‘आपण नदीसाठी काहीतरी करतोय हे समाधान मोलाचे नाही का?
आताशा कधी झुळझुळतं लहानपण डोळ्यात साठवत, गावातल्या माझ्या मीना नदीच्या काठाजवळ जाऊन पाण्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर लांबूनच कोणीतरी इशारा देतं ‘ ओ बाई, कशाला जाता त्या घाणीमधी? अवो समदी गटारं सोडली हायत, लै घाण हाये तिथं’.
मी लहान होऊन बागडत पोचते कधी मिनाईच्या काठी…कोणी ओंजळीतल्या पाण्याने तहान भागवतोय तर बाया बापड्या हांडे काळश्या घेऊन पाणी भरताहेत, उंबर-करंजानी दाटलेले काठ पक्षीगणांनी किलबिलताहेत…मी खळाळत्या पाण्याकडे झेपावते…कोणी आजी ओरडते ‘ ए s s पोरी…जपून ग, फ़ुड नगस जाऊ..जोरकस खळाळ हाये…पाण्याला लैच ओढ हाये बरका’.
अशा मनातल्या नद्यांसाठीच, तिच्या ‘पाताल-भूतल-व्योम’ अस्तित्वासाठी, ‘जीवीतनदीसाठी’ आपण कृतिशील होऊयात. घराघरातले छोटे उगम परस्परांना मिळतील आणि अविरल- निर्मल जीवन नक्की प्रवाहित होईल!!
पाताल-भूतल-व्योम was originally published in Kavadse on Medium, where people are continuing the conversation by highlighting and responding to this story.
जादुई चिराग- रिठा!
होय! यापुढील काळात विषयुक्त सफाई साधनांना पर्याय असणारा छोटा रिठा शेती, सफाई, औषधे, कारखाने, सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात अधिराज्य गाजवेल. या लेखातील रिठ्याची मुद्देसूद माहिती आणि रिठ्याचे घरगुती उपयोग आपल्याला विषमुक्त जीवनशैलीचा मार्ग दाखवतील.
लेखाच्या शेवटी रिठ्यापासून घरच्या घरी साबण, भांडी घासण्याची पावडर बनवण्याच्या रेसीपीजचे व्हिडिओज दिले आहेत. ते नक्की करून बघा, सोप आहे आणि स्वस्त पडते.
मंडलाकारं
सूर्य उगवला …आणखी एका दिवसाचे दान आपल्या पदरात पडले …
सूर्य मावळला …रात्र झाली …रात्र सरली…अंधार संपलाच नाही …दिवसही उगवला नाही.
म्हणजे दिवस- रात्रीचे वर्तुळ पूर्ण न होताच भरकटले तर?
चंद्र पृथ्वीभोवती, पृथ्वी सूर्याभोवती, आकाशगंगा कृष्णविवराच्या भोवती २० अब्ज वर्षांपासून भ्रमण करताहेत. चंद्र, पृथ्वी, आकाशगंगा आपापला मार्ग ठरवून सरळ रेषेत निघून गेले तर?
जीवन -मरणाचे चक्रही अनाहत…
जंगलात पानगळ होते…त्यातूनच नवजीवन साकारतं,
जीवनाने मागे फिरून मरणाकडे जायला हवे तरच पुन्हा नवे जीवन सुरु होईल ना?
यातले एकच सूत्र महत्वाचे…अनादी सुरुवात, मग शेवट …शेवटातून पुन्हा सुरुवात …
यांचा मार्ग हा नक्की वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असतो.
चराचरातील सारे व्यापार वर्तुळाकार आहेत म्हणून ते शाश्वत आहेत.
याला पहिले किंवा शेवटचे टोक नाही, पुढे जात असतानाच हे मागेही फिरणं असत आणि मागे फिरण्यातच पुढचा प्रवास असतो या विश्वाचा…सूक्ष्माचा आणि स्थूलाचाही!
विश्वातील कोणतीही व्यवस्था असो…काहीही घेतले, वापरले की नंतर ‘इदं न मम्” म्हणून निसर्गाला परत दिले जाते. जमीन दिवसभर सूर्याकडून उष्णता घेते, दिवस सरताना हा उबदार लहरींचा नजराणा आकाशाला परत दिला जातो. पावसाचे पाणी पिऊन तृप्त धरा ते पाणी समुद्रापर्यंत आणि वाफेचे निःश्वास ढगांपर्यंत पोचवते, आणि हे विश्वाधारी जीवनचक्र अखंड चालू राहते.
या सगळ्यात माणसाचा प्रवास कसा चालू आहे?
माणूस तीरासारखा एका रेषेत, भयानक वेगाने “प्रगतीकडे” झेपावतो आहे. लक्ष फार दूरवरचे, म्हणूनच आजूबाजूच्या जगाचे, पर्यावरणाचे भान सुटलेले. अनेक प्रश्नांच्या गुंत्यात जखडून गेल्याने हात पाय आणि संवेदनाहीया जायबंदी झालेल्या. कोणतीही संसाधने ओरबाडताना, वापरताना ‘वर्तुळाकार’ या सूत्राचा विसर पडलेला आहे का आपल्याला?
सर्वात बुद्धिमान मानवाला निसर्गाकडून किती-काय घ्यायचं, निसर्गाची चक्राकार प्रणाली कशी काम करते हे माहित नाही की फक्त ‘स्वार्थचक्राशी’, स्वतःची सुख-धनरेषा ठळक करण्याशी तो बांधील आहे?
हो, आपल्याला चक्राकार विचार करायला हवाय. आपण वापरत असणारी प्रत्येक गोष्ट कुठून येते आणि वापरल्यावर त्याचा शेवट कसा -कुठे होतो? साधी घरातली सफाईची किंवा कोणतीही उत्पादने घ्या ना, त्यातील रसायने कुठून येतात? वापरल्यावर त्याचा परिणाम, कोणा कोणावर, कुठे, कसा, किती होतो?
रोजच्या वापरातली विषे निसर्गालाच नाही तर आपल्या आरोग्यालाही धोकादायक आहेत. माहिती आहे प्रत्येकाला, पण मग याला पर्याय काय आहेत?
आहेत …नक्की आहेत…निसर्गाने सगळे काही दिलंय…जे पूर्वजांनी ओळखलं…वापरलं आणि काळाच्या कसोटीवर खरेही उतरलं!
मग थोडे वळण घेऊन मागे बघू या का? विषमुक्त, निरामय जीवन पूर्वज कसे जगत होते?
थोडे मागे जाऊनच पुढची मोठी उडी घ्यावी लागेल ना पर्यावरणासाठी?
निसर्गचक्राचा समतोल नैसर्गिक गोष्टींनीच उत्तम राखता येईल. कसा? याचा धांडोळा घेत गेल्यावर एक जादुई चिराग अर्थात त्यासारखेच काम करणारे अद्भुत छोटेसे फळ भेटले … रिठा …जादुई रिठा! कशावरही घासा, स्वच्छ करा. निसर्गाने आपल्याला रसदार फळे, सुगंधित फुले, नाना तऱ्हेचे अन्न दिले आहे तशीच आपल्या स्वच्छतेचीही आयती सोय केली आहे, तिही विनासायास.
निसर्गाची कास धरुयात …आज रिठ्याच्याच गोष्टी करूयात!
रिठ्याची गोष्ट
आमच्या नारायणगावला मीना नदीतीरी असलेल्या माध्यमिक शाळेच्या प्रांगणात दोन पुरातन विशाल वटवृक्ष व्रतस्थ मुनींसारखे ध्यानस्थ बसलेले दिसतात. त्यांच्या समोर एकाच ओळीत रिठ्याच्या झाडांनी, शिष्यांच्या नम्रतेने, शिस्त पाळत छान रांग केली आहे, म्हणजेच हे मुद्दाम कोणीतरी लावलेत. या शाळेच्या परिसरात हे रिठे इथे काय करताहेत? बरीच झाडे पटांगणासाठी तोडली असणार मग रिठेच मुद्दाम का लावलेत? याचीही छोटी पण छान गोष्ट आहे.
ते वर्ष होते सन १९४४. जुन्नर तालुक्याच्या निसर्गसंपन्न, मात्र औपचारिक शिक्षणाचा गंध नसणाऱ्या परिसरात, गुरुवर्य रा. प. सबनीस या द्रष्ट्या ज्ञानऋषींनी “विद्यामंदिराची” स्थापना केली. मीना नदीकाठच्या उंचवट्यावरील जागेत, अगदी जेमतेम लोकसंख्या असणाऱ्या नारायणगाव आणि नंतर जुन्नरला शिक्षणाची तोंडओळख झाली. शाळा सुरु करताना ‘एकाग्रता यशोबीजं’ हा मंत्र देत, त्या ग्रामीण,आदिवासी परिसरातील गोरगरिबांची मुले इथेच गुरुकुल पद्धतीने राहून शिकतील असे स्वप्न त्यांनी पहिले होते. म्हणून शाळेचा श्री गणेशा करताना दूरदृष्टीने शाळेच्याच परिसरात रिठ्याची अनेक झाडे लावली, जी इथे राहणाऱ्या मुलांना कपडे, अंघोळ सफाई अश्या सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी उपयोगी पडावीत. आजही ताठ मानेने उभी असलेली ही झाडे म्हणजे गुरुवर्यांनी रुजवलेली आत्मनिर्भरता, स्वावलंबन आणि पर्यावरण संवेदना यांची प्रतिकेच होत.
आज काळ बदललाय. बाजारू रासायनिक उत्पादनांनी जाहिरातींच्या आडून उच्छाद मांडलाय, नदी-नाले, सारे पर्यावरण आणि सकल जीवांचे आरोग्यही अक्षरशः नासले आणि मग आपण शोधायला लागलो विषमुक्त ऑरगॅनिक उत्पादने. अजूनही आपल्याला ‘त्या काळी साबण अस्तित्वात नसताना आपली आजी- पणजी, पूर्वज केस- कपडे कशाने बर धुवत असतील?’ असा प्रश्न अजिबात पडत नाही , कधी पडलाच तर ‘तो मागासलेला जुना काळ म्हणून त्याची दाखल घ्यायची गरजच नसते. गतकाळाची दारे किलकिली करून पहिली तरआपल्याला अनेक गोष्टी दिसतात, त्यातली एक म्हणजे “रिठा’. आज तसा दुर्लक्षलेला, ज्याच्यावाचून काहीच आडत नाही असा किरकोळ रिठा!
रिठ्याची कुळकथा
रिठ्याची कुळकथाही भारी छान आहे. हा आहे, ६०-७० वर्षांचे आयुर्मान लाभलेला,उष्ण कटिबंधातील एक पानगळी वृक्ष. Soapberry असेही त्याचे एक लाडके नाव. भारतात रिठ्याला वेगवेगळ्या प्रांतानुसार डोडो, डोडन, कनमाथाली अशीही नावे आहेत. तर जगात इतरत्र याला ‘ Washnut, Soapnuts, Washshells’ असेही म्हणतात. उन्हाळ्यात याला मोहोर येतो, पांढरट — हिरव्या फुलांनी झाडाची हिरवाई अधिकच गडद होते आणि मोठ्या बोराएव्हड्या फळांचे हिरवे -हिरवे घोस वाऱ्यावर हिंदोळे घेतात. थंडीची चाहूल लागताना रिठे सोनसळी पिवळे आणि नंतर तपकिरी होत जातात, हलक्या सुरकुत्या अंगावर दाटतात आणि ऐन हिवाळ्यात झाडाखाली तयार रिठ्याचा सडा पडतो.
रिठा हा नैसर्गिक, काळाच्या आणि शास्त्राच्याही कसोटीवर हजारो वर्षे उतरलेला नैसर्गिक साबण आहे. भरपूर फेस आणि मंद-मोहक सुगंध ही याची वैशिष्ट्ये आहेत. हठयोगाचे जनक ‘मच्छिन्द्रनाथ’ यांनी ९ व्या शतकात रिठ्याच्या झाडाखाली बसून साधना केली होती असे उल्लेख आहेत. इतकेच नाही तर इसवीसनपूर्व ५ -६ व्या शतकातील रिठे, साबण,आणि धोबी यांचे उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात विपुल आहेत. तसे भारतात रिठ्याचे अनेक प्रकार सर्वदूर मिळतात मात्र उत्तम प्रतीचे रिठे हे प्रामुख्याने उत्तर भारत आणि नेपाळमध्ये आहेत, त्यांचे शास्रीय नाव आहे Sapindus Morossi ही मोठ्या आकाराची रिठ्याची फळे आणि दक्षिण भारतातील छोटा रिठा आहे Sapindus Frifoliatus!
‘Sapindanceae’ कुटुंबातला हा सदस्य Sapindus म्हणूनही ओळखला जातो. त्यातल्या indus या शब्दामुळे शास्त्रज्ञांमध्ये भांडाभांडी सुरु झाली. ‘Indus’ नावावरून कोणी म्हणे याचे मूळ भारतीय तर कोणाला हा वेस्ट इंडिज वाला वाटला तर कोणी याच्या मूळ पुरुषाला नेटिव्ह अमेरिकेत नेऊन बसवलं.
रिठा दिसायला छोटा असला ना तरी त्याचे औषधी, कारखानदारी, शेती, प्रसाधने, बागा, सफाई उत्पादने या क्षेत्रात असंख्य उपयोग आहेत. याच्या अनेक प्रकारांपैकी १० जाती व्यावसायिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत. नव्वद वर्षापर्यंत हे झाड फळे देते.
हजारो वर्षे जगभरात याचा वापर होत असे. मात्र आधुनिकीकरणाच्या पर्वात पाश्चात्यांनी याचा ‘इंडस्ट्रियल सोप’ म्हणून वापर केला, मूळचा हा “Laundry Soap’ किंवा धुण्याचा साबण आहे हे ते विसरले, ते विसरले म्हणून आपणही अर्थातच विसरलो!
या जादुई फळावर जगभरात, अनेक क्षेत्रांत संशोधन सुरु आहे. Horticulture (Horticulture & soapnut) या क्षेत्रात रिठ्याचा वापर भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. रिठ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे त्यावर शास्त्रीय संशोधन मोठ्या प्रमाणावर होत असून त्यावरचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.
रिठ्यावर, त्याच्या गुणधर्मांवर, उपयोगितेवर गूगल बाबाच्या पोतडीत माहितीचा खजिना आहे. त्यातील निवडक गोष्टी मुद्देसूद स्वरूपात मांडते.
रिठ्याचे गुणधर्म
रिठा हा ‘all purpose cleaner; आहे. डोक्यावरच्या केसापासून, घर, टॉयलेट, कपडे, अंघोळ, औषधे इथपर्यंत सर्वांसाठी याचा उपयोग करता येतो. रिठा, शिकेकाई, व्हिनेगर, लिंबू घरात असेल तर इतर कोणत्याही साबणाची, स्वच्छतेची बाजारू आणि रसायने-युक्त उत्पादने विकत आणण्याची गरज नाही.
रिठ्याला ‘natural detergen’t अर्थात नैसर्गिक साबण असे सार्थ नाव आहे.
कोणतीही गुंतागुंतीची प्रक्रिया न करता, फक्त भिजवून सुवासिक फेस देणारा, रिठा हा उत्तम निर्मलक अर्थात साबण किंवा डिटर्जेन्ट आहे.
रिठा आख्खा, पावडर किंवा पातळ साबणाच्या स्वरूपात वापरता येतो.
रिठ्याचे बाहेरील आवरण म्हणजे ‘Pericarp’. (Pericarp of soapnut) यातच साबणाचे गुणधर्म असतात. यातील ‘सॅपोनीन’ (saponin of soapnut) हा घटक स्वच्छतेचे काम करतो.
रिठा फळात सरासरी १०.१ % हे सॅपोनीनचे प्रमाण असते ज्यावर रिठ्याची गुणवत्ता ठरते.
रिठ्याच्या बाहेरील आवरणाचे सरासरी वजन, एकूण वजनाच्या ५६ .५ % तर इतर भाग हा बियांचा असतो. बियांमध्ये स्वच्छतेचे गुणधर्म नसतात. परंतु बिया दंतवैद्यक क्षेत्रात व तेलासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
रिठ्याच्या बियांचे तेल काढतात, बियांमध्ये २६ ते २७ % तेल असते.
रिठा (antibacterial, antimicrobial, antifungal properties of soapnut) प्रतिसूक्ष्म जैविक, बुरशी विरोधी, पृष्ठ प्रक्रियाकारी, पाण्याचे, मातीचे, पर्यायाने पर्यावरणातील प्रदूषण कमी करणारे असे बहुगुणी फळ आहे.
रिठा वापरल्या नंतरचे सांडपाणी, ओढे, नद्या प्रदूषित नव्हे तर स्वच्छ करते.
वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात रिठ्याचे झाड सहज वाढते.
रिठ्याचे उपयोग
कपडे सफाई
रोजचे सर्व प्रकारचे कपडे धुण्यासाठी उदा. सुती, लोकर, कृत्रिम धाग्याचे, रेशमी याला रिठ्यासारखा उत्तम पर्याय नाही.
रिठा बाजारातील कोणत्याही पावडर साबणापेक्षा कमी नाही, उलट नैसर्गिक सुगंधाचा हा नैसर्गिक, पर्यावरणपूरक साबण वापरायला सोपा, तितकाच परिणामकारक आहे
कपड्यावरील अगदी कठीण, जसे रक्त व दारूचे डागही याने जातात.
रिठा कपड्यांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतो, फिकट होऊ देत नाही, त्यामुळे जास्त काळ कपडे वापरता येतात.
फक्त १०० ग्रॅम रिठ्यापासून २. ५ लिटर पातळ साबण बनतो, त्यातील चार चमचे साबण बादलीभर धुण्यास पुरतो.
नैसर्गिक साबण असल्याने कपडे, केस, वस्तूंवर, भांड्यांवर कोणताही रासायनिक द्रव्याचा अंश राहत नाही, त्यामुळे त्वचेवरील ऍलर्जी, अन्नातील विषबाधा ई. चा धोका टळतो.
कपडे मुलायम आणि सुगंधित होतात.
आक्खा रिठा किमान सहा वेळा कपडे धुण्यासाठी वापरू शकतो.
कपडे धुतलेले पाणी बागेसाठी, झाडांसाठी, बाथरूम -संडास धुण्यासाठी उपयोगी.
रिठ्यात भिजवलेले कपडे धुण्यास कमी पाणी लागते.
फेस कमी येतो, त्यामुळे धुण्याचे मशीन सुरक्षित राहते.
वर्षभराची रिठ्याच्या पावडरची साठवण करून गरजेनुसार वापरता येते, ही नैसर्गिक पावडर बाजारू साबणापेक्षा स्वस्त पडते .
घरातील व वैयक्तिक सफाई
रिठ्याच्या पातळ साबणात घरचे किंवा विकतचे व्हिनेगर घातले तर कपड्यांबरोबर भांडी घासायला उपयोगी पडते.
रिठा द्रावण कपडे धुण्याच्या मशीनमध्ये व डिशवॉशर मध्ये घालता येते.
दागिने, काच , स्वयंपाकघर, पंखे, बाथरूम, दारे, टाईल्स किंवा कोणताही पृष्ठभाग याने स्वच्छ होतो.
रिठा स्वयंपाकघरात बहू उपयोगी आहे. ओटा, कपाटे जेवणाचे टेबल, फरशी, यावरील चिकटपणा सहज जातो. त्यात व्हिनेगर मिसळले तर माश्या, चिलटे यांचा प्रादुर्भाव रोखता येतो. हवेत स्प्रे करून तुम्ही फ्रेशनेस अनुभवू शकता.
लिंबू आणि रिठ्याची बारीक दळलेली पूड, खायचा सोडा व मीठ ही भांडी घासण्याची उत्तम पर्यावरण पूरक पावडर आहे.
अंघोळीसाठी रिठा पावडर किंवा द्रावण वापरा, ज्यामुळे त्वचेवर एक मुलायम आवरण तयार होऊन इन्फेकशन, संसर्गापासून बचाव होऊ शकतो.
शाम्पू, फेसवॉश अशी अनेक पर्यावरण पूरक उत्पादने रिठ्यापासून बनतात.
भाज्या- फळे रिठा द्रावणात १० मिनिटे बुडवून ठेवली तर त्यांच्या पृष्ठभागावरील ९५% रासायनिक अंश निघून जातो.
रिठा साबण पाणी घालून ते सौम्य द्रावण चारचाकी-दुचाकी गाड्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आरसे सफाईसाठी वापराता येते.
बागेतली झाडावरील कीड, रोग (Aphids, blackfly) रिठा द्रावणाने आटोक्यात येतात.
फरशी पुसण्यासाठी पाण्यात मीठ, तुरटी बरोबर रिठा द्रावण घालावे.
औषधी उपयोग
आयुर्वेदात रिठ्याला मनाचे स्थान आहे. औषधे, मसाज, केसांच्या सफाईसाठी रिठ्याचा उपयोग होतो .
केसगळती, उवा, निस्तेज केस यावरही रिठा वापर हा उपाय करतात.
चीनमध्ये त्वचारोगावर तर ब्रह्मदेशात epilepsy (Epilepsy & soapnut) वर, तैवान मध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी (Eye health & soapnut) रिठा वापरतात.
रिठा नैसर्गिक ‘exfoliant आहे, त्वचेवरील मृतपेशी नैसर्गिकपणे काढल्या जातात.
मशीनवर काम करणाऱ्या लोकांच्या हातावर तीव्र रासायनिक द्रावणामुळे चिरा पडतात. संशोधनाने सिद्ध झाले आहे की रिठ्याच्या वापराने दोन आठवड्यात त्यांचे हात अधिक स्वच्छ आणि मुलायम होतात.
Anti -gastric, anti-ulcer (Anti-gastric, anti-ulcer properties of soapnut) अश्या गुणधर्मामुळे रिठा liver (यकृत) विकारात वापरला जातो.
प्रजनन (reproduction & soapnut) विषयी औषधांमध्ये रिठ्याचा वापर होतो.
रिठ्याचे भाऊबंद
Longan (Dragon-Eye)/Australian Acacia
The Longan fruit
दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात ‘लॉंगन Longan detergent किंवा ‘ड्रॅगन आय’ Gragan Eye Tree हा वृक्ष ‘Ecological Detergent’ म्हणून ओळखला जातो कारण यातही saponin हे नैसर्गिक निर्मलक द्रव्य आहे .
लॉंगन या झाडाची पाने साबण तयार करण्यासाठी वापरतात.
लिचीसारखा धुरकट पांढरा गर आणि आत काळीभोर बी असल्याने याला ड्रॅगन -आय म्हणतात.
‘ऑस्ट्रेलियन अकेशिया’ Saponin in Australian Acesia या झाडाच्या शेंगातही सॅपोनीन मुबलक प्रमाणात आढळते.
ही परदेशी झाडे सामाजिक वनीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत भारतात मोठ्या भू-भागावर लावली गेली आहेत. त्याच्या शेंगा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. त्याचा उपयोग रिठ्याला पर्याय म्हणून नक्कीच करता येईल, अर्थात यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
ARTI या संस्थेने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन अकेशिया या झाडाच्या शेंगांपासून शाम्पू, साबण वगरे उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. पुढील फोटोत त्याची माहिती दिली आहे.
रिठ्याची कच्ची फळे … रिठ्याचे झाड… पिकलेली फळे … सुकलेले रिठे
आहेत इवले छोटे … पण काम किती मोठे!
रिठ्याचा साबण करायचाय? ही घ्या रेसिपी !
रिठ्याची भांडी घासण्याची पावडर … नक्की करा !
काही उपयुक्त संदर्भ:
www.theearthofindia.com
http://soapnut.in/about-soapnut.html
जादुई चिराग  —  रिठा! was originally published in Kavadse on Medium, where people are continuing the conversation by highlighting and responding to this story.
उन्हाने आणलेली
सावलीने विणलेली
आयष्याने जाणलेली
ही छाया-प्रकाशी रेखाचित्रे!
नमस्कार!
मनातले काही कवडसे ओंजळीत घेत, सगळ्यांशी संवाद साधायचा हा पहिलाच प्रयत्न. मी प्राध्यापिका स्वाती आनंद दीक्षित. माझे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील नारायणगाव. आता मात्र पुणेकर आहे. भूगोल आणि पर्यावरण हे माझे जिव्हाळ्याचे विषय. पुणे येथे पर्यावरण उणे असले तरी हीच पर्यावरण प्रेमींची मांदियाळी सुद्धा आहे. त्यातील कित्येक गुरूंकडून थोडेफार शिकण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न- प्रयोग केले, आणि थोडा अनुभव घेतल्यावर मग तुम्हालाही काही सांगावसं वाटलं.
काय असेल या ब्लॉग वर?
घर- स्वयंपाकघर…पर्यावरण संवर्धनाचे माहेरघर
आपल्या प्रत्येकाला पर्यावरणासाठी काहीतरी करावस वाटतं, तसे मलाही. विशेषतः भूगोल आणि पर्यावरण शिकवताना एक शिक्षक म्हणून तर जास्तच. पण घर, नोकरी व इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे कसे साध्य व्हावे? मग निघून गेलेल्या आई, आजी, पणजी ते फुले, पाने, फळे, बाग, स्वयंपाकघरातील अगदी लिंबू- मीठा पासून सगळेच आणि या क्षेत्रातले तज्ञ अशा अनेक गुरूंनी शाश्वत मार्ग दाखवला, एक बीजमंत्र दिला की “पर्यावरण संवर्धनाची सुरुवात ही घरापासूनच होते”, अर्थात “घर हीच पर्यावरणाची मुख्य शुद्धीकरण यंत्रणा आहे.”
जवळपास तीन वर्षे काही यशस्वी प्रयोग केल्यावर या ब्लॉग मध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर माझ्या परीने शोधलेली उत्तरे तुम्हाला सांगायला मला आवडतील. Toxin-free lifestyle अर्थात विषमुक्त जीवनशैली साधे-सोपे- घरच्याघरी केलेले प्रयोग करून सहजसाध्य होऊ शकते.
माझ्या घरातला वारसा
त्याचप्रमाणे १५०-२०० वर्ष्यांपुर्वीच्या अनेक अँटिक वस्तूंचा वारसा आम्हाला मिळालेला आहे. त्या जुन्या, पारंपरिक, जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तूंची सचित्र माहिती, व्हिडिओज हे सुद्धा माझ्या ब्लॉग वर येतील.
आकाशातलं हिरवं बेट
छत किंवा गच्चीवर फुलवलेल्या, इवल्याश्या शेतीचे काही जमलेले तर कित्येक फसलेले प्रयोग, त्याचे फोटोज, तज्ज्ञांचे व्हिडिओज तुम्हालाही नक्कीच आवडतील, प्रेरणाही देतील.
नदीला हृदयाशी जोडूया
नदी आणि आई दोन्ही आपल्या हृदयात सतत प्रवाहित असतात. नदी आधी समजून घ्यायला हवी तरच तिची आणि पर्यायाने आपलीही विकलं अवस्था आपल्या लक्षात येईल. अविरल-निर्मल नदी, तिच्या न संपणाऱ्या गोष्टी-गप्पा इथे रंगतील.
आणि कवडसे…अचानक आलेली उन्हाची तिरीप किंवा कधी दाटलेली सावलीची महिरप
अर्थात विविध विषयांवरील स्फुट लेख, काव्य. काही सगळ्यांच्या आवडीचे, उपयोगी व्हिडिओ सुद्धा!
तर खात्री आहे आपण बघाल, वाचाल, बदल सुचवाल…आणि हो, नक्कीच संवाद साधाल या पत्त्यावर: swatiadixit@gmail.com
धन्यवाद!
स्वाती
कवडसे: एक नवी सुरुवात was originally published in Kavadse on Medium, where people are continuing the conversation by highlighting and responding to this story.