शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर मोठा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील गृह मंत्रालय सूडाच्या भावनेने काम करत आहे. यावेळी त्यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे मारहान प्रकरणावरुन देखील शिंदे-फडणवीसांवर टिका केली. तसेच भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेले फडणवीस विरोधकांना काडतूस फेकून मारतात ते पण भिजलेली. यांना काहीही प्रतिष्ठा नाही बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. गुंडाना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. हे सरकार गुंड टोळ्या आहेत, अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे.
Be the first to comment